पोस्ट्स

mbnews लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  हृदयद्रावक घटना: खेळत खेळत राखेच्या तलावात गेलेल्या चार वर्षिय चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू   परळी वैजनाथ, प्रतिनिधी..              अतिशय हृदयद्रावक अशा प्रकारची घटना आज (दि.25) सकाळच्या सुमारास परळी -गंगाखेड रस्त्यावरील औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक तळे आहे त्या ठिकाणी घडली. या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.      राखेच्या तळ्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर राहत असलेल्या पवार कुटुंबातील  तीन भावंडं खेळत खेळत  राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. त्या ठिकाणी मयत साक्षी व तिची दुसरी बहीण या पाण्याच्या डबक्यात खेळू लागले. खेळता खेळता ते पाण्यात पडले याच ठिकाणी असलेला त्यांचा सात वर्षाचा मोठा भाऊ याने ती घटना बघितली आणि धावत जाऊन त्याने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. साक्षीचे वडील घटनास्थळावर येऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत चार वर्षाची साक्षी या चिमुरडीचा मृत्यू झाला. एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस पवार कुटुंब राहते. राखेच्
इमेज
  वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन        द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह,विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,त
इमेज
  अहंकार मानवाच्या पतनाचे कारण - प.पु. प्रदीप मिश्रा उद्या होणार कथेची सांगता🔸 परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - अहंकार  मानवाच्या पतनाचे कारण बनतो, म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार होऊ देऊ नका असे प्रतिपदान प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी सहाव्या दिवशीच्या कथेत केले.येथील मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेत त्यांनी शिवमहिमा वर्णीत केला.कथेचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या मराठी भजनावर भाविकांनी ठेका धरला होता.            कर्ता करविता भगवान शंकर आहेत,सर्व सृष्टी त्याच्या आधीन आहे.म्हणून शिव निंदा करू नये.भगवान शंकराला आपल्या जीवनात आलेले दुःख सांगा त्यापासून ते मुक्त करतात.मानवाच्या अहंकाराचे हरण फक्त भगवंतच  करू शकतो.भगवंताची केलेली सेवा फळ देतेच म्हणून आपण देवाची नित्य सेवा केली पाहिजे.कणा कणांत शंकर आहे असे महाराजांनी कथेचे विवेचन करतांना सांगितले.      शिव निंदा केल्याने शापित झालेल्याम हर्षी नारदांनी चंद्रभागे तिरी व्रत करत स्वतःला शाप मुक्त करून घेतले होते.भगवान शंकर,विष्णूंचे वरदान म्हणजे पंढरपूर येथील चंद्रभागा नदी आहे.सगळ्या नद्
इमेज
संयम संपला: परळी तालुक्यातील या गावात झालं अनोखं आंदोलन परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे गाव रस्त्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच पाण्यात बसून ग्रामस्थांनी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शनिवारी सकाळी मौजे रेवली येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाण्यात बसत आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणारा मुख्य रस्ता करावा अशी मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. याबद्दल सतत पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. येत्या आठ दिवसांत रस्ता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
इमेज
 *आ.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते रविवारी हनुमान नगर येथील श्री.कृष्णमुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलाशारोहण सोहळा* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         शहरातील हनुमान नगर, डोंगर तुकाई रोड भागात उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार आहे.              श्री कृष्ण मंदिर, श्रीकृष्ण चौक, हनुमान नगर, डोंगरतुकाई रोड, परळी वैजनाथ येथे रविवार दि. २१/८/२०२२ रोजी श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला गुरु कांंच बसवेश्वर मठ संस्थान, पाथरीचे श्री.ष.ब्र.१०८ गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज, श्री. ह. भ. प. गणेश महाराज जाधव परतुरकर, ह. भ. प. श्री. विठ्ठल महाराज उखळीकर, श्री.ह.भ.प. शिवहरी महाराज भाकरे कृष्ण नगर, अंबलवाडी यांचे आशिर्वचन लाभणार आहेत.पुजा विधी पौरोहित्य श्री. उमाकांत स्वामी हे करणार आहेत. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून न. प.. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नगराध्यक्ष
इमेज
 *राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन*  *"मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी"* परळी । दिनांक २०। "गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या.     राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले, त्यांचा चेमरी विश्रामगृहात मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना गोपीनाथ गडाला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत  "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी या भेटीत मुंडे साहेबांचा पुतळा आणि    गड परिसराची पाहणी केली.     यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हयातील व तालुक्यातील पदाधिकारी, लोक प्रति

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......

MB NEWS-मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान

इमेज
  महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी राज्यपालांना परळीतील युवकांकडूनअनोखी भेट    मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       आपल्या विविध वक्तव्यांनी वाद ओढवून घेणारे व महाराष्ट्राबद्दल आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र अस्मितेची जाणीव नसल्याच्या टिकेचे धनी ठललेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे परळीत आले असतांना त्यांना महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी भेटवस्तू काही युवकांनी दिली.एकप्रकारे ही भेट सकारात्मकता जपत खोचक अशी अनोखी भेट ठरली आहे.            वैभवशाली महाराष्ट्रातील गौरवशाली मराठवाड्याची उन्नत परंपरा दर्शवणारी छायाचित्र प्रतिमा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना काही युवकांनी भेट दिली. राज्यपाल भगतसिंग कोशियारी आज देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाच्या दर्शनाला आले होते.  अनेकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे व सहकारी युवकांनी राज्यपालांंची भेट घेतली.जाणीवपूर्वक महाराष्ट्र अस्मितेची जाणीव करुन देणारी  व महाराष्ट्राबद्दल आभिमान बाळगा असा अप्रत
इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्राला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार परळी (प्रतिनिधि)           पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल "कौन्सिल ऑफ एनव्हायरो एक्सलन्स फाऊंडेशन" तर्फे दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा समजला जाणारा "राष्ट्रीय पर्यावरण उत्कृष्टता पुरस्कार -२०२२" हा पुरस्कार परळी औष्णिक विद्युत केंद्राला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी मिळाला आहे.या पुरस्काराने मराठवाड्यातील एकमेव असणाऱ्या या विद्युत केंद्रांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  दिनांक १७ व १८ऑगस्ट रोजी "थर्मल पॉवर स्टेशन प्लांट मधील वायू गुणवत्ता नियंत्रण प्रणाली" या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील  तज्ञांची मार्गदर्शने झाली. या परिषदेत परळी केंद्रातील कार्यकारी रसायन शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. दिनांक १८ रोजी  दुपारच्या सत्रात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली केंद्राच्या वतीने कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा शंकर  तूपसागार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावर्षी मे २०२२ मध्ये ही जलव्यवस्थापन साठी दोन राष्ट्रीय पुरस्क

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......  

MB NEWS-*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही - प.पु.प्रदीप मिश्रा*

इमेज
*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही -  प.पु.प्रदीप मिश्रा* *_वैद्यनाथांच्या भूमीत जन्म होणे महादेवाची कृपा_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.१७ - शहरात मथुरा प्रतिष्ठान द्वारा आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेच्या तृतीय दिनी श्रोत्यांनी कथेचे मनोभावे श्रवण केले.आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात कधीही दुःख येणार नाही असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी केले.श्रावण पर्वात होत असलेल्या या कथा श्रवणासाठी विविध राज्यातील भाविक परळीत दाखल झालेले आहेत. तृतीयदिनी कथावक्त्यांनी बेलपत्राचा महिमा विशद केला.बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे.आपले मन शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही.भगवंताला नित्य जलाभिषेक करा याचे फळ तुम्हाला कुठे ना कुठे तरी मिळणारच आहे.काही झाले नाही तर एक लोटा जल महादेवाला दररोज वाहत जावे.याबरोबरच नियमीत संतसेवा करा संतामुळे सत्संग मिळतो असे विवेचन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी कथेत केले. तृतीय दिनीही गुरुजींनी व्यासपीठावरून शिवभक्तांनी पाठवलेल्या पत्र वाचन केले. कथा स्थळी शकंर पार्वती झाकी ने उपस्थितीतांना साक

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... https://youtu.be/tNX8l4ILqz4

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
 परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... --------------------------------------------- परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित बातमी: *आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा* _भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात_

MB NEWS-भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात

इमेज
   आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दि.१५ - प्रभू वैद्यनाथांच्या पावन भुमीत आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेला आज सुरुवात झाली.येथील मथुरा प्रतिष्ठान कडून या कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.भगवान शंकराच्या आराधनेकरिता पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात शिव भक्तांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक असे प्रतिपादन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी यावेळी केले.कथा श्रवण करण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत. श्रावण पर्वात ही कथा संपन्न होत आहे,या कथेचे मुख्य यजमान प्रभू वैद्यनाथ आहेत त्यांच्या इच्छेशिवाय या भूमीत कथा होणे अशक्य आहे.बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कथा करण्याची सोमाणी परिवाराचा संकल्प आहे त्याची सुरुवात परळी च्या वैद्यनाथापासून सुरू झाली आहे.यावेळी महाराजश्रींनी विविध भक्तांनी पाठवलेले पत्र वाचून दाखवले.मनाला माळे सोबत जोडा म्हणजे परमात्मा मिळेल,शिवमहापुराणात २४००० श्लोक आहेत.या श्लोकांत

MB NEWS-परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण...

इमेज
परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण...   ----------------------------------------------- परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.

MB NEWS-आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा

इमेज
  आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा  परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी व परळी येथील शिवभक्तांच्या उपस्थीतीत ध्वजारोहण होणार असुन यानंतर हवेत तिरंगा बलुन सोडण्यात येणार आहेत. परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावरील एकुण ३३ एकरातील दहा एक्करमध्ये मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.  @@ *महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक्त येणार*  सध्या सुरू असलेला श्रावण मास

MB NEWS- *परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे*

इमेज
 * परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे* *आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री.प्रदिपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा लाभ घ्यावा :-मथुरा प्रतिष्ठान* प्रतिनिधी परळी वै. बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.या शिव पुराण कथेच्या स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे असणार आहेत अशी माहिती या कथेचे यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यानी ऐका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.परळी येथील मथुरा प्रतिष्ठानच्या वतीने या कथेचे आयोजन केले आहे.  परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात येत्या १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण  प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी ,

MB NEWS-परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला(Video & News)

इमेज
  परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला परळी वैजनाथ | एमबी न्युज वृत्तसेवा..         परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.  बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....    दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या नंदनज-कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे.मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्र

MB NEWS-नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी

इमेज
  नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी केज (दि.१५) :- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विद्यार्थी हे त्यांच्या पालका सोबत अहमदनगर येथे नीटच्या परीक्षेसाठी जात असताना अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळ नजीक त्यांच्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली. त्यात दोन विद्यार्थी व दोन पालक असे चौघे जखमी झाले आहेत.       दि. १५ जुलै शुक्रवार रोजी पाथरी जि. परभणी येथील सुरेश सिरसाट वय (५० वर्ष), विनोद सिरसाट वय (४२ वर्ष), सौरभ सिरसाट वय ( १९ वर्ष ) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) व अन्य एकजण असे पाचजण अहमदनगर येथे नीट परीक्षेसाठी बोलेरो गाडीतून जात होते. त्यांची गाडी केजच्या दिशेने होळ पासून पुढे आली असता होळ ते चंदनसावरगाव दरम्यान त्यांची बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातमध्ये सौरभ सिरसाट वय (१९ वर्ष) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) हे दोन विद्यार्थी व सुरेश सिरसाट वय (५० वर्ष) आणि विनोद सिरसाट वय (४२ वर्ष) हे दोन पालक जखमी झाले आहेत.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आपत्