आदर्श पायंडा- अनोखा वाढदिवस

वाचनालय सुरु करुन सोपान ताटे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा परळी (प्रतिनिधी) बुद्ध फुले आंबेडकर चळवळीतील अग्रेसर असणारे भिमनगर येथील सोपान ताटे यांचा वाढदिवस आज 1 जुलै रोजी प्रस्थापित पद्धतीला नाकारून कसलाही ताम धाम न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन करून संपन्न करण्यात आला. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सोपान ताटे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकमान्य सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कॉम्रेड पी. एस. घाडगे सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, भिमनगर वंदना संघाचे संचालक प्रा.विलास रोडे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते भारत ताटे, माजी नगरसेवक नितीन रोडे, काँग्रेस नेते गणपत आप्पा कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास युवक नेते भारत ताटे यांनी 5000 रुपयाची देणगी जाही...