पोस्ट्स

मार्च ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-पतसंस्थेत भरण्यासाठी दिलेले पाच लाख घेऊन पोबारा

इमेज
पतसंस्थेत भरण्यासाठी दिलेले पाच लाख घेऊन पोबारा                    Click - आजचे राशिभविष्य परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      एका पतसंस्थेत भरण्यासाठी म्हणून पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन एकाने पोबारा केल्याची घटना ११ मार्च रोजी दुपारी  घडली आहे.यामुळे परळीच्या बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. Click -🏵️ *आप पक्षाबाबत १० वर्षापुर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे म्हणाले होते...जे आज तंतोतंत लागू पडलं.*        पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी रोहित गजानन देशमुख यास परळी नागरी सहकारी पतसंस्थेची पाच लाख रूपये रक्कम रेणुका माता मल्टीस्टेट पतसंस्थेत  विश्वासाने भरणेकामी पाठवले असता आरोपीने पैसे न भरता पैसे घेवुन कोठेतरी निघुन गेला. पतसंस्थेची रक्कम आहे हे माहीत असतानाही पैसे घेवुन निघुन गेला व फिर्यादीचा विश्वासघात केला म्हणून परळी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विकास विजयकुमार रुद्रकंठवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे सफौ औसेकर हे करीत आहेत. Click - 🌑 *कृपा करून आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी करु नका -पालकमंत्री धनंजय मुंडे.

MB NEWS-मंत्री धनंजय मुंडेंची संवेदनशीलता: जमिनीवर बसत दिव्यांग जोडप्याचे स्वीकारले निवेदन

इमेज
मंत्री धनंजय मुंडेंची संवेदनशीलता: जमिनीवर बसत दिव्यांग जोडप्याचे  स्वीकारले निवेदन धनंजय मुंडेंचा बीडच्या राष्ट्रवादी भवनमध्ये जनता दरबार बीड (दि. 12) ---- : बीड शहरात राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारास आले असता गर्दीत मागे राहिलेल्या एका दिव्यांग जोडप्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी धनंजय मुंडे गर्दीतून मार्ग काढत तेथे गेले व अगदी जमिनीवर बसून त्या जोडप्याचे निवेदन धनंजय मुंडे यांनी स्वीकारले.                      Click - आजचे राशिभविष्य बीड शहरातील विशाल माने व त्यांच्या पत्नी हे दोघे दिव्यांग असून त्यांना दिव्यांगांसाठी उपयुक्त असलेली चारचाकी स्कुटी शासनाकडून मिळावी हे निवेदन माने दाम्पत्याने धनंजय मुंडे यांना दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी करून त्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण किंवा शासनाच्या महाशरद या पोर्टलच्या माध्यमातून लवकरक स्कुटी मिळवून देण्यात येईल असे आश्वस्त केले.  Click -🏵️ *आप पक्षाबाबत १० वर्षापुर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे म्हणाले होते...जे आज तंतोतंत लागू पडलं.*   बीड शहरात कृषी विभागाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांसाठी धनंजय मुंडे बीड

MB NEWS-आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या भागिणींच्या पाठीशी भाऊ म्हणून कायम उभा - अजय मुंडे

इमेज
आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या भागिणींच्या पाठीशी भाऊ म्हणून कायम उभा - अजय मुंडे परळी वैजनाथ......     कोरोना काळात काम करणाऱ्या आशा फ्रंटलाईन वर्कर्स व त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही या कोरोना काळात काम केलेली प्रत्येक व्यक्ती ही देवदूतच आहे, असे गौरवोद्गार या सत्कार सोहळ्यात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करताना श्री अजय मुंडेंनी काढले.                     Click - आजचे राशिभविष्य बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आशा फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्या समस्याचे समाधान करण्यासाठी मी स्वतः कटीबद्ध आहेच पण या सर्व भगिनींचा भाऊ म्हणून मी कायम पाठीशी उभा आहे, असा विश्वासही यावेळी या सत्कार सोहळ्यात श्री मुंडेंनी व्यक्त केला.              Click- 🌑 *सार्वजनिक पाणीपुरवठा बंद व मुक्या प्राण्यांचीही पाण्यावाचून तडफड* Click -🏵️ *आप पक्षाबाबत १० वर्षापुर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे म्हणाले होते...जे आज तंतोतंत लागू पडलं.*     परळी पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज परळी येथील स

MB NEWS-पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला मिळणार 700 वर्षापूर्वीचे स्वरूप

इमेज
 ⬛  पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला मिळणार 700 वर्षापूर्वीचे स्वरूप                    Click - आजचे राशिभविष्य  पंढरपूर :  ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली असताना आता ठाकरे सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात 73 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद केली आहे.  देशभरातील लाखो विठ्ठल भक्तांना पुरातन विठ्ठल मंदिर येत्या काळात पाहता येणार आहे. पुरातत्व विभागाने बनविलेल्या  विकास आराखड्याला मंदिर समितीने मंजुरी देत राज्य शासनाकडे पाठवला होता. यासाठी प्रमुख निधीची अडचण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूर करत यासाठी भरभरून निधीची तरतूद केल्याने विठ्ठल भक्तांसाठी ठाकरे सरकारची ही अनोखी भेट ठरणार आहे. Click- 🌑 *सार्वजनिक पाणीपुरवठा बंद व मुक्या प्राण्यांचीही पाण्यावाचून तडफड* विधानपरिषदेच्या सभापती निलमताई गोऱ्हे यांनी यासाठी मुंबई आणि पंढरपुरात खास बैठक घेऊन मंजुरीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . गेल्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी विठुरायाची महापूजा केल्यानंतर या आराखड्यास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होत

MB NEWS IMPACT: वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या गावांमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक तास वीज मिळणार !

इमेज
  MB NEWS  IMPACT: वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या गावांमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक तास वीज मिळणार ! नागरीकांनी बिल भरुन सहकार्य करावे - वीज वितरण कंपनीचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      थकित वीज देयकांमुळे ग्रामीण भागात अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. याबाबत नागरिकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. वीज तोडणीमुळे मुके प्राणी, गुरेढोरे व जनावरांची पाण्याअभावी तडफड होत असल्याचा मुद्दा एम बी न्यूज ने प्रकर्षाने समोर आणला होता. या बातमीच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने सकारात्मक पावले उचलत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या गावांमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी म्हणून एक तास वीज पुरवठा देण्याचे मान्य केले आहे. Click- 🌑 *सार्वजनिक पाणीपुरवठा बंद व मुक्या प्राण्यांचीही पाण्यावाचून तडफड*      तालुक्यातील अनेक गावांमध्ये थकबाकी असल्यामुळे वीज वितरण कंपनीने थकबाकी असणाऱ्या गावांना वीजपुरवठा देणे बंद केले आहे. मात्र संपूर्ण वीजपुरवठा बंद असल्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांस