MB NEWS - 🔷 घरगुती गॅसचे दर ५० रुपयांनी वाढले, एका सिलेंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार
.jpeg)
🔷 घरगुती गॅसचे दर ५० रुपयांनी वाढले, एका सिलेंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळं महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरचे दर वाढले आहेत. १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० रुपयांची दरवाढ झाल्यानं आता सिलेंडरची किंमत ९९९.५० रुपयांवर पोहोचली आहे. Click: 🛑 *या वर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीच्या दर्शनाला भाविक मुकणार....* 🔸 *संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट!* • _हा तर श्रद्धेचे दमन व भक्तीभेदाचा डाव - भाविकांत नाराजीचा सूर_ देशाची राजधानी नवी दिल्लीत घरगुती गॅसचा दर ९९९ रुपये ५० पैसे इतका झाला आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. २२ मार्चला यापूर्वी ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले नव्हते. Click: *संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग पुर्ववत राहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न - बाजीराव भैय्या...