पोस्ट्स

राष्ट्रवादी काँग्रेस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीत तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे आयोजन

इमेज
आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम  परळी (दि. 14) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी येथे तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी 7 वा. प्रख्यात गायक उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' हा कार्यक्रम शहरातील मोंढा मैदान येथे होणार आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला उदय साटम यांचा 75 कलाकारांचा चमू व त्यातून साकारण्यात येणारी भीम वंदना म्हणजे अलौकिक कार्यक्रम असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  या तीन दिवसीय महोत्सवांतर्गत दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. कलारंजना मुंबई, निर्मित व उदय साटम दिग्दर्शित 75 कलाकारांचा समावेश असलेला वंदन भीमराया हा कार्यक्रम होईल. दि. 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा लाईव्ह भीम गीतांचा जंगी कार्यक्रम होईल व अखेरच्या दिवशी 17 एप्रिल रोजी प्रा. प्रकाशकुमार वाघमारे प्रस्तुत 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होईल. ह...

MB NEWS-डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी

इमेज
  डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन राशन कार्डबाबतची सर्व कामे सुलभ पद्धतीने करुन देऊ- नम्रता चाटे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे आज शुक्रवार, दि.25 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते  उद्घाटन झाले.परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेट चा सर्वोपयोगी उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी तहसील मधील राशनकार्ड पद्धत सुलभ करून देण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी दिले.     फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीर सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली व धनंजय मुंड...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या