MB NEWS: गेवराई,अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे

अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे गेवराई, प्रतिनिधी... बीड जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यात गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मंत्र्यांचे पाहणी दौरे याच भागात झाले.परंतु मंत्र्यांनी पाहणी केलेले मादळमोही व तलवाडा हे महसूल मंडळ अतिवृष्टीतुन वगळण्यात आले आहे.त्यामुळे मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो पुरते होते का ?असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील 118 गावातील एक लाख 16 हजार 865 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर एकूण 90 हजार 730 हेक्टर जिरायती क्षेत्रातील पिकांचे तर बागायती क्षेत्रातील 556 हेक्टरवर नुकसान झाले तसेच 87 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले जिल्ह्यात एकूण 90 हजार 3376 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.तर सोयाबीन,बाजरी, तूर, कापूस, ऊस, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुसार शासनाने अतिवृष्टीचे 10,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले परंतु ज्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही व तलवाडा या भागात डझनभर मंत्र्यांनी पाहणी दौर...