MB NEWS:अर्थो रक्षति रक्षित: किं घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..

अर्थो रक्षति रक्षित: किं घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने.. डॉ क्टरांना रूग्णांची नाडी तपासून निदान करता येते, हा दृढ विश्वास अनेकाबाबत आजही कायम आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीत डॉक्टरांचे योगदान मोलाचे ठरते. त्या दृष्टीने विचार करायचा तर आरोग्य साक्षरते बरोबरच अर्थ साक्षरता देखील महत्वाची ठरत आहे. हाच वसा डॉ.दिगंबर जनार्धन दंडे यांनी घेतला. रूग्णांना उपचाराद्वारे दिलासा देतानाच त्यांच्या आर्थिक गरजांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करण्याचे मनोमन ठरवले आणि यातूनच डॉ.दंडे यांचा बँकींग क्षेत्रात प्रवेश झाला. दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई या बँकेत संचालक ते अध्यक्ष हा डॉक्टरांचा प्रवास लक्षात घेण्याजोगा आहे. संघाच्या संस्कारातून पुढे आलेल्या डॉ.दिगंबर दंडे यांनी कायम समाजाच्या सर्वांगिण हिताचा विचार केला. बँकेच्या निरंतर प्रगतीबरोबरच समाजातील विविध घटक या बँकेशी कसे जोडले जातील यावर भर दिला. डॉ.दंडे यांच्या या कार्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप... ‘आरोग्यदायी जीवन’ ही मोठी देणगी समजली जाते. समाज हा व्यक्ती-व्यक्तिंचा असतो. त्यादृष्टीने विचार करायचा तर व्यक्तीगत आरोग्य उत्तम राखल्यास निरोगी ...