पोस्ट्स

डिसेंबर १७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमरण उपोषणाची तारीख ठरली

इमेज
  मनोज जरांगेची बीडमधून मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार बीड : आंदोलक यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. शांत असलेल्या मराठ्यांना डाग लागला असल्याचंही जरांगे म्हणाले. Click: ● *एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा* मनोज जरांगे काय म्हणाले? बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली. मराठा समाजानं शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेल

मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे : नरेंद्र जोशी

इमेज
  कर्तृत्ववान नरेंद्र मनोहरदेव जोशींचा शिक्षणप्रेमी परळीकरांनी केला भव्य हृद्य सत्कार मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे : नरेंद्र जोशी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील गणेशपार भागातील नरेंद्र मनोहरदेव जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्री कर निरीक्षकांच्या (STI) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.  नरेंद्रचे आणि संपूर्ण जोशी कुटुंबियांचे कौतुक करण्यासाठी शनिवार दि. 23/12/2023 रोजी येथील राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक येथे परळीकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नरेंद्रचा परळीकरांनी भव्य हृद्य सत्कार केला.  कर्तृत्ववान भूमिपुत्रांसाठी नेहमी एकत्र येणारे सुजाण परळीकर आजही लिंग, जात, धर्म, पक्ष भेद विसरून पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या नरेंद्र जोशींसाठी एकत्र आल्याचे चित्र सर्वांनी अनुभवले. Click: ● *एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा* टॉवर ते सावता माळी मंदिर

एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा

इमेज
  एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या रविवारी  नरेंद्र जोशीचा सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.       ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विश्वस्थ वे.शा.सं. मनोहर जोशी यांचे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात येणाऱ्या विक्री कर निरीक्षकांच्या (STI) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.यादैदिप्यमान यशाबद्दल  सकल ब्राह्मण समाजाकडून रविवार दि. २४ डिसेंबर सकाळी ११:०० वाजता स्व.मनोहरपंत बडवे सभागृह विठ्ठल रुक्मिणी मंदिर,देशपांडे गल्ली येथे चि.नरेंद्र मनोहर जोशी यांचा 'कौतुक सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सकल ब्रह्मवृंद, आप्तेष्ट,स्नेही यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आ

माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन

इमेज
  माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन परळी प्रतिनिधी. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद  निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.     विजयकुमार गंडले हे घाटनांदूर ग्रामपंचायत उपसरपंच होते.तसेच बीड जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.भारतीय दलित  पॅंथरच्या सामाजिक चळवळीत व  मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला होता. फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अशा या लढवय्या नेत्याचं शुक्रवार दि. 22 रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या  शनिवार दि. 23, रोजी सकाळी 11 वाजता भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विजयकुमार गंडले हे प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अज

गीता जयंती उत्साहात साजरी.

इमेज
  खोलेश्वर शैक्षणिक संकुल भारतीय संस्कृती जपण्याचे व रूजविण्याचे कार्य करते. :- प.पू.भारतानंदजी स्वामी खोलेश्वर शैक्षणिक संकुल,साहित्य निकेतन ग्रंथालय व गीता धर्म मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गीता जयंती उत्साहात साजरी अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  येथील खोलेश्वर शैक्षणिक संकुल,साहित्य निकेतन ग्रंथालय व गीता धर्म मंडळ यांच्या संयुक्त वतीने गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खोलेश्वर शैक्षणिक संकुलात सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने झाली. भगवद्गीता,  भगवान श्रीकृष्ण तसेच रामजन्मभूमी न्यासाकडून आलेला अक्षदा कलश यांचेही पूजन करण्यात आले. यावेळी श्री.नृसिंह सरस्वती वेदपाठशाळेचे श्री. नवनाथ जोशी गुरूजी व त्यांच्या शिष्यांनी ईशावास्योपनिषदाचे पठण केले. प्रमुख अतिथी प.पू.भारतानंदजी स्वामी यांचे स्वागत स्थानिक व्यवस्था मंडळ अध्यक्ष श्री.विजयराव वालवडकर व स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह श्री.किरणदादा कोदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. गीता जयंतीच्या निमित्ताने 700 विद्यार्थ्यांच्या सहभागाने गीतेच्या 700 श्लोकांचे लिखा

ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड तात्काळ द्या:- अनिल बोर्डे

इमेज
  ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड तात्काळ द्या:- अनिल बोर्डे              गेवराई:- ज्येष्ठ नागरिकांना  आयुष्यमान कार्ड तात्काळ देण्यात यावे यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ गेवराई व जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांची प्रत्यक्ष भेट घेतली व निवेदन सादर करण्यात आले. त्याची प्रत तहसीलदार गेवराई यांना देण्यात आली                              गेवराई शहरातील व तालुक्यातील बऱ्याच लोकांना आयुष्यमान कार्डचे वाटप अद्याप पर्यंत झालेले नाही ही बाब अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.                                        ज्येष्ठ नागरिकांना आपल्या रुग्णालयामार्फत आयुष्यमान कार्ड तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे रुग्णालयामार्फत जेष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजना सुरू केल्या आहेत त्याचा तात्काळ लाभ मिळावा व आपले रुग्णालय अद्यावत करण्यात यावे व सर्व मशिनरी सुस्थितीत असणे आवश्यक आहे याची काळजी घ्यावी.         तरी ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड पुरविण्याबाबत आपण जातीने लक्ष पुरवून कारवाई होणे अपेक्षित आहे अशी मागण

परळी दर्शन दिवाळी अंकाचे विमोचन जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग महास्वामीजींच्या हस्ते विमोचन

इमेज
  परळी दर्शन दिवाळी अंकाचे विमोचन जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग महास्वामीजींच्या हस्ते विमोचन परळी /प्रतिनिधी श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखीमठ ,उत्तराखंड    यांच्या हस्ते गुरुवारी  परळीतील दर्जेदार दिवाळी अंक परळी दर्शन अंकाचे विमोचन महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख सर, विश्वस्त अनिलराव तांदळे, अशोक स्वामी,मठपती गणेश स्वामी , सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, कमलाकरआप्पा हरेगावकर, महादेवअप्पा ईटके, मनोज एस्के, संतोष चौधरी, अ‍ॅड.मनोज संकाये, मंगलनाथ बँकेचे व्यवस्थापक गजानन हालगे, पत्रकार संजय खाकरे, संतोष जुजगर,  रमेश चौंडे, सुशील हरंगुळे, उमेश टाले, विनोद बांगर, शिरीष स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केदारपिठाचे जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग महास्वामीजींचे माजी नगरसेवक कमलाकरअप्पा हरेगावकर यांनी घेतले आशिर्वाद

इमेज
  केदारपिठाचे जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग महास्वामीजींचे माजी नगरसेवक कमलाकरअप्पा हरेगावकर यांनी घेतले आशिर्वाद परळी/प्रतिनिधी श्रीक्षेत्र केदारपिठचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे आज परळी शहरात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. याप्रसंगी त्यांचा शुभ आशीर्वाद परळीचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकरआप्पा हरेगावकर यांनी घेतले. यावेळी यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख सर, विश्वस्त अनिलराव तांदळे, अशोक स्वामी,मठपती गणेश स्वामी , सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, कमलाकरआप्पा हरेगावकर, महादेवअप्पा ईटके, मनोज एस्के, संतोष चौधरी, अ‍ॅड.मनोज संकाये, मंगलनाथ बँकेचे व्यवस्थापक गजानन हालगे, पत्रकार संजय खाकरे, संतोष जुजगर,  रमेश चौंडे, सुशील हरंगुळे, उमेश टाले, विनोद बांगर, शिरीष स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंत्यसंस्कार

इमेज
  अंत्यविधी करायचा कोठे ? ; मृतदेह ग्रामपंचायसमोर ठेवून नातेवाईकांचा चार तास ठिय्या   प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंत्यसंस्कार गेवराई : प्रतिनिधी....     गेवराई तालुक्यातील सुशी (वडगाव) गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. गुरूवारी एका ६० वर्षीय भूमीहीन व्यक्तीचे ह्दयविकाराने निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कोठे करायचे, म्हणत नातेवाईक व ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर सदरील मयत व्यक्तीचा मृतदेह ठेवून ठिय्या मांडला. यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. तब्बल चार तासानंतर या अधिकाऱ्यांनी गावालगत असलेल्या गावठाणची जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.      गेवराई तालुक्यातील सुशी (वडगांव) येथे स्मशानभूमी नाही. त्यातच गावालगत गावठाण जागा असताना देखील गावातील काही जणांकडून विरोध होत असल्याने अंत्यविधीसाठी नातेवाईकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान गुरूवारी या गावातील तुळशीराम आश्रुबा कनेढोण या व्यक्तीचा ह्दयविकाराने मृत्यु झाला. मयत कनेढोण हे भूमीहीन असल्याने अंत्यविधीसाठी जागा नाही. गावालगत शासनाच

अकलूजची तेजस्विनी केंद्रे प्रथम, नगरचा आकाश मोहिते द्वितीय, संभाजीनगरचा आदित्य दराडे तृतीय

इमेज
 "वैद्यनाथ"च्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक संभाजीनगरच्या पहाडे विधी महाविद्यालयाकडे  अकलूजची तेजस्विनी केंद्रे प्रथम, नगरचा आकाश मोहिते द्वितीय, संभाजीनगरचा आदित्य दराडे तृतीय      परळी वैजनाथ (दि.१९)-                  दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७४ व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून  जवाहर शिक्षण संस्थेच्या येथील वैद्यनाथ महाविद्यालयात आज (दि.१९) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा  उत्साहात संपन्न झाली. यात सांघिक पारितोषिक छत्रपती संभाजीनगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या  संघाने जिंकले .तर स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम पारितोषिक (₹ ७०००/-व स्मृतिचिन्ह) अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.तेजस्विनी नाथराव केंद्रे हिने पटकावले, द्वितीय पारितोषिक (₹ ५०००/- व स्मृतिचिन्ह) अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजचा विद्यार्थी आकाश दत्तात्रय मोहिते याने मिळवले, तर तृतीय पारितोषिक (₹३००० व स्मृतिचिन्ह) छत्रपती संभाजीनगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य ज्ञानेश्वर दराडे याने जि

श्री बजरंगबली वेताळ मंदिरात 25 डिसेंबरला श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन

इमेज
  श्री बजरंगबली वेताळ मंदिरात 25 डिसेंबरला श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा उपस्थित राहावे-प.पू.श्री विलासानंदजी महाराज परळी वैजनाथ/प्रतिनिधी श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे सोमवार दि.25 डिसेंबर 2023 रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळयाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे. शहरातील ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या श्री बजरंगबली वेताळ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त  दि.25 डिसेंबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.18 डिसेंबरपासून श्री दत्त पारायणास उत्साहात सुरुवात झाली असून 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. महाआरती होणार असून यानंतर दुपारी 1 ते 5 वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सर्व धार्मीक कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री बजरंगबली वेताळ मंदिर च्य वतीने संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी क

लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
  आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने स्पाइन केअर आणि पोश्चर ट्रेनिंग कोर्सचे आयोजन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्यावतीने 18 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, सांधेदुखी, पक्षघात व त्यामुळे आलेले स्नायू दुर्बलता यावर स्पाईन केअर म्हणजेच पाठीचा मणका आणि शरीर यासंदर्भात प्रशिक्षक डॉ. संगीता सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी 6.30ते 8.30 वाजेदरम्यान वैद्यनाथ महाविद्यालयात स्पाइन केअर आणि पोश्र्चर शिबीर होणार आहे. फक्त महिलांसाठी दुसरी बॅच दुपारी 4 ते 6 वाजेदरम्यान होणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा : 9860474821, 9561788501, 9923177587, 8308236796, 9270060669, 8787041322 असे आवाहन एओएल परिवारातर्फे करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत मान पाठ आणि मणके यांच्यासाठी स्वतःच करता येतील असे व्यायाम प्रकार सांगितले जाणार आहेत. शरीराची शास्त्रशुद्ध बैठक, अॅक्युप्रेशर, चालण्याची शास्त्रीय पद्धत, ध्यानधारणा, याद्वारे ताण तणावापासून मुक्ती, मन, शरीर प्

बळीराजा सुखी तर राज्यकर्ते सुखी; धनंजय मुंडेंनी सभागृहात वाचले छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र!

इमेज
  राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविण्याचे नियोजन सुरू - धनंजय मुंडेंची माहिती शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी राज्यात 'ड्रोन मिशन' राबवणार - मुंडेंची विधान परिषदेत घोषणा *शेतकऱ्यांना दोन्ही हातांनी देण्याची नियत असलेले हे सरकार आहे - धनंजय मुंडे* *नमो किसान महासन्मान, पीकविमा, अवकाळीचे अनुदान यांसह विविध योजनांची आकडेवारी धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत मांडली* बळीराजा सुखी तर राज्यकर्ते सुखी; धनंजय मुंडेंनी सभागृहात वाचले छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र! नागपूर (दि. 19) - शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांचे सरकार गेले, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि शिवरायांचे शेतकरी धोरण याला अनुसरून प्रामाणिक काम करणारे सरकार आहे. दोन्ही हातांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची नियत असलेले हे सरकार आहे, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत नियम 97 अंतर्गत चर्चेच्या उत्तराच्या निमित्ताने व्यक्त केले. राज्यात नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हफत्यापोटी 1720 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यामधील निकषांमुळे पात्र ल

नऊ दिवस होणार भक्तीचा जागर

इमेज
 श्री. योगेश्वरी देवीच्या महोत्सावास वर्णी महापुजेने प्रारंभ      अंबाजोगाई :-  महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव १९ डिसेंबर ते २६  डिसेंबर या कालावधीत होत आहे. मंगळवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. देवल कमेटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे  व सौ. मयुरी तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली.             मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला बसल्या असल्याची देवल कमिटीच्या वतीने देणयात  आली. मंगळवारी  सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहर वासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. या  वेळी झालेल्या महापूजेला  तहसीलदार विलास तरंगे  व सौ. मयुरी तरंगे  यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी  देवल कमिटीचे स

बीड -परळी महामार्गावर अपघातात: दोन ठार

इमेज
  बीड -परळी महामार्गावर अपघातात: दोन ठार बीड, प्रतिनिधी बीड परळी महामार्गावर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास उपळी येथून तरुणाने विषारी औषध प्राशन केले असता त्याला उपचारासाठी बीडकडे घेऊन जात असताना बीड कडून परळी महामार्गावर मैंदा पोखरी गावच्या नजीक ऊसाचे ट्रॅक्टर व स्विफ्ट डिझायर गाडीचा आपघात घडल्याची घटना पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे   या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने उपळी गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे सदरील अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर गाडी मधील  मयत झालेल्या रत्नमाला केशव पवार मुलगा प्रदीप केशव पवार राहणार उपळी तालुका वडवणी आसे मयत झालेल्याची नावे असून इतर जखमींना पिपंळनेर पोलिस कर्मचारी बहिरवाळ यांनी बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे  भाच्याला वाचवण्यासाठी घेऊन जाताना हा आपघात घडल्याची माहिती दिली आहे असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामाबाबत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

इमेज
बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामाबाबत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट   बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भात आज खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री श्री.नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात भेट घेतली. बीड आणि लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब या रस्त्याचे अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव पर्यंत चौपदरीकरण करण्यात यावे आणि सदरील कामाचा समावेश रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात करण्यात यावा अशी मागणी यावेळी गडकरी यांच्याकडे केली. मंत्री महोदयांनी देखील या मागणीची दखल घेऊन सदरील कामाचा मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समावेश करण्याचा विश्वास दिला. दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा-पोहनेर या रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर दिल्याबद्दल यावेळी त्यांचे खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी आभार मानले.

ग्रामीण पोलिसांची कारवाई: पाच हजाराची दारु जप्त

इमेज
  ग्रामीण पोलिसांची कारवाई: पाच हजाराची दारु जप्त  परळी (प्रतिनिधी)  परळी ग्रामीण पोलिसांनी परळी-नंदागौळ व परळी- धर्मापुरी मार्गावरील ढाब्यावर छापा टाकत अवैधपणे विक्री करण्यात येत असलेली 5 हजार 160 रुपयांची देशी व विदेशी दारु जप्त केली.  परळी तालुक्यात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत धाब्यावर अवैधपणे दारु विक्री होत असल्याची माहिती मिळताच पो.नि.हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जाधव,पोउपनी झाबरे,पोह. सुंदर केंद्रे,पोशी.आश्रुबा नागरगोजे,पोशी आडे यांनी परळी-नंदागौळ मार्गावरील  ढाब्यावर छापा टाकत देशी व विदेशी अशी 3920 रुपयांची तर परळी- धर्मापुरी मार्गावरील  ढाब्यावरुन 1260 रुपयांची दारु जप्त केली.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर

इमेज
  राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, 1700 कोटींचे वाटप तर उर्वरित 500 कोटींचे वाटप सुरू - धनंजय मुंडे धुळे जिल्ह्यातील लक्षवेधी सुचनेवर धनंजय मुंडेंचे उत्तर, धुळ्यात आतापर्यंत 69 कोटी अग्रीम मंजूर, विम्याची रक्कम आणखी वाढणार नागपुर (दि. 18) - प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम 25% अंतर्गत आतापर्यंत 2206 कोटी रुपये अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे व उर्वरित सुमारे 500 कोटी रुपयांचे वाटप प्रगतीपथावर असल्याची माहिती लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.  धुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला नसल्याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, यावरून धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्ह्यातील वस्तुस्थिती दर्शक आकडेवारी विधानसभा सभागृहात सादर केली. धुळे जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्

1 ते 15 जानेवारी दरम्यान लोकोत्सव ,जनसंपर्क अभियान राबवणार

इमेज
  अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचे वैद्यनाथाच्या परळीत भाविकांकडून उत्साहात स्वागत 1 ते 15 जानेवारी दरम्यान लोकोत्सव ,जनसंपर्क अभियान राबवणार  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          येत्या 22 जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या अनुषंगाने देशभरात सर्वत्र आयोध्या येथील अभिमंत्रित करण्यात आलेल्या अक्षता कलशाचे आगमन शहरा शहरात होत आहे. आयोध्येतून देऊन आलेल्या अक्षता कलशाचे आज पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाची नगरी असलेल्या परळी वैजनाथ येथे आगमन झाले.           या निमित्ताने औद्योगिक वसाहत येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात  आलेल्या अक्षता कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे एक ते 15 जानेवारी या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले. श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना हा लोकोत्सव व्हावा व या प्रतिष्ठापनेच्या वेळी स्वागत समारंभ, विविध उपक्रम, शोभायात्रा आदी नियोजन करण्यात आले. या मेळाव्याला परळी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक सर्व शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थ

गोल्ड प्लस निपाणी रसाई मॅराथॉन स्पर्धेत कू निकीता म्हात्रे ला सुवर्ण पदक

इमेज
  गोल्ड प्लस निपाणी रसाई मॅराथॉन स्पर्धेत कू निकीता म्हात्रे ला सुवर्ण पदक सिरसाळा (वार्ताहर):- गोल्ड प्लस निपाणी रसाई मॅराथॉन  या स्पर्धेचे आयोजन आज दी. १७ डिसेंबर रविवार रोजी निपाणी कर्नाटक येथे करण्यात आले होते. ही मॅराथॉन स्पर्धा *१०  की. मि.* या प्रकारात घेण्यात आली. या मॅराथॉन स्पर्धेत *कू. निकिता म्हात्रे* (बी ए द्वितीय वर्ष, श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालय सिरसाळा) हिने *सुवर्ण* पदक (गोल्ड मेडल) पटकावले. या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूस १०,०००/- रूपये रोख  व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आले.  त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम साहेब, सचिव, योगेश भैय्या कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.

पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन

इमेज
  संतवीर ह भ प बंडा महाराज कराडकर यांनी घेतलं प्रभू वैद्यनाथाचे दर्शन   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार संतवीर ह भ प बंडातात्या महाराज कराडकर यांनी आज परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.      संतवीर बंडा महाराज कराडकर हे एका कार्यक्रमानिमित्ताने परळी भागात आले असताना त्यांनी आवर्जून बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिरात येऊन वैद्यनाथ प्रभूंचे मनोभावे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वीच बंडा महाराज कराडकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले . या आजारातून बरे झाल्यानंतर प्रथमच ते परळी वैजनाथ येथे आले होते. परळी वैजनाथ येथे त्यांनी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.  

वैद्यनाथ महाविद्यालयात मंगळवारी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

इमेज
  वैद्यनाथ महाविद्यालयात मंगळवारी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा                  परळी वैजनाथ, दि.१७- ‌.   ‌.   ‌.                             दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७४ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात  मंगळवारी (दि.१९) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.        या स्पर्धेकरिता *"आजची आंदोलने राष्ट्रहितास तारक की मारक ?"* हा विषय ठेवण्यात आला आहे. इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व वयाची मर्यादा २२ वर्षाच्या आत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या एका संघास या स्पर्धेत सहभाग घेता येईल. संघातील एका विद्यार्थ्यास विषयाच्या अनुकूल बाजूने तर दुसऱ्या विद्यार्थ्यास प्रतिकूल बाजूने विचार मांडण्याकरिता सात मिनिटांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या वाक्पटूंना रु.७००० (प्रथम), रु.५००० (द्वितीय), रु.३००० (तृतीय )  व रु.१००० (उत्तेजनार्थ) व यासोबत स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सर्वाधिक गुण मिळवलेल्