पोस्ट्स

खासदार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर

इमेज
  अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने पाचशे ब्यानव कोटींचा निधी थकवला थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत रेल्वे विभागाचा खुलासा बीड । दि. ०१ । केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार जवाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाचा पाचशे ब्यानव कोटी रुपयांचा निधी थकवला आहे.तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठी खीळ बसली आहे, हा थकीत निधी प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकतो. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे , जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अतिरि

MB NEWS-शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा

इमेज
  शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा मुंबई..... शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या विरुद्ध ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला. आमचे हिंदुत्व हे शेंडी- जानव्याचे नाही, असे राऊत यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरून खासदार राऊत यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा अहमदनगरमध्ये राऊत यांच्या विरुद्ध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण संघाने दिला होता. आता खासदार राऊत यांनी माफी मागितली असुन हा ब्राह्मण समाज एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया पदाधिकारी यांनी दिली. Video          केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे  यांच्यावर नाभिक समाजाच्या नाराजीचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला. "आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही', या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा अहमदगरमध्ये त्यांच्याविरूदध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात ये