MB NEWS-स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !* *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_*

* स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट !* *_ गुन्हा दाखल करण्याची परळीत सावकरप्रेमींची मागणी_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आज ऐन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी (दि.२६) अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला. या प्रकाराचा सर्वस्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषां बद्दल अपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले. परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देऊन तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आपला रोष व्यक्त करत याप्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प...