
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील एकमेव असलेल्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे - देशमुख यांची नुकतीच निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या दिवंगत प्राचार्या डॉ रेखा परळीकर यांचे निधन झाल्याने हि जागा रिक्त झाली होते. यानंतर गेली दोन वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासनाच्या परवानगी नंतर प्राचार्यपदाची भरती करण्यात आली. या प्राचार्य पदाच्या भरती प्रकियेतील निवड समितीने प्राचार्य म्हणून डॉ विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड केली. विद्याताई देशपांडे यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार गुरुवारी (ता.१५) स्विकारला. प्राचार्यपदी विद्याताई देशपांडे यांची निवड झाल्याबदल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख,...