MB NEWS-गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांची एकमताने गटनेतेपदी निवड

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांची एकमताने गटनेतेपदी निवड गुजरातमध्ये मोठा विजय मिळविल्यानंतर भाजपच्या आमदारांची आज ( दि. १० ) पक्षनेता निवडीसाठीची बैठक पार पडली. या वेळी भूपेंद्र पटेल यांची एकमताने गटनेतेपदी निवड झाली. भूपेंद्र पटेल यांनी आज राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते सरकार स्थापनेचा दावा करतील, असा अंदाज मानला जात होता. आमदारांच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड झाल्याने मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या बैठकीला नवनिर्वाचित आमदार तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप निवडणूक समितीचे नेते बीएस येडियुरप्पा आणि गुजरात युनिटचे प्रमुख सीआर पटेल उपस्थित होते.