MB NEWS-परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन

परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी परळीची कन्या कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने 36 व्या नॅशनल स्पोर्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि ऑलम्पिक मध्ये स्थान मिळवले त्याबद्दल प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी तिचे अभिनंदन केले आहे. अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने स्केटबोर्डिंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघात तिची निवड झाली. तिने कमावलेले यश जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने इतिहास रचून परळीचे नाव जगभरात पोहोचवले. अशी प्रतिक्रिया व्यक्त करून प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी तिचे कौतुक केले. Click- संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड* परळीतील श्रद्धा गायकवाड ही पहिलीच ऑलम्पिक मध्ये जाणारी खेळाडू म्हणून तिने ...