पोस्ट्स

फेब्रुवारी १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:दुर्दैवी आपघात: आजोबाला दवाखान्यात घेऊन जाताना काळाचा घाला

इमेज
  दुर्दैवी आपघात: आजोबाला दवाखान्यात घेऊन जाताना काळाचा घाला    गंगाखेड.....राजुर मर्डसगाव मार्गे गंगाखेड येथे येणारी मोटरसायकल व कळंब नांदेड या बसचा समोरासमोर अपघात झाल्याने मोटार सायकल वर असणारे आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.     पालम तालुक्यातील रावराजुर येथील शिवाजी किसनराव शिंदे वय 75 यांना दवाखान्यात उपचारासाठी नातू श्रीनिवास कल्याणराव शिंदे वय 19 हा मोटरसायकल वर गंगाखेड येथे घेऊन जात असताना कळंब नांदेड ही बस गंगाखेड वरून पालम कडे जात असताना मोटर सायकल असणारे दोघेजण बसच्या उजव्या चाकाखाली आल्याने अपघातात मृत्यू झाल्याची घटना सकाळी 9:30 ते 9:45 दरम्यान घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पोलीस उपनिरीक्षक बुधोडकर यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळावरून दोन्ही मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सेवाविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. 

MB NEWS:कर्ज कसे फेडायचे ?विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  कर्ज कसे फेडायचे ?विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या गेवराई.....   सततची नापिकी त्यात खासगी सावकाराचे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? या चिंतेतून एका 42 वर्षे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दि.25 रोजी  सकाळी तालुक्यातील रांजणी येथे उघडकीस आली.       गेवराई तालुक्यातील रांजणी येथील अशोक सुखदेव औंढकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्री त्यांनी  लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच बिट अमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अशोक औंढकर यांच्याकडे खासगी सावकारासह बँकेचे कर्ज आहे. ते कर्ज कसे फेडायचे? या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, आई- वडिल, एक बहिण असा परिवार आहे.

MB NEWS:युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

इमेज
  युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या  गेवराई,  तालुक्यातील मालेगाव येथील सतीश चंद्रभान जराड वय.३० या शेतकऱ्याने आज दि.२५ रोजी दुपारी स्वतःचे शेतात जाऊन विश प्रशासन करून आत्महत्या केली.    तालुक्यातील मालेगाव येथील सतीश चंद्रभान जराड वय वर्ष  ३०   शेतकऱ्यांनी आज दिनांक २५ रोजी दुपारी स्वतः शेतात जाऊन विश  प्रशासन करून आत्महत्या केली असून आत्महत्या चे कारण मात्र समजू शकले नाही याप्रकरणी आत्महत्याचे झाल्याचे समजताचचकलंबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उमापूर या ठिकाणी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद चकलांबा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

MB NEWS:सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय

इमेज
  गुरू श्रद्धेचे स्थान,गुरु असे महान, सकल जगी ; उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज  - सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय  निटूर / लातूर  : प्रतिनिधी सुख दुःख प्रश्न गुरु जवळ मांडा. सर्व प्रश्नांची उत्तरे गुरूकडे असतात. गुरुच्या सानिध्याने तुमच्यातील राग ,लोभ, मोह, माया,द्वेष कमी होत असतो, गुरु स्वत्वाची जाण ,गुरु श्रद्धेच स्थान! गुरु असे महान !सकल जगी !!कारण गुरु हे माऊली असतात.आई नंतर गुरूंनाच आपण माऊली म्हणतो तपोनिधी सांब महाराज पशू आणि मानवावर सारखेच प्रेम करत असत.ते प्रत्यक्षात मृत्युंजय होते.विद्येच्या जोरावर त्यांनी हजारो रूग्णांना प्लेग सारख्या महाभयंकर आजारातून बरे केले..आज इथून जाताना सद्विचार,आचार घेऊन जा.अंतःकरणातून भक्ती करा. असे आवाहन उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज यांनी आशिर्वचनश दरम्यान  उपस्थित महीला पुरूष भाविकांना केले. षटस्थल ब्रह्मी १०८ श्री तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांचा १३३ वा जन्मोत्सव शनिवार दि.२५ फेब्रुवारी जन्मोत्सव दिनी आशिर्वचन दरम्यान ते निलंगा तालुक्यातील निटूर येथे बोलत होते.हा जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी भव्य

MB NEWS:कामगार साहित्य संमेलन मिरज

इमेज
  माणसातील सृजनशक्ती असे पर्यंत साहित्यही असणार  संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण कामगार साहित्य संमेलन मिरज नमस्कार! महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कामगार मंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा आणि कामगार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.नामदार डॉ.श्री.सुरेश (भाऊ) खाडे साहेब, संमेलनाचे उद्घाटक नवभारत या वैचारिक नियतकालिकाचे विद्यमान संपादक, इतिहास अभ्यासक आणि माझे स्नेही डॉ. राजाभाऊ दीक्षित, कामगार विभागाच्या प्रधान सचिव मा.विनिता वेद-सिंगल, कामगार कल्याण आयुक्त मा.रविराज इळवे व मंचावरील सर्व मान्यवर आणि मित्र मैत्रिणीनो. आजच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित साहित्य संमेलन अध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल धन्यवाद. पण यासाठी माझी निवड का केली हे मात्र मला अजून कळत नाही. मात्र मला निमंत्रण देण्यासाठी प्रथम दूरध्वनीवरुन संपर्क साधणारे आणि नंतर घरी येऊन निमंत्रित करणारे मा.रविराज इळवे साहेब यांच्या परम सौजन्यशील बोलण्या वागण्याने मी सहजपणे होकार दिला. हे संमेलन कामगारांच्या साहित्यासंदर्भात आहे हे सूत्र धरुनच मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. पण साहित्य, मग ते कोण

MB NEWS:शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांना पितृशोक

इमेज
  जगदीश लालाजी परदेशी यांचे दुख:द निधन; आज अंत्यसंस्कार शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांना पितृशोक परळी वैजनाथ/ प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता  निधन झाले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत. बसवेश्वर कॉलनी भागातील रहिवासी तथा उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे आज शनिवारी निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्ष वयाचे होते. जगदीश परदेशी हे अत्यंत मनमिळावू व सुस्वाभावी असल्याने सर्व परिचित होते. विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असत. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दरम्यान जगदीश बालाजी परदेशी यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता बसवेश्वर कॉलनी समता नगर रेणुका माता मंदिर जवळ या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा सार्वजनिक स्मशान भूमी येथे निघणार आहे.

MB NEWS:यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत रविवारी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन

इमेज
  यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत रविवारी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.२४- यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथच्या वतीने रविवार दि.२६ रोजी सामुहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे.बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराजांच्या आज्ञेने यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत मासिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन केले जाते. रविवार दि.२६ रोजी दुपारी ४.३० वा. देशपांडे गल्लीत असलेल्या मनोहरपंत बडवे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हवनासाठी बसणाऱ्या भक्तांनी सोबत कोणतीही हवन सामग्री आणू नये याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.या सामूहिक श्रीसूक्त हवनासाठी शिष्य वर्ग व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MB NEWS:२७ फेब्रुवारी पासून सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संपावर जाणार !

इमेज
२९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालक ०१ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडकणार ! संगणकपरिचालकांना  ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी – सिद्धेश्वर मुंडे २७ फेब्रुवारी  पासून सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संपावर जाणार ! मुंबई (प्रतीनिधी) ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून ११ वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना करत असुन याच मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणकपरिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संप करणार असून १ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे. Click : वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून केंद्र सरकाराच्या सुचीत.......            याबाबत सविस्तर वृत्त की,संग्राम व आपले सरकार या दोन

MB NEWS:विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी श्री. दत्तात्रय गुट्टे यांची निवड

इमेज
  विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी श्री. दत्तात्रय गुट्टे यांची निवड  परळी ( प्रतिनिधी)विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित परळी वैजनाथ जिल्हा बीड  संस्थेच्या पदीधिकारी  निवडीची प्रक्रिया  दिनांक 23.02.2023 रोजी प्राधिकृत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एन. एन. पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. Click : वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून केंद्र सरकाराच्या सुचीत.......  नवनिर्वाचित संचालकांमधून श्री. दत्तात्रय दादाराव गुट्टे यांची अधक्षपदी व श्री. बळीराम लक्ष्मण गित्ते, यांची   उपाध्यक्ष पदी व श्री प्रदीप संभाजी बिडगर यांची सचिव पदी  व कोषाध्यक्ष पदी श्री. हनुमंत  श्रीराम फड यांची खेळीमेळीच्या वातावरणात बिन विरोध निवड झाली. उपस्थित सर्व संचालक सभासद व कर्मचारी यांनी निवडून आलेल्या पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यमान चेअरमन दत्तात्रेय गुट्टे  यांनी  संचालक व सभासद  यांचे आभार मानले. श्री दत्तात्रय गुट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. -------------  video news  ---------------- -------------  vide

MB NEWS:संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्वच्छता दुत व स्वच्छतेची चळवळ राबवणारे राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.                 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, न्यु हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शेंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी गाडगेबाबा यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी श्री.शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला. कार्यक्रमास प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा.डॉ जोशी, प्रा.इथापे, प्रा.डॉ यल्लावाड, प्रा.डॉ कवडे, प्रा.डॉ देशपांडे, प्रा.डॉ नेरकर, प्रा.फुटके, कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांच्यासह महाविद्यालयातील प्राधापक, शि

MB NEWS:खा.प्रितमताई मुंडे यांच्या अभ्यासू आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने रेल्वे कृती समिती आश्वस्त

इमेज
खा.प्रितमताई मुंडे यांच्या अभ्यासू आणि  सातत्यपूर्ण पाठपुराव्याने रेल्वे कृती समिती आश्वस्त रेल्वेसाठी अर्थसंकल्पात चारशे कोटींची तरतूद ; कृती समितीने मानले खा.ताईंचे आभार बीड । दि . २३ । बीडकरांच अनेक दशकांपासूनच रेल्वेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचा परिपाक रेल्वे प्रकल्पाच्या गतिशील उभारणीतून दिसतो आहे. रेल्वे कृती समितीला देखील त्यांच्या रेल्वेविषयक जिव्हाळ्याच्या काल प्रत्यय आला, नगर-बीड-परळी रेल्वे विषयक सर्व बाबींचा सखोल अभ्यास, प्रकल्पाच्या प्रगतीची मुद्देसूद मांडणी आणि भूसंपादन व निधी बाबतच्या पूर्ण माहितीनिशी अभ्यासपूर्ण मांडणीने कृती समितीला त्यांच्या विविध मागण्यांबाबत आश्वस्त केले. बीड येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयात काल माजी सैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-बीड-परळी रेल्वे संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देऊन खा.प्रितमताई मुंडे यांच्या समक्ष मागण्यांची मांडणी केली. यावेळी कृती समितीच्या मागण्यांवर खा.प्रितमत

MB NEWS:परळी तालुक्यातील दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव व साहीत्य नोंदणीस प्रतिसाद

इमेज
  परळी तालुक्यातील दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव व साहीत्य नोंदणीस  प्रतिसाद परळी  सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद बीड, यशवंतराव चव्हाण सेंटर, महात्मा गांधी सेवा संघ व जिल्हा पुनर्वसन केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव, साहीत्य साधानांसाठी नोंदणी व तपासणी शिबीराचे आयोजन आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी उपजिल्हा रूग्णालय परळी वै. येथे करण्यात आले. प्रारंभी शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा. धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिल गुट्टे, डॉ. व्यंकटेश तिडके, महात्मा गांधी सेवा संघाचे ऋषी सलगर, शेख निजाम भाई, परिचारीका मनिषा महाडकर, स्वाती जगतकर, शेख फेरोज भाई, विठ्ठल साखरे, मानव विकास मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. के. चव्हाण, अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. पी. लोढा आदींची प्रमुख उपस्थिती होती

MB NEWS:राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम दिव्यांग कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार

इमेज
राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम दिव्यांग कर्तृत्ववान व्यक्तींचा  सत्कार  परळी वै:-                  राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त, शहरातील रामदेवबाबा मंदिर सभागृहात, संत गाडगेबाबा उत्सव समितीच्या  वतीने,कर्तृत्ववान दिव्यांग व्यक्ती हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव समितीचे मुख्य संयोजक डॉ सुरेश चौधरी यांच्या सूचनेनुसार, व्यासपीठावर आमंत्रित दिव्यांग व्यक्तींना मान देत,कार्यक्रमाची सुरुवात, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन,डॉ. सुरेश चौधरी, भाजपचे जेष्ठ नेते दत्तप्पा ईटके,प्रा. माधव रोडे,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बहुद्दर भाई ,नाणेकर सर,मार्केट कमिटी सचिव बलविर रामदासी,जेष्ठ नेते विश्वनाथ गायकवाड,मनसे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर,नरेश हालगे,वैजनाथ बागवले शिवसेनेचे बालासाहेब देशमुख, संजय कदम गावडे, यांच्या सह ईतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ सुरेश चौधरी यांनी कार्यक्रमा मागील भूमिका सविस्तर विशद करताना म्हणतात की काम कारण्याची लाज नको आणि लाज वाटण्यासारख काम नको. हे त्यांचे ब्रीदवाक्य तरुणांना कर्तृत्वान आणि चरित्र्यवान बन

MB NEWS:स॔त तुकाराम महाराज बीजेनिमित्त 14 गावं एकत्र :शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन

इमेज
  संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त 14 गावं एकत्र:शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन  परळी / प्रतिनिधी  जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त 14 गावांनी एकत्र येऊन भव्य शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या तयारीची बैठक कान्नापूर ता. धारुर येथे संपन्न झाली. तुकाराम महाराज यांच्या जीवनाच्या  विविध पैलूंवरचे दर्शन यावेळी होणा-या कीर्तन आणि व्याख्यानातून होईल, अशी माहिती समन्वयक ॲड.अजय बुरांडे यांनी दिली. तुकाराम महाराज यांच्या बीजेचे औचित्य साधून 3 मार्च ते 9 मार्च दरम्यान कन्नापूर परिसरातील 14 गावांच्या वारकरी, शेतकरी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात विजय महाराज गवळी, मधुकर महाराज बारुळकर, नाना महाराज कदम, जलाल महाराज सय्यद, ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज बंडगर, शामसुंदर महाराज सोन्नर यांची कीर्तने होणार आहेत. तर सचिन पवार, रामेश्वर त्रिमुखे, श्री संत कैकाडी महाराज यांचे वंशज भारत महाराज जाधव, डाॅ. बालाजी जाधव, श्रीकृष्ण महाराज उबाळे, विकास महाराज लवांडे यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच तुकाराम महाराजांच्या गाथे