MB NEWS-विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक

विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक परळी दि. ६ ऑक्टोबर..... महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींसाठी ऑनलाईन कामगार काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर २१ रोजी करण्यात आले होते. औरंगाबाद, लातूर व नांदेड या गटातून ३६ कवींच्या प्रवेशिका आल्या होत्या. पैकी ३२ कामगार कवींनी कवितांचे सादरीकरण केले. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकाहून एक सरस सुंदर कविता कामगार कवींनी सादर केल्या. कामगार कवींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींची काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न केले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रूपये २ हजार, द्वितीय पारितोषिक १ हजार पाचशे, तृतीय पारितोषिक १ हजार आणि उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजय कुमार पांचाळ औरंगाबाद, तृती...