देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव

देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव परळी / प्रतिनिधी देवाच्या नावाने चालणारे अनेक कीर्तन महोत्सव पाहिले, परंतु शेतक-यांच्या नावाने सुरू असलेला हा एकमेव कीर्तन महोत्सव आहे, असा सूर शेतकरी कीर्तन महोत्सवात आलेल्या सर्व वक्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. ख-या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची ही सुरूवात म्हणता येईल, असे मतही अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. शेतकरी केंद्र स्थानी ठेऊन 21 गावातील लोकांच्या सहकार्यातून सुरू केलेल्या कीर्तन महोत्सवाचा दुसरा दवस विविध उपक्रमाने संपन्न झाला. सकाळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही सहभागी झाली होती. ●●●●●●●●●●●●● *सुविधा वाढल्या,समाधान हरवले - डाॅ. हमीद दाभोळकर* जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अनेक सुविधा वाढल्या आहेत. सुविधा वाढल्या असल्या तरी माणूस समाधानी झाला नाही उलट तो अधिक तणावात गेला आहे. विशेषतः 15 ते 35 वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिडताना दिसत आहे. त्यातून ...