श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू

जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू भाविकांतून मागणी आली: परळीतून ' धनुभाऊंनी' लगेच बस सुरु केली परळी (प्रतिनिधी).... परळी ते कपीलधार बससेवा सुरू करण्याची भाविकांतून मागणी करण्यात आली होती.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन करण्यात आले होते.या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधितांना ही बससेवा सुरु करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे परळी येधे अनुष्ठानाला आलेल्या श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवेचा प्रत्यक्ष शुभारंभही करण्यात आला आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा) नियमित थेट बससेवा सुरू करण्याचा शुभारंभ शनिवार दि.22जुलै रोजी श्रीश्रीश्री 1008 सूर्य सिंहासनाधिश्वर जगद्गुरू डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज,सोनपेठ,अमृतेश्वर शिवाचार्य महाराज,जिंतूर,शंभूलिंग शिवाचार्य महाराज,अंबाजोगाई यांची प्रमुख उपस्थिती होती.परळी-कपीलधार थेट बससेवेची मागणी श्...