MB NEWS:सोमवारच्या आंदोलनात उसतोड कामगारांनी सहभागी व्हावे- काॅ.सुदाम शिंदे

सोमवारच्या आंदोलनात उसतोड कामगारांनी सहभागी व्हावे- काॅ.सुदाम शिंदे परळीवै(प्रतिनिधि) .... ऊसतोडणी कामगार वाहतुकदार, मुकादम च्या विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील गावा-गावत सोमवार दि 21 रोजी होणाऱ्या आंदोलनात वाहतूकदार, मुकादम व उसतोडणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिटु संलग्न असलेल्या उसतोडणी कामगार संघटनेचे कॉ सुदाम शिंदे यांनी केले आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत व वाहतूकदारांच्या दरात वाढ करावी व मुकादमाच्या कमिशन मध्ये वाढ करावी. नवीन त्रिपक्षीय करार करावा. वाहतुकीचे दर डिझल दरवाढी नुसार करावे. मुकादमचे कमिशन 35% करावे. उसतोड़नी कामगार महामंडळची अंमलबजावणी करावी यासह उसतोडणी मजुरांच्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी परळी तालुक्यातील सिरसाळा, मोहा, करेवाडी, गर्देवाड़ी, कावळेवाडी, मांडेखेल, माळहिवरा, भिलेगाव, वाघाळा, बोधेगाव, यासह इतर गावातील ग्रामपंचायतीसह प्रशासकीय कार्यालयसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात वाहतूकदार, मुकादम व उसतोडणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिटु संलग्...