पोस्ट्स

ऑक्टोबर ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-२२ वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

इमेज
  २२ वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या  गेवराई :  तालुक्यातील धोंडराई येथील २२ वर्षीय तरूणाने शनिवार रोजी दुपारी शहरा जवळील बायपास जवळील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढिल तपास पोलिस करत आहेत.      मयुर हजारे वय २२ राहणार धोंडराई असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नावं असुन त्याने शनिवार रोजी दुपारी शहरा जवळील बायपास जवळील एका शेतातील झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन याचा तपास साजेद सिद्दीकी हे करत आहेत.

MB NEWS-पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा

इमेज
  पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा परळी / प्रतिनिधी सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना पिक विमा देण्यात यावा व अतिवृष्टीगस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. दि 11 ऑक्टोबर पासून सातत्याने परळी तालुक्यातील विविध महसूल मंडळात अतिवृष्टी होत आहे. यामुळे काढणीस आलेले काढून ठेवलेले सोयाबीन, बाजरी, इत्यादी पिकांचे तसेच वेचणीस आलेल्या कापसाचे तसेच पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते आणखीही पाऊस असाच पडत पडणे सुरूच आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे काढणी अगोदर, काढणी समयी, वा काढणी पश्चात झालेल्या नुकसाना संदर्भातील तक्रारी 72 तासाच्या आत दाखल केलेल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण व तक्रारींचे व्यापकप्रमाण पहाता पिकपंचनाम्यांच्या फेन्यांत वेळ काढू धोरण अवलंबता" च्या आधारे तातडीने अडचणीतल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे वाटप करावे व शासनाकडूनही या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मदत द्यावी. महावेब पोर्टल वरील पावसाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असली तरी ...

MB NEWS-.भ.प. बंडातात्या कराडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट

इमेज
ह.भ.प. बंडातात्या कराडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट वारकरी संप्रदायातील अग्रणी कीर्तनकार व वेळोवेळी वारकऱ्यांच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका घेणारे संतवीर ह भ प बंडा महाराज कराडकर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत   ज्येष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील अग्रणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.पंढरपूर येथून वाहणारी चंद्रभागा,आळंदी येथून वाहणारी इंद्रायणी व कृष्णा कोयना या नद्यांमध्ये होत असलेले वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.

MB NEWS-पुरात वाहून गेलेल्या रईस अन्सर आतर युवकाचे प्रेत अखेर सापडले

इमेज
  पुरात वाहून गेलेल्या रईस अन्सर आतर  युवकाचे प्रेत अखेर सापडले परळीच्या फायर ब्रिगेडच्या टीमने लावला प्रेताचा शोध  दिंद्रुड येथील तिन युवक एका पिकअप वाहनात अंबाजोगाई येथे फटाक्यांचा माल आणण्यासाठी जात असताना पुराच्या पाण्यात पिकअप वाहनासह बुडाले होते.यातील दोन युवकांना स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले मात्र एक युवक बेपत्ता झाला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी बेपत्ता तरुण शोधण्याचे काम केले मात्र त्यांना अपयश आले होते. शनिवारी सकाळ पासून दिंद्रुड येथील जवळपास 400 ते 500 तरुणांसह शोध कार्य सुरू असताना परळी येथील अग्निशमन दलाला प्रेत सापडण्यास यश आले आहे. रईस अन्सर आत्तार वय 35 वर्ष बेपत्ता युवकाचे नाव असून तो मृत अवस्थेत आज दुपारी दोन वाजता घटनास्थळापासून नजदीक अंतरावर एका बंधार्यातील गाळात अडकलेल्या अवस्थेत सापडला. अग्निशमन दलातील अधिकारी दिनेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांची टीम शनिवारी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान घटनास्थळावर पोहोचली होती. धारूर येथील तहसीलदार दत्ता भारस्कर नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध...

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नांमुळे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराला मिळाला १ कोटी ८६ लाखाचा निधी

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नांमुळे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराला मिळाला १ कोटी ८६ लाखाचा निधी संरक्षक भिंतीसह मंदिरातील मूर्ती शिल्पांवर होणार रासायनिक प्रक्रिया मंदिरासाठी मंत्री असतांनाही दिला होता ५ कोटीचा निधी परळी वैजनाथ । दिनांक १४। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे धर्मापूरी येथील प्राचीन केदारेश्वर मंदिरातील मूर्तीशिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करणे आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी  पर्यटन खात्याने १ कोटी ८६ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.    तालुक्यातील धर्मापूरी येथे प्राचीन केदारेश्वर मंदिर आहे, या वास्तुची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने  पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असतांना पर्यटन खात्याकडून  मंदिराच्या पूनर्निर्माणासाठी ५ कोटीचा निधी दिला होता, त्यातून बरीचशी कामे देखील झाली. मंदिरात अनेक प्राचीन शिल्पं, मूर्त्या आहेत त्याचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आता पुन्हा एकदा पंकजाताईंनी पर्यटन विभागाला सांगून १ कोटी ८६ लाख ४८ हजार रूपये मंजूर करून दिले आहेत. यातून राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या मूर्ती शिल्पांवर रासायनिक प्रक्रि...

MB NEWS- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

इमेज
धनंजय मुंडेंची सरकारला भावनिक साद ! अन्नदाता बळीराजा संकटाने मोडून पडलाय, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे - धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट परळी (दि. 15) - मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस यांसह तूर मूग उडीद अधिक खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील पावसाने निर्माण केलेल्या या विदारकदृश्याची पाहणी करायला या असे नम्र आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. सोयाबीनचे खळे सुरू असताना आलेल्या तुफान पावसामुळे एक शेतकरी कुटुंब पाण्यात भिजत असलेले सोयाबीन गोळा करून टोपलीत भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला असून पाण्यात वाहणारी सोयाबीन गोळा करताना व काळ्या पडलेल्या कापसाच्या एका एका झुडपाकडे पुन्हा पुन्हा वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल; असेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटले आहे....

MB NEWS-संघर्ष योद्धा - ॲड.माधव जाधव वंचित, उपेक्षित आणि गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारं खंबीर नेतृत्व

इमेज
  संघर्ष योद्धा - ॲड.माधव जाधव वंचित, उपेक्षित आणि गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारं खंबीर नेतृत्व एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या जिद्द, चिकाटी, मुत्सद्दीपणा उराशी बाळगून आपल्या मेहनतीच्या आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर अंबाजोगाई आणि परळी परिसरात न्यायालयीन, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वबळावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या घाटनांदूरच्या भूमीपुत्राला अर्थात ॲड.माधव जाधव यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!! *मोडलेल्या माणसांचे, दुख ओले झेलताना...* *अनाथांच्या उशाला, दिप लावु झोपताना...* *कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना...* *दु:ख ओले दोन आश्रु, माणसांचे माणसांना...*       या सुवचनाची जाणीव असलेल्या; ॲड.माधव जाधव यांनी बालवयात स्वत: प्रतिकुल व विषम परिस्थितीचा अनुभव घेतला असल्याने सामाजिक जाणिव समोर ठेवून जय भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. गतकाळात अनेक वर्षे घाटनांदूरच्या सर्व शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना दिलेली वृक्ष संवर्धन शिष्यवृत्ती, ज्यांत गणवेश, स्कुलबॅग, वह्या, कंपास...

MB NEWS- *सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने !*

इमेज
 *सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने ! परळी वैजनाथ :- दिपावलीसाठी सातव्या वेतन आयोगा च्या फरकाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून  नगर परिषद सेवा निवृत कर्मचाऱ्यांनी आज  (14 ऑक्टोबर) रोजी निदर्शने  केली. हे सेवा निवृत कर्मचारी  17ऑक्टोबर  पासून न.प. कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन  करणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी खाडे यानी पत्राद्वारे दिली आहे.           सेवानिवृत कर्मचाऱ्यांची सेवा उपदान व रजारोखीकरण रक्कम मिळावी म्हणून 18.7.22 रोजी दिवसभर उपोषण आंदोलन केले होते. आंदोलनातील दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी रक्कम दिली नाही. लेखी आश्वासनाची पूर्तता करा म्हणून 10 आगस्ट रोजी पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. आश्वासन न पाळणारे मुख्याधिकारी परळी शहराला पहिल्यांदाच मिळाले आहेत.याबाबत  सेवानिवृत कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे.18.7. 22 रोजी दोन महीन्यात 7 व्या वेतनाचा दुसरा हप्...

MB NEWS-कासारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची विज्ञान सेंटरला भेट

इमेज
  कासारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची विज्ञान सेंटरला भेट                  परळी वैजनाथ.....       स्वतः करून पाहता येतील- हाताळता येतील असे मोठे प्रयोग, आकर्षक वाटतील असे त्यांना देण्यात आलेली रूपे, संकल्पना सहज स्पष्ट होतील अशा पद्धतीने त्यांची करण्यात आली रचना, निवेदकाची मुलांना खिळवून ठेवण्याची पद्धत यामुळे परभणी जिल्ह्यातील पालम/गंगाखेड जवळील केरवाडी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली!      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग अधिक सहजपणे, सोप्या पद्धतीने समजावेत, त्यातील संकल्पना, सिद्धांत लक्षात यावेत यासाठी डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट दिली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या 45 विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत विविध असे 100 च्या जवळपास प्रयोग करून पाहिले.  शाळेमध्ये शालेय मंत्...

MB NEWS-बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा नवीन सरकारचा विक्रम

इमेज
  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा नवीन सरकारचा विक्रम  *अतिवृष्टी निकषात न बसलेल्या नुकसानीपोटी 9 जिल्ह्यांना 755 कोटींची मदत, बीड जिल्ह्याचा समावेश, पण मदत मात्र 17 लाख!* *याआधीच्या मदतीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत नाही, सांगा सरकार दिवाळी कशी करायची? - धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल* परळी (दि. 13) - अतिवृष्टी व पावसाने शेती पिकांचे झालेले नुकसान त्याचबरोबर विविध कीड व रोगराईने शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यात राज्य सरकारने अतिवृष्टी निकषात बसत नसलेल्या परंतु नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज 755 कोटींची मदत जाहीर केली आहे, मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमधून केवळ 17 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. याआधीही अतिवृष्टी व गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांच्या नुकसानीची आकडेवारी पाहता नव्या राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा विक्रम केला असल्याची टीका माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी केली आहे.  महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी निकषात न बसणाऱ्या परंतु पावसामुळे शेती पिकांचे ...

MB NEWS-भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणात नवी माहिती आली समोर !

इमेज
  भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणात नवी माहिती आली समोर ! बीड, प्रतिनिधी...          भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडली. परंतु, आता या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. भगीरथ बियाणी पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी झाडली गेली असल्याचा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.             पोलिसांनी बियाणी यांचा मोबाईल न्यायवैद्यक चाचणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. बीड शहरातील विप्र नगर भागांत राहणारे भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये डोक्यात स्वतःकडील पिस्तुलनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. भगीरथ बियाणी यांचे बंधू बाळकृष्ण बियाणी यांनी पेठ बीड ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या आत्महत्येनंतर बीडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होत्या. पोलिसांनीसुद्धा या आत्महत्यांसंदर्भात तपास सुरू केला आहे. 🔸संबंधित बातमी: भाजप बीड शहराध्यक्...

MB NEWS-खोटा धनादेशदिला ;आरोपीस 3 महिने तुरुंगावास व दंड !

इमेज
  खोटा धनादेश दिला ;आरोपीस 3 महिने तुरुंगावास व दंड ! अॅड.आर.व्ही गित्ते नंदागौळकर परळी वैजनाथ : सिरसाळा येथील ज्ञानेश्वर पतसंस्थेला खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून सोनपेठ न्यायालयाने आरोपीस तीन महिने तुरूंगवास व रू 58 000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. एका महिन्यात दंडाची रक्कम रु 58000 नुकसानभरपाई म्हणून फिर्यादी पतसंस्थेला देण्याचा आदेश दिला आहे.*         सिरसाळा येथील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन आरोपी नामदेव दगडू सलगर रा.मुंगी यांनी वैयक्तीक कर्ज रू  30 000 घेतले होते.सदर कर्जाच्या थकित रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता नामदेव दगडू सलगर यांनी दिनांक 05.10.20छ15 रोजीचा दि अंबाजोगाई पिपल्स को आप बँक लि.अंबाजोगाई शाखा सिरसाळा या बँकेचा चा रू. 58 000 चा धनादेश दिला होता.सदर धनादेश न वटल्यामुळे ज्ञानेश्वर पतसंस्थेमार्फत बालाजी अप्पाराव भोयटे यांनी सुरवातीला परळी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर केस सोनपेठ न्यायालयात वर्ग करण्यात आली होती.सदर प्रकरणात साक्षीपुरावा होऊन आरोपीस उपरोक्त शिक्षा ठोठावली होती व आरोपीने ...

MB NEWS-त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार

इमेज
  त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यामध्ये त्रिपुरा ने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.     शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे रविवार, दि.9 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यामध्ये त्रिपुरा ने पहिला क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथील आयोजीत समारंभात राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना नुकताच पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री आ. धनंजय मुंडे अध्यक्ष नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने किरण गित्ते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीपजी खाडे, यशवंतर...

MB NEWS-मालेवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत

इमेज
  मालेवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- परळी तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बळीराम बदने यांनी दि.27 जुलै रोजी आत्महत्या केली होती.या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांना शासनाच्या वतिने नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. मालेवाडी येथील बळीराम भगवान बदने यांनी कर्जबाजारीपणास कंटाळुन दि.21 जुलै रोजी आत्महत्या केली होती आत्महत्या कुटूंबाचे वारसदार श्रीमती सुलभा बळीराम बदने याना आधार म्हणून नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांच्याहस्ते बुधवार दि.12 ऑक्टोबर रोजी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मालेवाडीचे सरपंच भुराज बदने तलाठी पंडित मयत शेतकर्याचे वडील भगवान बदने हे उपस्थित होते.

MB NEWS-१० ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन

इमेज
  १० ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन  विनाअनुदानित,अंशतः अनुदानित शिक्षकांचा महाएल्गार : महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदान व अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंम्बर २०११व ४ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार वेतन अनुदानाचे सूत्र लागू करणे,या मागणी साठी १० ऑक्टोबर २०२२ पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाचे बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण सुरू होणार आहे. शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून राज्यातील अनेक नोंदणीकृत प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर संघटना सहभागी झाल्या आहेत.या आंदोलनाविषयी चे निवेदन शिक्षक समन्वय संघातर्फे नुकतेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्थानक,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्ष नेते आदींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. गेली २१ वर्षे विनाअनुदान चा प्रश्न राज्यात जसाच्या तसा असून अद्याप कोणत्याही सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी तो मिटवण्यात रस दाखवलेला नाही किंवा सोडवलेला नाही असा गंभीर आरोप शिक...

MB NEWS-परतीच्या पावसाने परळीतील मोंढ्यात पाणीच पाणी ; न.प. प्रशासनाला देणं न घेणं- आश्विन मोगरकर

इमेज
  परतीच्या पावसाने परळीतील मोंढ्यात  पाणीच पाणी ; न.प. प्रशासनाला देणं न घेणं- आश्विन मोगरकर परळी वैजनाथ परतीच्या पावसाने परळी शहरातील मोंढा मार्केट भागात पाणीच पाणी झाले असून नगर परिषदेने रस्ते व नाल्यांचे बोगस कामे केल्यामुळे विकासकामांसाठी आलेले करोडो रुपये पाण्यातच गेले असल्याचा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. परळी शहरातील महत्वाचा भाग असलेला मोंढा मार्केट भागात बुधवार दि 12 ऑक्टोबर ला दुपारी आलेल्या पावसाच्या जोरदार सडाक्यामुळे पाणीच पाणी झाले होते. नाली वर आणि रस्ते खाली अश्या पद्धतीने बांधकाम झालेल्या मोंढ्यातील रस्तावरून चक्क नदीच वहात असल्याचा भास होत होता. दुकानांच्या चौकटिपर्यंत पाणी पोचले होते. यामुळे दुकानदारांची धावपळ उडाली होती. नगरपरिषदेला कर भरणारे व्यापारी पावसाच्या साठलेल्या पाण्याने त्रस्त असताना प्रशासक असलेले मुख्याधिकारी व इतर अधिकारी मात्र आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्यास सुद्धा तयार नाहीत. शहरात नगरपरिषदेत नगर रचनाकार आहे का असा प्रश्न पडावा अशी रस्ते व नाल्यांची बोगस कामे झाली आहेत असा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. पावसाचे पाण...

MB NEWS-अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तात्काळ तक्रार करावी! - किसान सभा*

इमेज
 * अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तात्काळ तक्रार करावी! - किसान सभा* परळी / प्रतिनिधी सोयाबीन, बाजरी, काढणी समयी व काढणी पश्चात तसेच कापूस वेचणीस आलेला असताना बीड जिल्ह्यात 11 ऑक्टोबर पासून सर्व दूर विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी सुरू आहे. आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा शासकीय यंत्रणांचा हवामान अंदाज असून अस्मानी-सुलतानी संकटांनी अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये या पावसाने आणखीनच भर घातली आहे. या पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन, बाजरी इत्यादी पिकांचे तसेच वेचणीस आलेल्या कापसाचे तसेच पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून ते आणखीही जास्त प्रमाणात होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी हदबल, वैफल्यग्रस्त न होता आपल्या पिकांचे काढणी अगोदर, काढणी समयी, वा काढणी पश्चात झालेल्या नुकसान संदर्भातील तक्रार 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे दाखल करावी. असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष काॅ. अजय बुरंडे यांनी केले आहे.  या अगोदर ऑगस्ट मधील पावसातील खंडामुळे 25% विमा अग्...

MB NEWS- *वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक* *स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन*

इमेज
 *वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक*  *स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन* *गुरूवारी सकाळी 09 वाजता पांगरी येथे होणार अंत्यविधी* परळी (दि.12) ............. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय, परळी नगर परिषदेचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक झाला असून, त्यांचे वडील कै.बाबुराव राजाराम कराड यांचे आज दुपारी 03 च्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे इतके होते. उद्या सकाळी (दि.13) 09 वाजता कै.बाबुराव कराड यांच्या पार्थिवावर पांगरी (गोपीनाथगड), ता.परळी येथे विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  कै.बाबुराव कराड हे गेल्या काही दिवसांपासून हृदयाच्या आजाराने त्रस्त होते, दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुणे येथील एका नामांकित रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान वृध्दापकाळाने त्यांची आज दुपारी प्राणज्योत मालवली. कै.बाबुराव कराड यांच्या मागे पत्नी, वाल्मिकअण्णा कराड, महादेव कराड हे दोन मुले,मुलगी तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.   व...

MB NEWS-बाळासाहेबांची शिवसेना: ढाल तलवार नव्या चिन्हाचे परळीत जोरदार स्वागत

इमेज
  बाळासाहेबांची शिवसेना: ढाल तलवार नव्या चिन्हाचे परळीत जोरदार स्वागत परळी वै:-प्रतिनिधी....       निवडणुक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह अधिकृत दिल्याने परळीत ढोल ताशे,फटाके फोडुन व पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला. बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेते पदाधिकारी व कार्यकर्ते परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर येथे एकञीत येऊन एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम आपके साथ है...,जय भवानी,जय शिवराय,बाळासाहेबांची शिवसेना यांच्या घोषणा देत  परिसर दणाणुन सोडला होता.   याप्रसंगी, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुका प्रमुख, शिवाजी शिंदे,उपजिल्हा प्रमुख अँड रामराव माने,धनंजय गित्ते,महिला तालुका प्रमुख यशोदा राठोड,तालुका सचिव विश्वनाथ  राठोड,उपतालुका प्रमुख सुंदर रावळे, विष्णू ढेबरे उपशहर प्रमुख सिरसाळा,अँड संजय डीघोळे,सचिन स्वामी बालासाहेब देशमुख, वैजनाथ माने,युवा सेना शहर प्रमुख गजानन कोकीळ,संजय कदम,नवनाथ सरवदे,गजानन कदम,सचिन बुंदुले,रमेध लोखंडे, विठ्ठल गायकवाड,महेश जुनाळ,सुरेश बिडगर, कृष्णा सरवदे,गजानन राठोड,अंकुश राठोड,यासह बाळासाहे...

MB NEWS-स्व. दिनकरराव गित्ते यांचे पुण्यस्मरण: प्रासंगिक लेख-✍️ किरणकुमार गित्ते (IAS)

इमेज
शिक्षणावर अपार श्रद्धा असणारे आमचे वडील : स्व. दिनकरराव गित्ते  आदरणीय दादांना १६ व्या पुण्यतिथदिनी भावपुर्ण श्रद्धांजली ! -----------------------------------------------------------             १९७० च्या दशकातील कॅामर्सचे पदवीधर, आधुनिक शेतकरी,   १९८० मध्ये स्वत: खेड्यात राहून मुलांना इंग्लिश मेडीयम शाळेत पाठवणारे, सुरूवाती पासून भालचंद्र वाचनालयाचे सभासद, इंडीया टूडे साप्ताहिक वाचून देशातील अद्यावत माहीती ठेवणारे, क्रिकेटचे शौकीन, स्पष्टवक्ते अशी अनेक विशेषणे लावली तरी आमचे वडील स्व दिनकरराव गित्ते यांचे संपुर्ण व्यक्तिमत्व रेखाटता येणार नाही.  केवळ ५२ वर्षाच्या आयुष्यात मागच्या दोन पिढ्यांच्या समस्या सोडवल्या, स्वत: गरीबीत दिवस काढताना चांगले विचार न सोडता पुढच्या अनेक पिढ्यांना पुरेल एवढी शिदोरी मागे ठेवून गेले. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करताच बॅंकेत नोकरी सहज उपलब्ध असताना ‘उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ प्रमाणे शेतीकडे वळले. दोन विहीरी खोदून बागायत शेती सुरू केली. उस, केळी, मिरची असे भरघोस उत्पन्न घेवून एकत्रित कुटुं...

MB NEWS-बाळासाहेबांची शिवसेना: निवडणूक निशाणी ढाल तलवार !

इमेज
  बाळासाहेबांची शिवसेना: निवडणूक निशाणी ढाल तलवार ! तल मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आज हा निर्णय दिला.त्यामूळे आता आगामी पोटनिवडणुकीत मशाल पेटणार का ढाल तलवार तळपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याआधी उद्धव ठाकरे गटाला मशाला हे चिन्ह मिळाले आहे. तर नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालं आहे. हे कालच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते. दरम्यान आयोगाने आज शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.या माध्यमातून शिंदे गटाला नव्या पक्षाची मान्यता मिळाली हे देखील महत्त्वाचे आहे.

MB NEWS-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित अंतर महाविद्यालय स्पर्धेत परळीच्या विद्यार्थ्याने फटकावले सुवर्णपदक

इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित अंतर महाविद्यालय स्पर्धेत परळीच्या विद्यार्थ्याने फटकावले सुवर्णपदक   परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जलतरण या स्पर्धेत परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.           इंटरकॉलेज स्विमिंगमध्ये डॉ.बामू विद्यापीठाचे क्रीडा संकुल येथे आयोजित स्पर्धांमध्ये  वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथचा विद्यार्थी श्री. ओम बालवडकर यांने २०० मीटर जलतरणात सुवर्णपदक (प्रथम पारितोषिक) पटकावले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS- पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकाकुल भावना

इमेज
  भगीरथ बियाणी यांच्या दुःखद निधनाची बातमी अस्वस्थ अन् सुन्न करणारी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकाकुल भावना बीड  । दिनांक ११। भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या दुःखद निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. बियाणी हे धडाडीचे कार्यकर्ते होते, त्यांचं असं अचानक जाणं मनाला अस्वस्थ आणि सुन्न करणारं आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.     पंकजाताई मुंडे आज मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत  होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी त्या सकाळी उज्जैनला रवाना झाल्या. इंदौर  विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना बियाणी यांच्या निधनाची बातमी समजली आणि धक्काच बसला. आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, भगीरथ हा माझा जवळचा आणि लाडका कार्यकर्ता होता. माझ्या जीवाच्या कार्यकर्त्यांनं असं कसं केलं. त्यांचं जाणं धक्कादायक आहे, प्रचंड दुःख होतयं, ते शब्दात व्यक्त करता येत नाही. ही घटना मनाला खूप अस्वस्थ आणि सुन्न करणारी आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करते ...

MB NEWS-भगीरथ बियाणी यांचे निधन :आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द - खा.डाॅ. प्रितम मुंडे

इमेज
  भगीरथ बियाणी यांचे निधन :आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द - खा.डाॅ. प्रितम मुंडे  परळी वैजनाथ, प्रतिनिधी......           बीड भाजपचे शहराध्यक्ष आणि आमचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते भगीरथ दादा बियाणी यांच्या दुःखद निधनामुळे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत आहे अशी माहिती खा.डाॅ. प्रितम मुंडे  यांनी दिली आहे.            बीडचे भाजप शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून बियाणींनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.भागीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळेस डॉक्टरांनी बियाणींना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत. भागीरथ बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भागीर...

MB NEWS-साखर झोपेत असतानाच पत्नी व मुलाची केली हत्या आणि स्वतःच दिली पोलिसांना माहिती

इमेज
    साखर झोपेत असतानाच पत्नी व मुलाची केली हत्या आणि स्वतःच दिली पोलिसांना माहिती माजलगाव दि.११(प्रतिनिधी ) तालुक्यातील मजंरथ येथील काळे वस्तीत राहणाऱ्या पांडुरंग दोडताले याने पत्नी मुलाची हत्या करुण स्वतः पोलिसांना फोन करुन माहिती दिल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.    माजलगाव शहरापासुन दहा किलोमीटर आंतरावर आसलेल्या मंजरथ येथील पांडुरंग तोडताले हा राहत होता. आज दि.११ रोजी पाहाटेच्या सुमारास पत्नी लक्ष्मी व मुलगा पिन्या साखर झोपेत आसतांना धारधार शस्ञांनी हाल्ला करुन खुन केल्याची दुरदैवी घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात खळबळ माजली सदरील खुनाची माहिती खुद पांडुरंग यांने माजलगाव ग्रामिण पोलिसांना दिली. व फरार होण्याच्या आत पोलिसांनी खुनी पांडुरंग यास ताब्यात घेण्यास यश मिळवले आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.

MB NEWS-खळबळजनक :बीड भाजप शहराध्यक्षांची आत्महत्या

इमेज
  खळबळजनक :बीड भाजप शहराध्यक्षां ची आत्महत्या बीड : येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बयाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. भाजपचे शहराध्यक्ष असलेले भगीरथ बीयाणी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. मंगळवारी सकाळी त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या आत्महत्येमागचे कारण अजून समोर आलेले नाही.

MB NEWS-पंतप्रधानांसोबत पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उज्जैन येथे महाकाल काॅरिडोरचे लोकार्पण पंतप्रधानांसोबत पंकजाताई मुंडे यांचीही उपस्थिती आज उज्जैन येथे महाकाल काॅरिडोरचे लोकार्पण;परळीत खा. डाॅ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत लाईव्ह कार्यक्रम पहाणार  परळी वैजनाथ । दिनांक ११। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उज्जैनच्या  महाकाल मंदिर काॅरिडोरचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधानां समवेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सहप्रभारी पंकजाताई मुंडे हया देखील उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान, हा कार्यक्रम शहरातील नागरिकांना थेट लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली असून खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.    काशी विश्वनाथ काॅरिडोरच्या धर्तीवर उज्जैन येथे ८५६ कोटी रूपये खर्च करून सुमारे ४७ हेक्टरवर महाकाल मंदिर काॅरिडोर उभारण्यात आला आहे. भगवान शंकराचे अद्भुत, अकल्पनीय आणि अलौकिक विश्वाचे दर्शन यातून होणार असून या काॅरिडोरला   'महाकाल लोक' असे नाव देण्यात आले आहे. उद्या याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी करणार असून पंकजाताई मुंडे ...

MB NEWS-सावधान :घरबसल्या कमावण्याची संधीची लिंक पाठवली व 33 हजारांची केली ऑनलाईन फसवणूक

इमेज
  सावधान :घरबसल्या कमावण्याची संधीची लिंक पाठवली व 33 हजारांची केली ऑनलाईन फसवणूक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     वर्क फ्रॉम होम मधून पैसे मिळवण्याचे अमिष दाखवून महिलेला 33 हजार रुपयांचा फटका बसल्याचा प्रकार परळी शहरात समोर आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  घरबसल्या कमावण्याची संधीची लिंक पाठवली व 33 हजारांची  ऑनलाईन फसवणूक केली.अशा प्रकारच्या फसव्या लिंक व सोशल मीडियावर येणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.       कुरेशी उमामा शबनम निसार अहमद रा.परळी असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना एका मोबाईलधारकाने एक लिंक पाठवून वर्क फ्रॉम होम मधून पैसे कमावण्याची संधी असल्याचे सांगितले. डिजीटल करन्सीमध्ये आपण काम करत असल्याचे  या मोबाईल धारकाने फोन करुन सांगितले.  उमामा यांनी विश्वास ठेऊन सांगेल त्याप्रमाणे त्याच्या खात्यावर 33 हजार 584 रुपये भरले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संभाजीनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. यावरुन अज्ञात मोबाईलधार...

MB NEWS-मुख्यमंत्र्यांचे लोकाभिमुख कार्य महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोंहचवेल- शिंदे,गित्ते

इमेज
  मुख्यमंत्र्यांचे लोकाभिमुख कार्य महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोंहचवेल- शिंदे,गित्ते परळी (प्रतिनीधी)  महाराष्ट्रात हिंदुत्वाबरोबरच सर्वसामान्य जनतेची कामे जलदगतीने होत असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या या लोकाभिमुख कार्यामुळे महाराष्ट्र लवकरच प्रगतीच्या शिखरावर पोंहचलेला असेल.मुख्यमंत्र्यांचे हे कार्य अनेकांच्या डोळ्यात सलत असले तरी मुख्यमंत्र्यांचे हे कार्य जनतेपर्यंत पोंहचवणार असल्याचे शिवसेना (शिंदेगट) चे तालुकाप्रमुख  शिवाजी शिंदे व जेष्ठ नेते धनंजय गित्ते यांनी सांगितले.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतल्यानंतर अडीच वर्षात आघाडीतील बिघाडीमुळे रखडलेला विकास सुरु झाला.महाराष्ट्राला 24 तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाल्याने सर्वसामान्यांची कामे जलदगतीने होवु लागली आहेत.अपघातग्रस्तांना मदत असो अथवा अडचणीत सापडलेला रिक्षाचालक अशा सर्वांशी थेट संपर्क साधुन धिर देणारा मुख्यमंत्री मिळाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हेच कार्य विरोधकांना अडचणीचे वाटत असल्याने त्यांना पोकळ धमक्या देत आहेत.आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर...

MB NEWS-निमंत्रितांच्या कविसंमेलनाने कोजागिरीला आली रंगत

इमेज
 'अरे प्रचार प्रचार , खोटा कधी म्हणू नये, दिल्या घेतल्या प्रेमाला , नोटा कधी म्हणू नये ". निमंत्रितांच्या कविसंमेलनाने कोजागिरीला आली रंगत • म.सा.प परळी शाखेचा उपक्रम  परळी वैजनाथ, दि. १०/ १० / २०२२, (प्रतिनिधी)ः- येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने कोजागिरीनिमित्त खास परळीकर रसिकांसाठी ' कविता रंगते कोजागिरी'त या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन रविवार दि. ०९ / १० / २०२२ रोजी सायं . ७ : ० ० वा. ' बन्सल क्लासेस माधवबाग ' येथे करण्यात आले होते .मा.विभाश्री दीदी यांच्या  शुभहस्ते उद्‌घाटन झालेल्या या कविसंमेलनात -  विविध रसांची अनुभूती रसिक श्रोत्यांना अनुभवता आली. हास्य , टाळ्या याबरोबरच सामाजिक विषयाच्या अनुषंगाने अंतर्मुखता ही या कविसंमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. या कविसंमेलनात ज्यांच्या कवितेने रसिकमनात कायमचे घर केले असे चित्रपट कलावंत ,हास्यसम्राट , विनोदाचे बादशहा 'नारायण सुमंत (खुंटे पिंपळगाव) यांनी -       " अरे प्रचार प्रचार , जसा मेवा हातावर        आधी पुडके आणि गुटखे          मग का...