पोस्ट्स

परळी वैजनाथ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS:वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

इमेज
  सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला कायम प्रामाणिक राहीन-प्रल्हाद सावंत वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव परळी वैजनाथ/प्रतिनिधी एक सामान्य सेवक म्हणून संपर्कातील अशा प्रत्येकाचे काम निष्ठेने करीत राहिलो. या कालावधीत अनेकांशी ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले असून ते मी जोपासत गेलो याची प्रचिती आज वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या अगणित शुभेच्छातून व्यक्त झाली. माझ्यावर असलेल्या सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला यापुढेही कायम राहील असे मत पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी व्यक्त केले. पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पतसंस्थेच्या कार्यालयात सर्व संचालक व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी बोलतांना प्रल्हाद सावंत यांनी सांगितले की, आपला विश्वास मी कमावला परंतू आपणही माझ्यावर नेहमीच मनापासून प्रेम केलेले आहे. एक सामान्य नागरिक व अर्बन निधीचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला काही सुविधा देता येईल का याचाही प्रयत्न करूत असे प्रल्हाद सावंत म्हणाले.  संबंधीत  Click : ● सहकार क्षेत्रात उ

MB NEWS:ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया परळी तालुक्यातील  76 ठिकाणी सरपंच व 625  इच्छुक सदस्य यांच्या निवडीची प्रक्रिया रविवार दि 18 रोजी संपन्न झाली असून सर्वांचे लक्ष्य उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.परळी तहसील कार्यालयात होणारी मतमोजणी 29 टेबलवर होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. Click &watch: ● *मासिक एकादशी पर्वकाळात पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ दर्शनाला भाविकांची रीघ.* _#mbnews # subscribe #like #share #comments_ ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मंगळवार दि. 20  रोजी मतमोजणी होत आहे. तहसील कार्यालयात यासाठी 29 टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी अधिकारी, 3 सहाय्यक असे 4 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे प्रत्येक टेबलवर एक या पद्धतीने तीन फेऱ्या होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. ------------------------------------------------------- MB NEWS: LIVE: अंबाजोगाई -भागवतकथा (पंचम दिन) ● भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज जोशी उखळीकर ● स्थळ: पंचमुखी हनुम

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले

इमेज
  ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नाथ्रा येथे आज आ.धनंजय मुंडेंनी  मतदानाचा हक्क बजावला मात्र पंकजाताई व खा.डॉ.प्रीतमताई मतदानाला काही अपरिहार्य कारणास्तव  पोहचू शकल्या नाही.त्यामुळे मुंडे भगिनींचे मतदान राहिले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व अधिवेशन सुरु असल्याने  खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.      नाथरा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी मुंडे भावंडांपैकीच अभय मुंडे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांच्यासह प्रकाश मुंडे आणि रमेश मुंडे या दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे निवडणुक झाली. राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचाराच्या बॅनरवर एकत्र आले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी रविवारी पंकजा मुंडे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाला येऊ शकल्या नाहीत.तर संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने खासदार डॉ. प्रितम मुंडे द

MB NEWS-मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात

इमेज
  मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आता बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत असतानाही त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हा खळबळजनक प्रकार घडला. काय आहे संपूर्ण प्रकरण - बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत नोकरी करत आहे. मात्र, त्याच्या नावाने मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सध्या गावामध्ये उपस्थित नाही. मात्र, तरीसुद्धा त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले. यासंदर्भात झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली, जावी अशी मागणी होत आहे. • 

MB NEWS-ईव्हीएम मशीनमध्ये टाकले चिकटद्रव्य !

इमेज
  ईव्हीएम मशीनमध्ये टाकले स्टिकफास्ट ! बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे.याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली. बीड जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायत साठी रविवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली.महसूल आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने जिल्ह्यात फार कोठे गैरप्रकार झाल्याचे चित्र दिसून आले नाही. दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीन मध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता.मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती.सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

MB NEWS:निवडणूक कामात कसूर ; सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

इमेज
  निवडणूक कामात कसूर ; सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा  बीड- निवडणूक कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत वडवणी तालुक्यातील सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदान सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविंद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे,

MB NEWS-मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू !

इमेज
  मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू ! नेकनूर – ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानासाठी औरंगाबाद येथून केज तालुक्यातील आनंदगाव सारणीकडे चाललेल्या दुचाकीस्वराची समोरून येणार्‍या कारला मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर धडक बसल्याने यामध्ये दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. श्रीकृष्ण अनिल गायकवाड (वय 35) असे मयताचे नाव आहे. हा तरुण औरंगाबाद येथून दुचाकीवर क्र.(एमएच क्र.20 सीएक्स 1102) केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील ग्रामपंचायत मतदानासाठी जात असताना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावरील गवारी पाटी नजीक समोरुन येणार्‍या कारला क्र.(एम.एच.20 एल 7009) या गाडीला धडक बसली. अपघातातील या युवकाला नेकनूरच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

MB NEWS-न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       येथील न्यायालय परिसरात भांडण करु नका असे सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे चांगलेच महागात पडले असुन ५ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click &watch: *⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. 14/12/2022 रोजी 12.15 वा. परळी कोटचि गेट समोर परळी वै. येथे असतांना यातील फीर्यादी पोह भास्कर गंगाधरराव केंद्रे हे आरोपींना येथे भांडण करु नका असे म्हणाले असता तुम्ही कोण पोलीस आम्हाला सांगणारे ,आमच्या घरातले भांडण आहे असे म्हणुन फिर्यादीचे अंगावर धावुन जावुन फिर्यादीचे शर्टला धरून त्यांचे शर्ट फाडले व फिर्यादीचे अंगाला झटापट करुन नखाने बोचकुरे घेतले. म्हणुन आरोपी  1 ) दिपक अंकुशराव घुगे वय 34 वर्ष रा. केहाळ ता. जिंतूर जि. परभणी 2) संतोष अंकुश

MB NEWS-डॉ.पी एल कराड यांची विद्या परिषदेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड

इमेज
  डॉ.पी एल कराड यांची विद्या परिषदेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक ,डॉ. पी एल कराड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी घेण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून विद्या परिषदेकरिता प्रचंड बहुमतांनी नुकताच विजय मिळविला.  डॉ.पी एल कराड यांचे व्यक्तिमत्व मनमिळाऊ स्वभावाचे, उत्तम कार्यप्रणाली त्यांच्याकडे असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापकांनी या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. या निवडणुकीमध्ये त्यांना 1185 मते प्राप्त झालेली आहेत. या निवडीचे श्रेय त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापकांना दिले आहे असे यावेळी बोलताना सांगितले. या निवडणुकीतील यशाबद्दल डॉ.पी एल कराड यांचे आ.धनंजयजी मुंडे साहेब ,आ.सतीश चव्हाण ,आ. विक्रम काळे, उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक व प्रमुख डॉ. शिवाजीराव मदन सर जवहार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सदाशिवआप्पा मुंडे, उपाध्

MB NEWS-1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले

इमेज
  1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले सोन्याचे दागिने पाहण्यास आलेल्या तीन महिलांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना परळी शहरातील सराफा बाजारात घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिला विरोधात सराफा व्यापारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न सराई सुरू असल्याने सराफा बाजारात महिलांची मोठी गर्दी दिसून येत असून परळी शहरातील सराफा बाजारात असलेल्या बालाजी टाक या सराफा दुकानातअनोळखी तीन महिला सोन्याचे दागीने घ्यायाचे आहेत म्हणून दाखल झाल्या.सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी दाखविलेल्या विविध सोनाच्या दागिन्यापैकी एक सोन्याचे 26.700 ग्रामचे सोन्याचे मिनीगंठण मिलीमिनी गंठन ज्याची किंमत 1 लाख 38 हजार 840  रु आहे तो दागिना सराफा व्यापारी यांची नजर चुकवत चोरून घेवुन गेल्या. या प्रकरणी दागिना चोरी गेल्याची माहिती झाल्यावर सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली असून शहर पोलीस ठाण्यात गुरन 277/2022 कलम 379 भादवि नुसार अज्ञात तीन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्य

MB NEWS-बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ

इमेज
  सिरसाळा: दहा हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास पकडले बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ बीड | सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. Click: ● *ग्रामपंचायत निवडणुक: परळी तालुक्यातील अशी आहे स्थिती | फायनल आकडेवारी* #mbnews #subscribe #like #share #comments        बीड पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रकाश शेळके असे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्

MB NEWS-डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी

इमेज
  डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी बीड: मादळमोही येथे दोन डॉक्टरांमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे             विठ्ठलदास हरकूट आणि अतुल बिर्ला हे दोघे डॉक्टर आहेत. डॉक्टर हरकूट यांनी अतुल बिर्ला यांना तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं विचारलं आणि हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चार जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली.         दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय आणि याच अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या दोघांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमध्ये हे दोन्ही डॉक्टर मादळमोही या गावी आपल्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात. एकाचा दवाखाना मोठ्या प्रमाणात चांगला चालतोय तर दुसऱ्या डॉक्टरांना मात्र हवा तसा प्रतिसाद येत नाहीये. दोन्ही क्लिनिकमध्ये अंतर ही फारसे नाहीये आणि यामुळेच या

MB NEWS-●#जोशींचीतासिका●पायांना पंख असलेली भारताची स्केटर कन्या

इमेज
पायांना पंख असलेली भारताची  स्केटर कन्या               #जोशींचीतासिका.                                       #जोशींचीतासिका.                         अ सं म्हणतात एखादे चांगले कर्म श्रद्धेने केले तर एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी होता. कदाचित कोणाला आजचे लेखन म्हणजे एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल. पण, जे लिहीत आहे ते एकदम वास्तव आहे. आजची तासिका आहे प्रभू वैद्यनाथाच्या परळीमधील एका सोळा वर्षीय मुलीची; जीचे नावं 'सुवर्ण' अक्षरांनी भारताच्या क्रीडा इतिहासात नोंदले गेले आहे. आता ती एक एक पाऊल टाकत आहे ते ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने; विशेष म्हणजे आजही 'ती' आणि तिच्या कुटुंबाला एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. तरीही जिद्दीने ती आत्मविश्वासाने पुढे जात आहे.  Click -संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड* परळी वैजनाथ परिसरात ध्वनीक्षेपावर उद्घोषणा (Mike Announcement) करणारे गायकवाड बंधू सर्वांना परिचित आहेत.

MB NEWS-उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा

इमेज
उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           संत नामदेवरायांच्या समकालीन असलेले संत जगमित्रनागा महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा दिनांक 21 रोजी असून समाधी सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.    वारकरी संप्रदायातील अध्वर्यू संत मांदियाळीतील प्रमुख संत असलेल्या व संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत जगमित्रनागा महाराज यांची परळी येथे संजीवन समाधी आहे. संत जगमित्रनागा महाराज यांचा समाधी सोहळा शुक्रवार दिनांक 21 रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने दुपारी बारा वाजता गुलाल उधळून समाधी सोहळा साजरा केला जाईल. हभप प्रा.डॉ. शाम महाराज नेरकर यांचे पूजेचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ वितरण व महापूजा होणार आहे. या समाधी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत जगमित्र नागा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.   दरम्यान श्री सुधाकर महाराज श्रीरंग मद्रेवार लातूरकर चापोली यांच्या तर्फे समाधी सोहळा उत्सव महापूजा होणार आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ,नामदेव गाथा या ग्रंथाचे वाटप होणार आहे. तसेच श्री ह भ प सुधाकर श

MB NEWS- *परळीत भिमनगर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*

इमेज
 *परळीत भिमनगर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा* परळी / प्रतिनिधी - 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दि 5 ऑक्टोबर 2022 रोजी परळी वैजनाथ येथील भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात व सुंगधकुटी बुद्ध विहार अशा दोन्ही ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन सकाळी 9 ते11 या वेळेत विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक 9:00 वाजता भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांनी सामुदायिक  पुष्पहार घालून आभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात  सामाजिक कार्यकर्ते आयु नवनाथ दाणे तर सुंगध कुटी बुद्ध विहारात आयु अनिता विलास रोडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले, त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली, तदनंतर 22 प्रतिज्ञांचे प्रकट वाचन करण्यात आले. याप्रसंगी 11 तोफांची सलामी देण्यात आली व ढोल ताशा च्या सोबत घेऊन फळ वाटप करण्यात आले.  या प्रसंगी शेकडो बौद्ध उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यकमात प्रा विलास रोडे, भारत ताटे, ड

MB NEWS-तेली समाज दांडीया समितीचे यशस्वी आयोजन

इमेज
  महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे -अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर तेली समाज दांडीया समितीचे  यशस्वी आयोजन परळी वैजनाथ दिली.०५ (प्रतिनिधी)            महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी व्यक्त केले. त्या तेली समाज आयोजित दांडीया महोत्सवाच्या समारोपात बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या.               येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिराच्या सभागृहात तेली समाज दांडीया उत्सव समितीच्या वतीने यंदा प्रथमच दांडीया उत्सवाचे आयोजिन करण्यात आले होते. दांडीया उत्सवात आठ दिवस वेगवेगळ्या थिमच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर पोलीस  निरीक्षक उमाशंकर कस्तुरे व शनी मंदिर देवस्थान कमिटीचे विश्वस्त राजाभाऊ शिंदे, श्री.शनैश्चर निधी अर्बन लिमिटेडचे चेअरमन वैजनाथ बेंडें ,तेली समाज दांडीया उत्सव समितीचे अध्यक्ष पवन फुटके उपस्थित होते. कार्यक्रमा

MB NEWS-काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा

इमेज
 काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा * मोठ्या उत्साहात परळीकरांचीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी* *धनंजय मुंडे यांनी भाजपसह विविध पक्षाच्या पेंडॉल मध्ये जाऊन दिल्या शुभेच्छा* *धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केले अभिवादन* परळी (दि. 06) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परंपरेनुसार आपला दसरा परळीकरांच्या सोबत काळरात्री मंदिर येथे साजरा केला. श्री. मुंडे यांनी सायंकाळी काळरात्री देवीचे दर्शन घेऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिर परिसरात येणाऱ्या परळी शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंदिराच्या बाहेर एक पेंडॉल उभारण्यात आला होता. परळी वासीयांनी या ठिकाणी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण रात्री उशिरापर्यंत सुरू होती. धनंजय मुंडे यांच्या सह उपस्थित सर्वांनी यावेळी देवीच्या पालखीचेही दर्शन घेतले.  भाजपच्या पेंडॉल मध्ये गेले व तिथे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आपट्याची पाने देऊन गळाभेट देऊन शुभेच्छा देऊन आले. त्याचबरोबर त्यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या प
इमेज
  वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन        द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह,विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,त
इमेज
  अहंकार मानवाच्या पतनाचे कारण - प.पु. प्रदीप मिश्रा उद्या होणार कथेची सांगता🔸 परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - अहंकार  मानवाच्या पतनाचे कारण बनतो, म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार होऊ देऊ नका असे प्रतिपदान प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी सहाव्या दिवशीच्या कथेत केले.येथील मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेत त्यांनी शिवमहिमा वर्णीत केला.कथेचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या मराठी भजनावर भाविकांनी ठेका धरला होता.            कर्ता करविता भगवान शंकर आहेत,सर्व सृष्टी त्याच्या आधीन आहे.म्हणून शिव निंदा करू नये.भगवान शंकराला आपल्या जीवनात आलेले दुःख सांगा त्यापासून ते मुक्त करतात.मानवाच्या अहंकाराचे हरण फक्त भगवंतच  करू शकतो.भगवंताची केलेली सेवा फळ देतेच म्हणून आपण देवाची नित्य सेवा केली पाहिजे.कणा कणांत शंकर आहे असे महाराजांनी कथेचे विवेचन करतांना सांगितले.      शिव निंदा केल्याने शापित झालेल्याम हर्षी नारदांनी चंद्रभागे तिरी व्रत करत स्वतःला शाप मुक्त करून घेतले होते.भगवान शंकर,विष्णूंचे वरदान म्हणजे पंढरपूर येथील चंद्रभागा नदी आहे.सगळ्या नद्
इमेज
संयम संपला: परळी तालुक्यातील या गावात झालं अनोखं आंदोलन परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे गाव रस्त्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच पाण्यात बसून ग्रामस्थांनी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शनिवारी सकाळी मौजे रेवली येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाण्यात बसत आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणारा मुख्य रस्ता करावा अशी मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. याबद्दल सतत पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. येत्या आठ दिवसांत रस्ता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.