MB NEWS-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ *शिवसेनेत काम करतांना तो कार्यकर्ता नसतो, तर तो असतो सच्चा शिवसैनिक... जो गरजवंतांच्या मदतीला धावतो, आणि शक्य होईल तेवढा मदतीचा हात देत असतो. ही खर्या शिवसैनिकाची व्याख्या म्हणता येईल. परळी शहर आणि तालुक्यात मागील 30 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत शिवसेनेचे विद्यमान बीड जिल्हा उपप्रमुख आणि सध्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर हे सर्वांच्याच ओळखीचे तर आहेतच परंतू एक सच्चा शिवसैनिक अशी सुद्धा त्यांची ओळख राहिलेली आहे. आपल्या राजकिय कारकीर्दीत नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशा पदावर ठक्कर यांनी काम केले असून पक्ष सांगेल ती जबाबदारी अत्यंत निष्ठेने पाळलेली आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक तर आज पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सैनिक म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांच्या एकुण राजकिय व सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सदरच्या लेखातून करीत आहे. आज 2 ऑक्टोबर अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा वाढदिवस असून त्या निमित्त...