वंचित बहुजन आघाडी परळी च्या वतिने लॉकडाऊन विरोधात डफली बजाओ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याना पोलिसानी घेतले ताब्यात परळी वैजनाथ ---(प्रतिनिधी) सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा,हातगाडे व रोजंदारी करणार्या नागरीकांवर उपासमारीची वेळ आली असुन हा लॉकडाऊन तात्काळ हटवावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतिने परळी येथे डफली बजाओ आंदोलन करण्यात पुर्वीच संभाजी नगर पोलीसानी दोन तर शहर पोलिसानी तेरा जनाना ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात वाजता पोलिसांनी आंदोलनकर्ते गौतम साळवे,संजय गवळी यांना ताब्यात घेतले. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे हाल होत असुन लॉकडाऊन लागु करुनही कोरोना चा फैलाव होतच आहे.यामुळे हा लॉकडाऊन उठवून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी व शासनाने कोरोना फैलाव रोखण्यासाठी इतर उपाययोजना कराव्यात यासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून वंचित बहुजन आघाडीच्या परळी तालुका व शहर पदाधिकार्यांनी आज दि.12 ऑगस्ट रोजी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले यावेळी गौतम साळ...