पोस्ट्स

party leader लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी

इमेज
  मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी मुंबई: पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.      काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचं सरकार नको, भाजपसोबत चला अशी भूमिका घेत शिंदेंनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडाला शिवसेनेच्या ३९ आमदारांनी साथ दिली. १० अपक्ष आमदारदेखील त्यांच्या पाठिशी उभे राहिले. शिंदे गट सरकारमधून बाहेर पडल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. आपल्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं ही वेळ आल्याचं ठाकरे राजीनामा देताना म्हणाले. एकनाथ शिंदेंनी काल भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रिपदाची