MB NEWS-केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात सिरसाळा येथे निदर्शने

केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात सिरसाळा येथे निदर्शने परळी वै : दि.२६ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,अखिल भारतीय किसान सभा,शेतमजूर युनियन व डी वाय एफ आय युवक संघटनेच्या वतीने सिरसाळा येथे शनिवार दि 26 रोजी देशात सुरू असलेली अघोषित आणीबाणी,शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे व इतर मागण्या करिता देशभरातील विविध राज्यामध्ये राजभवणाला घेराव घालून देशाच्या राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले याच आंदोलनाला पाठिंबा देत सिरसाळा येथे निदर्शने करण्यात आली.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवून उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. देशातील परिस्थिती ही अघोषित आणीबाणी लागू केल्याप्रमाणे असून शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतमालास हमी भाव देण्याचा कायदा करण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. देश कॉर्पोरेटस कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कट कारस्थान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी करून शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित क...