*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव*

*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव* ● कीर्तने व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. .. परळी पंचक्रोशीतील महान संत श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि. ११ रोजी आहे. त्यानिमित्ताने परळीत मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने व विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायातील व उखळीकर भजनी फडावरील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीगुरु संत सोपानकाका महाराज मंदिर येथे आज रविवार दि. ११ रोजी ७१ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवात सकाळी ११ ते १ जगमित्रनागा मंदिर येथे हभप ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे पूजेचे किर्तन होणार आहे. दुपारी २ ते ४ संत सोपानकाका महाराज मंदिर येथे महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदजी महाराज कैलास आश्रम वेरूळ यांचे तर रात्री ९ते११ हभप परमेश्वर महाराज जायभाये आळंदी यांचे किर्तन होणार आहे....