MB NEWS-*पिक विम्यासाठी तहसीलदारांना किसान सभा देणार निवेदन कॉ. अजय बुरांडे* परळी वै.ता.१५ प्रतिनिधी २०२० चा पिक विमा तात्काळ मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बीड जिल्हयातील सर्व तहसीलदारांना सोमवारी (ता.१७) निवेदन देण्यात येणार आहे. मागील पंधरा दिवसा पासुन पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांकडुन तक्रार अर्ज घेण्याची मोहीम किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे. विमा कंपनी व शासनाच्या दारात किसान सभेच्या वतीने मागील सहा महिन्या पासुन २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी विविध मार्गानी आंदोलने केली आहेत. काही तांत्रीक बाबी पुढे करूण शेतकऱ्यांची नुकसान होउनही विमा कंपनीने बीड जिल्हयातील सुमारे लाखो शेतकऱ्यांना विम्या पासुन वंचित ठेवलेल आहे. २०१८ च्या पिक विम्या पासुन ५ हजार शेतकरी पासुन वंचित आहेत. २०२१ चा विमा देताना शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बीड जिल्हयातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाउन सर्व शेतकऱ्यांकडुन विम्याची माहीती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहीमेस शेतकऱ्यांमधुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयातील तहसील कार्यालया समोर सोमवारी (ता.१७) मोर्चा काढण्यात येणार होते. परंतु कोरोणाचे रूग्न वाढत असल्याने शासनानी मोर्चा, आंदोलने करण्यावर निर्बंध घातले असल्याने कोरोना नियमाचे पालन करित केवळ प्रातीनिधीक स्वरूपात निवेदन देण्यात येणार आहे. गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्यांची माहीती गोळा करण्याची मोहीम मात्र सुरूच राहणार आहे. निर्बंधामध्ये शिथीलता आल्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठो, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ.मोहन लांब, कॉ. काशिनाथ सिरसाट कॉ. जगदिश फरताडे, कॉ. सुदाम शिंदे यांनी दिली आहे.
*पिक विम्यासाठी तहसीलदारांना किसान सभा देणार निवेदन कॉ. अजय बुरांडे* परळी वै.ता.१५ प्रतिनिधी २०२० चा पिक विमा तात्काळ मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बीड जिल्हयातील सर्व तहसीलदारांना सोमवारी (ता.१७) निवेदन देण्यात येणार आहे. मागील पंधरा दिवसा पासुन पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांकडुन तक्रार अर्ज घेण्याची मोहीम किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे. विमा कंपनी व शासनाच्या दारात किसान सभेच्या वतीने मागील सहा महिन्या पासुन २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी विविध मार्गानी आंदोलने केली आहेत. काही तांत्रीक बाबी पुढे करूण शेतकऱ्यांची नुकसान होउनही विमा कंपनीने बीड जिल्हयातील सुमारे लाखो शेतकऱ्यांना विम्या पासुन वंचित ठेवलेल आहे. २०१८ च्या पिक विम्या पासुन ५ हजार शेतकरी पासुन वंचित आहेत. २०२१ चा विमा देताना शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बीड जिल्हयातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक...