MB NEWS:शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाड ठरला उपविजेता

शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाड ठरला उपविजेता मूळचा राजगुरूनगर, पुणे येथील रहिवासी आणि नांदेड संघातून उतरलेला शिवराज राक्षे याने मंगळवेढा, सोलापूरचा महेंद्र गायकवाड याला चितपट करीत ६५व्या महाराष्ट्र केसरिचा ‘किताब पटकावला. महेंद्र गायकवाड ला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत उत्कंठा निर्माण करणाऱ्या – लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले. चांदीची गदा, पाच लाख रुपये रोख आणि महिंद्रा कंपनीची थार गाडी भेट म्हणून देण्यात आली. उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला चांदीची गदा, अडीच लाख रुपये रोख आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली. गादी विभागात राक्षे तर माती विभागात गायकवाड विजेता तत्पुर्वी झालेल्या माती विभागातील अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सोलापुरच्या सिकंदर शेखचा अटीतटीच्या लढतीत ६ विरुद्ध ४ ...