पोस्ट्स

गुन्हा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       येथील न्यायालय परिसरात भांडण करु नका असे सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे चांगलेच महागात पडले असुन ५ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click &watch: *⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. 14/12/2022 रोजी 12.15 वा. परळी कोटचि गेट समोर परळी वै. येथे असतांना यातील फीर्यादी पोह भास्कर गंगाधरराव केंद्रे हे आरोपींना येथे भांडण करु नका असे म्हणाले असता तुम्ही कोण पोलीस आम्हाला सांगणारे ,आमच्या घरातले भांडण आहे असे म्हणुन फिर्यादीचे अंगावर धावुन जावुन फिर्यादीचे शर्टला धरून त्यांचे शर्ट फाडले व फिर्यादीचे अंगाला झटापट करुन नखाने बोचकुरे घेतले. म्हणुन आरोपी  1 ) दिपक अंकुशराव घुगे वय 34 वर्ष रा. केहाळ ता. जिंतूर जि. परभणी 2) संतोष अंकुश

MB NEWS-1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले

इमेज
  1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले सोन्याचे दागिने पाहण्यास आलेल्या तीन महिलांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना परळी शहरातील सराफा बाजारात घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिला विरोधात सराफा व्यापारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न सराई सुरू असल्याने सराफा बाजारात महिलांची मोठी गर्दी दिसून येत असून परळी शहरातील सराफा बाजारात असलेल्या बालाजी टाक या सराफा दुकानातअनोळखी तीन महिला सोन्याचे दागीने घ्यायाचे आहेत म्हणून दाखल झाल्या.सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी दाखविलेल्या विविध सोनाच्या दागिन्यापैकी एक सोन्याचे 26.700 ग्रामचे सोन्याचे मिनीगंठण मिलीमिनी गंठन ज्याची किंमत 1 लाख 38 हजार 840  रु आहे तो दागिना सराफा व्यापारी यांची नजर चुकवत चोरून घेवुन गेल्या. या प्रकरणी दागिना चोरी गेल्याची माहिती झाल्यावर सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली असून शहर पोलीस ठाण्यात गुरन 277/2022 कलम 379 भादवि नुसार अज्ञात तीन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्य

MB NEWS-बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ

इमेज
  सिरसाळा: दहा हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास पकडले बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ बीड | सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. Click: ● *ग्रामपंचायत निवडणुक: परळी तालुक्यातील अशी आहे स्थिती | फायनल आकडेवारी* #mbnews #subscribe #like #share #comments        बीड पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रकाश शेळके असे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्

MB NEWS-डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी

इमेज
  डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी बीड: मादळमोही येथे दोन डॉक्टरांमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे             विठ्ठलदास हरकूट आणि अतुल बिर्ला हे दोघे डॉक्टर आहेत. डॉक्टर हरकूट यांनी अतुल बिर्ला यांना तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं विचारलं आणि हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चार जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली.         दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय आणि याच अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या दोघांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमध्ये हे दोन्ही डॉक्टर मादळमोही या गावी आपल्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात. एकाचा दवाखाना मोठ्या प्रमाणात चांगला चालतोय तर दुसऱ्या डॉक्टरांना मात्र हवा तसा प्रतिसाद येत नाहीये. दोन्ही क्लिनिकमध्ये अंतर ही फारसे नाहीये आणि यामुळेच या

MB NEWS-परळी पोलीसांनी गुजरातमधील भुज कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या ! परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक

इमेज
  परळी पोलीसांनी गुजरात मधील भुज - कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या ! परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक परळी वैजनाथ दि १३ :- एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या  गुजरात मधील भुज कच्छच्या जंगलात जाऊन  परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व डीबी शाखेचे भास्कर केंद्रे यांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह जेरबंद केले.              १ वर्षापूर्वी परळी शहरातील व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर महाठक जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले. यावर शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. व्यवहार करतेवेळी जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केला होता. ठरल्याप्रमाणे जिसप कक्कळने शंकर शहाणे यांना  पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.  नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यां

MB NEWS-ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !

इमेज
  ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील 24 वर्षीय युवकास ग्राहक सेवा केंद्राची परवानगी मिळवुन देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपये कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील काही इसमांनी लुबाडले या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील रामेश्वर हरिदास मुंडे (वय २४ वर्षे व्यवसा खाजगी नोकरी) या युवकास कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजिव कुमार यांनी  ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) ची परवानगी देतो असे म्हणुन रामेश्वर मुंडे यांच्याकडून 1 लाख २७,५०० रुपये ऑनलाईन ट्रेनजेक्शन करून स्वीकारले मात्र पैसे घेऊनही ग्राहक सेवा केंद्राची परवानगी न दिल्याने परळी शहर गुरनं. ५२ / २०२२ कलम ४१९,४२० भादवी, ६६ (क), आजपावेतो ६६ (ड) आयटी ऑक्त नुसार विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजिव कुमार सर्व रा.बेंगलोर कर्नाटक राज्य यांच्या विरोध

MB NEWS-८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

इमेज
८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र *पिडित बालिकेच्या कुटुंबियांनी घेतली पंकजाताईंची भेट* परळी ।दिनांक २६। डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई)  येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन  याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*    डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला  गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला.   एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलगी व तिचे आई वडील प्रचंड तणावाखाली

MB NEWS-मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर

इमेज
  मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर  बीड- जेवण करताना चेष्टेत एका मित्राने तोंडावर बुक्की मारली अन रात्री त्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची दुर्दैवी घटना ढेकनमोहा येथे घडली आहे.किरकोळ वादातून सख्या मित्राने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार* हैदरअली तरफदार आणि सीमोल बिश्वास हे दोघे पश्चिम बंगाल मधील कामगार मित्र नगर बीड परळी रेल्वेच्या कामासाठी मजुरी करत होते.गेल्या अनेक महिन्यापासून हे दोघे या ठिकाणी काम करत होते.कामाच्या ठिकाणीच पत्र्याचे शेड करून या दोघांसह इतरही मजूर राहत होते. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ दरम्यान 25 मार्च रोजी रात्री काम संपवून हैदरअली आणि सीमोल या दोघांनी मद्यपान करत करत जेवण केले.यावेळी चेष्टे चेष्टेत या दोघांचा वाद झाला.त्यावेळी हैदरअली याने सिमोलच्या तोंडावर बुक्की मारली.इतरांनी त्यांचे हे भांडण सोडवले.दोघेही झोपण्यास निघून गेले. क्लिक क