MB NEWS- पञकार धनंजय आढाव यांना पितृशोक दशरथ आढाव यांचे वृद्धापकाळाने निधन

पञकार धनंजय आढाव यांना पितृशोक दशरथ आढाव यांचे वृद्धापकाळाने निधन परळी l प्रतिनिधी दैनिक दिव्य मराठी परळी तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव यांचे वडिल दशरथ आढाव यांचे आज शनिवार दि.22 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. मौजे निळा येथील दशरथ दादा आढाव यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि.22 मे रोजी दुपारच्या सुमारास निधन झाले. अचानक त्यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्राणज्योत मालवल्याचे कळवले. दशरथ दादा आढाव हे निळा व पंचक्रोशीतील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व होते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. अतिशय शांत, संयमी आणि लोकपरिचित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. आढाव कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात परळीचा संपूर्ण पत्रकार परिवार सहभागी आहे.