पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सकल मराठा आरक्षण आंदोलनास ब्राह्मण महाशिखर परिषदेचा जाहीर पाठिंबा : अनिल बोर्डे

इमेज
सकल मराठा आरक्षण आंदोलनास ब्राह्मण महाशिखर परिषदेचा जाहीर पाठिंबा : अनिल बोर्डे गेवराई:- गेवराई शहरात शांततामय वातावरणात चालू असलेल्या सकल मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्राह्मण महाशिखर परिषद चे तालुका संघटक यांनी पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्राह्मण महा शिखर परिषद भारतचे अध्यक्ष सचिन वाडे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत दडके यांच्या सहमतीने व गेवराई शहरातील ब्राह्मण महा शिखर परिषद भारतचे कार्यकर्ते व व इतर सकल ब्राह्मण यांच्या मागणीनुसार गेवराई शहरातील सकल मराठा आरक्षण आंदोलनास प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा दिलेला आहे    सकल मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून शांततामय वातावरणात आंदोलन मोर्चेकरीत आहेत तरी शासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही तरी सकल मराठा समाजाचा प्रश्न शासनाने तात्काळ सोडविण्यात यावा तसेच उपोषणास बसलेल्या समाज बांधवास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे     या निवेदनावर ब्राह्मण महा शिखर परिषद भारत तालुका संघटक अनिल बोर्डे श्रीकृष्ण मुळे अशोक देऊळगावकर जगन्नाथराव जोशी विश्वास चपळगावकर चंद्रकांत बोर्डे भास्कर अंबादास जोशी एस व्ही देशपांडे विनाय

अंबाजोगाई तालुक्यातील घटना

इमेज
  मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना अंबाजोगाई - तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री ११.३० वाजताच्या घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतर अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

ना. धनंजय मुंडेंचे अभिनंदन व विशेष आभार

इमेज
  परळी वैजनाथ तालुक्यातील संगांयो, इंगांयो, श्रावण बाळ, निराधार लाभार्थी यांची दिवाळी होणार गोड : डॉ. संतोष मुंडे ना. धनंजय मुंडेंचे अभिनंदन व विशेष आभार लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा आता लाभार्थ्यांना 1000 नाही तर 1500 रुपये दरमहा मिळणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना अंतर्गत असलेल्या निराधारांची यंदा दिवाळी गोड होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली. एकूण 24436 लाभार्थ्यांचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्याचे अनुदान थकीत होते. त्यासाठी कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा चालू होता. अखेर 26 ऑक्टोबर रोजी सर्व लाभार्थी यांना मिळणारी एकूण अनुदान रक्कम रु 10,85,79,600/एवढी बँकेत तहसील कार्यालयाने जमा केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला 1000/रु ऐवजी 1500/रु महिना प्रमाणे अनुदान मिळणार आहे. यामुळे सर्व लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी पैसे

मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव

इमेज
  मराठा आरक्षणाला पाठिंबा ;पुढाऱ्यांना प्रवेशबंदी : या ग्रामपंचायतीने घेतला अधिकृत ठराव अंबाजोगाई, प्रतिनिधी.....             गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता विविध ठिकाणच्या ग्रामपंचायती अधिकृतपणाने ठराव घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव करून मराठा लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. Click - ■ *मराठा आरक्षणाला पाठिंबा: ब्राह्मण महिला उपसरपंचाने दिला राजीनामा*         मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्

लढा गरजवंतांचा -पाठिंबा अन्य समाजघटकांचा

इमेज
मराठा आरक्षणाला पाठिंबा: ब्राह्मण महिला उपसरपंचाने दिला राजीनामा पाथरी, प्रतिनिधी.....             गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता ब्राह्मण समाजातूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव पुढे येत असून पाथरी तालुक्यातील रत्नेश्‍वर रामपुरी (खुर्द) येथील ब्राह्मण महिला उपसरपंचांनी राजीनामा दिला  आहे.         मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून गावागावात याबाबत जनसामान्य माणूस आंदोलन करताना दिसत आहे. मराठा

धनंजय मुंडेंच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनास निर्देश

इमेज
  माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा अंत्यविधी उद्या शासकीय इतमामात होणार धनंजय मुंडेंच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनास निर्देश मुंबई (दि. 27) - माजी केंद्रीय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार कै. बबनराव ढाकणे यांचे आज सकाळी निधन झाले असून उद्या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनास दिले आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे व दूरध्वनीवरून संपर्क करून विनंती केली होती.  माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे आज सकाळी 10 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी त्यांचे पार्थिव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  बीड जिल्ह्याचे खासदार, केंद्रात मंत्री, राज्यात कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते, विधानसभा उपाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती. गोवा मुक्तीच्या चळवळीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. उद्या दि. 28 रोजी त्यांचे मूळ गाव पागोरी पिंपळगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे त्य

पंकजा मुंडेंनी वाहिली बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली

इमेज
  महाराष्ट्राच्या राजकारणातील  अनुभवी नेतृत्व हरपले पंकजा मुंडेंनी वाहिली बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली बीड ।दिनांक २७। माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभव संपन्न नेतृत्व हरपले आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या आहेत.   ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक अनुभवसंपन्न नेतृत्व हरपले आहे.ढाकणे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत पंकजाताईंनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  ••••

श्री पंडित पार्डिकर महाविद्यालयाचा मुलींचा संघ डॉ बामु विद्यापीठात सर्व प्रथम

इमेज
 श्री पंडित पार्डिकर महाविद्यालयाचा मुलींचा संघ डॉ बामु विद्यापीठात सर्व प्रथम  सिरसाळा (प्रतिनिधी):- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि शिवछञपती महविद्यालय, पचोड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ऑक्टोबर गुरूवार रोजी आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन शिवछञपती महविद्यालय, पाचोड येथे कऱण्यात आले होते. या स्पर्धेत सिरसाळा येथील श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने एस जी आर जी कॉलेज परांडा, ॲड हंबर्डे कॉलेज आष्टी व आनंदराव धोंडे कॉलेज कडा या बलाढ्य संघाना एक तर्फी हरवत प्रथम क्रमांक पटकावला. या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एकुण ०७ संघांनी सहभाग घेतला होता. या मुलींच्या संघास क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले, प्रा. दयानंद झिंजूर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. मुलींच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम साहेब, सचिव, योगेश भैय्या कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, डॉ ए डी टेकाळे, डॉ विठ्ठल भोसले, प्रा. दयानंद झिंजूर्डे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्

माजीमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

इमेज
  माजीमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन बीड, एमबी न्युज वृत्तसेवा: जिल्हाचे माजी खासदार तथा संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे यांचे शुक्रवारी (दी.27) सकाळी साडे दहा वाजता दु:खद निधन झाले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी असलेले बबनराव ढाकणे हे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, राज्य मंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री ते बनले. 1989 मध्ये बीड लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि आश्चर्यकारक विजय मिळवला. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव केला होता.     संघर्षशील नेता असा परिचय असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ढाकणे हे निमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यात त्यांची प्रकृती खालावली. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस.एस.दीपक यांनी माध्यमांना दिली. बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल

सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता व थकीत रक्कम द्या

इमेज
  सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता व थकीत रक्कम द्या: 8 नोव्हेंबर पासून नगर परिषद  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन परळी वैजनाथ  : परळी नगरपरिषदेत सेवानिवृत कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 7 व्या वेतन फरकाचा दुसरा हप्ता व इतर थकीत मिळण्यासाठी दि. 8 नोव्हेंबर 2023 पासून नगर परिषदेपूढे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे व सरचिटणीस जगन्नाथ शहाणे यांनी सांगितले आहे.              महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांनी नगरपालीका सेवानिवृत कर्मचा-यांना 7 व्या वेतन फरकाने तीन हप्ते दिले आहेत परंतु परळी नगर परिषदेने फक्त पहिला व तिसरा हप्ता दिलेला आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवाउपदान व रजा रोखीकरणाची रक्कम दिलेली नाही. या सेवा उपदान व रजा रोखीकरणा ची रक्कम  मिळावी  म्हणून अनेक वेळा सेवानिवृत कर्मचारी संघटनेने आंदोलने केली. प्रत्येक वेळी लेखी आश्वासनेच मिळाली आहेत. दिपवाळीच्या सणासाठी सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत येणे व सातव्या वेतनाच्या फरकापैकीचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून दि 26 ऑक्टोबर 23 रोजी सह्यांचे निवेदन दिले आहे. जर दिनांक 7 नोव्हे 23 पर्यंत सातव

सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

इमेज
  सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन नवी मुंबई  :  ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर   यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ  येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.          जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.   दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.  शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदयाची परंपरा  बाबा महा

ना. धनंजय मुंडे यांचे डॉ. संतोष मुंडेंनी मानले विशेष आभार

इमेज
  महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड ना. धनंजय मुंडे यांचे डॉ. संतोष मुंडेंनी मानले विशेष आभार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नांतून निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष मुंडेंनी आभार मानत अजून जोमाने दिव्यांग कल्याण्यासाठी काम करत राहू असा निर्धार व्यक्त केला सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली समाजातील दिव्यांग, निराधार, विधवा आदी वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी डॉ. संतोष मुंडे हे सातत्याने कार्यरत असतात. आपल्या निवडीबद्दल ना. धनंजय मुंडेंचे विशेष आभार डॉ. संतोष मुंडेंनी मानले. *कोण आहेत डॉक्टर संतोष मुंडे?*          

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

इमेज
  स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत ● सभासदांना १०  टक्के लाभांश जाहीर● ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.           शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात मार्च 2023 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक  सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.                   संस्थेच्या कार्यालयात आज अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक  सर्वसाधारण सभा झाली. या वेळी आहवाल व ताळेबंद सभेत सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2023 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी- 40 कोटी 76 लाख 91 हजार 232,भागभांडवल- 69लाख 57हजार 550 ,कर्ज- 32 कोटी 58 लाख 50 हजार 649,गुंतवणूक 13 कोटी 13 लाख 85 हजार 332,निव्वळ नफा 76 लाख 47 हजार 294 इतका आहे.      पतसंस्थेच्या

पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे....

इमेज
  आता लोकांच्या संयमाची परिसीमा झाली: माझी आईची भुमिका; लेकरांच्या हिताचा विचार करणे परमकर्तव्य - पंकजा मुंडे आता मी घरी बसणार नाही, तुम्हांला मी मैदानात दिसेल : पंकजा मुंडे  तुम्हांला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरणार : पंकजा मुंडे भगवान भक्तीगड, सावरगांवघाट ..... पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे....         छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये माझं सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वागत केलं. मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या, माळी लोकांनी माझं स्वागत केलं. या दसऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी गर्दीचं सीमोल्लंघन केलं. यासाठी सर्वांचे आभार. मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली, तेव्हा मला वाटलं नव्हतं मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढं प्रेम मिळेल. शिवशक्ती परिक्रमा भव्य करण्याचं काम माझ्यावर आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनं केलं आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले तरी, तुमचे हे उपकार मला फेडता येणार नाहीत. माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली त्यावेळी तुम्ही दोन दिवसात 11 कोटी जमा केले. मला पैसे नको केवळ आशीर्वाद कायम ठेवा.तुम्ही उन्हात बसलात, म्हणून स्टेजवरचे सुद्धा उन्हात

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उसळणार लाखोंचा जनसागर

इमेज
  राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मगांवी उद्या भक्ती आणि शक्तीचा विराट संगम पंकजाताई मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उसळणार लाखोंचा जनसागर शिदोरी बांधून, शांततेने, वेळेवर स्वतःची काळजी घेत  भगवान भक्तीगडावर या..पंकजाताईंचं कार्यकर्त्यांना आवाहन बीड  । दिनांक २३। राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगांवी सावरगांव येथे उद्या भक्ती आणि शक्तीचा विराट संगम पहायला मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला लाखोंचा जनसागर उसळणार आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी शांततेत, वाहने हळू चालवत, घरची भाकरी, चटणी शिदोरी आणि पाण्याची बाटली घेऊन स्वतःची काळजी घेत भगवान भक्तीगडावर वेळेत या, असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.   पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ जारी करून  सर्वांना या मेळाव्याला येण्याचे आवाहन करतांना काही सूचना देखील केल्या आहेत. आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना काळजी घेण्याचे आवाहन करतांना म्हटले आहे, की सावरगावचा दसरा मेळावा ही आपली परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
परळीतील जुन्या पिढीतील वृत्तपत्र विक्रेते नागनाथअप्पा मोडीवाले यांचे  निधन            परळी वैजनाथ,दि.२३-                 येथील ज्येष्ठ नागरिक व जुन्या पिढीतील वृत्तपत्र विक्रेते श्री नागनाथ अप्पा गंगाधरअप्पा मुरुडकर (मोडीवाले ) यांचे आज (सोमवारी ) सकाळी ७ वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी सर्वाधिक १०३ वर्षांचे आयुष्य प्राप्त केले होते. श्री मुरुडकर हे वृत्तपत्र व्यवसाय क्षेत्रातील श्री दत्ता मुरुडकर यांचे वडील होते.त्यांच्यामागे मुलगा, सून, नातू-नाती असा परिवार आहे.                मूळचे घाटनांदुर येथील रहिवासी असलेले श्री मुरुडकर यांनी सुरुवातीला आपल्या गावात शेतीसोबतच किराणा व्यवसायात  काम केले. नंतर  हे ४४ वर्षांपूर्वी परळीला आले व त्यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य सुरू केले. अतिशय कष्टाळू , काटक,सुस्वभावी व धार्मिक असलेले श्री मुरुडकर यांची जुन्या पिढीतील  कर्मनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती. गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून  ते आजारी होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक प्रामाणिक  व्यक्तिमत्व जगातून निघून गेल्याने सर्वस्तरातून दुःख व्यक्त होत आहे.        त्यांच
इमेज
 चि.सूर्या सचिन सौंदळे याने सिकंद्राबाद येथील सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकावले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....    ज्योतीर्लिंग वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील सुपुत्र चि.सूर्या सचिन सौंदळे याने सिकंद्राबाद येथील सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धा 2023 च्या स्पर्धेत कास्य(ब्राँझ) पदक पटकावले आहे.   10 वे सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धा-2023 चे आयोजन दि.18 अॉक्टों ते दि. 20 अॉक्टों 2023 दरम्यान दिल्ली पब्लीक स्कूल,नचाराम,सिकंद्राबाद येथे करण्यात आले होते.   चि.सूर्या याने यापूर्वी बेंगलुरू येथील 17व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट ग्रुप मधून गोल्ड मेडल प्राप्त केले होते.   चि.सूर्या हा छत्रपती संभाजीनगर मधील वुडरिज हायस्कुल शाळेत पाचवीत शिक्षण घेत असून परळी-वैजनाथ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांचा पुतण्या आहे.जिम्नॅस्टिक सारख्या खेळात मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल चि.सूर्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक करण्यात येत आहे.

पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाची खेळाडू कू. निकिता म्हात्रे हिचे मॅरेथॉन स्पर्धेत यश

इमेज
  पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाची खेळाडू कू. निकिता म्हात्रे हिचे मॅरेथॉन स्पर्धेत यश सिरसाळा (वार्ताहर):- येथील श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाची खेळाडू कू. निकिता म्हात्रे बि.ए (व्दितीय वर्ष) हिने सागर फाऊंडेशन सांगली संचलित "स्वराज्य " स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित मॅरेथॉन स्पर्धा आणि दक्षिण भारत जैन सभा वीर सेवा दल मध्यवर्ती समिति व शांतीसागर को- ऑप. क्रेडिट सोसा.ली. समडोळी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय विराचार्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा खेळाडू कू. निकिता म्हात्रे हिने अनुक्रमे *प्रथम आणि द्वितीय क्रमांक* पटकावला. तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम साहेब, सचिव, योगेश भैय्या कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन

इमेज
  पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात होमहवन पूजा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन परळी वैजनाथ।दिनांक २२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या सोमवारी गोपीनाथ गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात महानवमी निमित्त होमहवन व पूजा संपन्न होणार आहे, याप्रसंगी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे.    गोपीनाथ गड येथे तूळजापूरची भवानी आई, कोल्हापूरची अंबाबाई आणि माहूरची रेणूकाई या तीनही देवीचे मंदिर पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम  आकर्षक आहे.  दरवर्षी येथे नवरात्रोत्सव मोठया उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो. शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त आश्विन शुध्द नवमी म्हणजे  सोमवार  २३ ऑक्टोबर रोजी गोपीनाथ गड (पांगरी) येथे देवीच्या मंदिरात सकाळी १० वा. पंकजाताई मुंडे  यांच्या हस्ते  विधियोक्त  पूजा व होम हवन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर महाआरती होणार आहे, याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांन