पोस्ट्स

MB NEWS-शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण

इमेज
  शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      तुझ्या नावावरील शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत सख्ख्या मुलाने आपल्या आईला व वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती नावावर करण्याच्या कारणाने लाडझरी या.परळी वैजनाथ येथील एका आरोपीने स्वतः च्या 50 वर्षीय आईला व वडिलांना मारहाण घरातील साहित्याची नासधुस केली अशा प्रकारची फिर्याद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी आईनेच याप्रकरणी आरोपी मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने आई व मुलगा असुन आरोपी पंडित नरहरी मुंडे याने तुझ्या नावावर असलेले शेत माझ्या नावावर कर असे म्हणुन आईच्या मांडीवर काठीने मारून मुक्कामार दिला.  तोंडावर लाथाबुक्याने, चापटाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचे पती नरहरी मुंडे यांना छातीवर दगडाने मारून मुक्कामार दिला.घरातील कपाटाचे काच फो

MB NEWS-राज्यसभेसाठी मतदान सुरू; संध्याकाळी 7 वाजता निकाल, सहाव्या जागेसाठी मोठी चुरस

इमेज
राज्यसभेसाठी मतदान सुरू; संध्याकाळी 7 वाजता निकाल, सहाव्या जागेसाठी मोठी चुरस --------------------------  राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या  उत्कंठता वाढली असून 10 जून म्हणजेच, आज राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे.  राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना आणि भाजपनं (BJP) आपापल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं आहे.  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतद

MB NEWS-महत्वाची माहिती जाणुन घ्या: बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स

इमेज
  महत्वाची माहिती जाणुन घ्या: बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स  HSC नंतर ऍडमिशनसाठी   • मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे* १. *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट २ *नीटप्रवेश* पत्र  ३. *नीट मार्क* लिस्ट ४. मार्क मेमो १० वी ५.  सनद १० वी ६.  मार्क मेमो १२ वी ७ नँशनँलीटी सर्टीफिकेट ८. रहिवाशी प्रमाणपत्र ९. टी सी १२ वी १०. मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस ११. आधार कार्ड १२. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा १३. मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते १४. मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड मागासवर्गीयां साठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे १. जातीचे प्रमाणपत्र २. जात वैधता प्रमाणपत्र ३. नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र  ( मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यत लागू) कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे. क्लिक करा व वाचा :•  *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*  *इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे* १. *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट २.  MHT-CET पत्र  ३. MHT-CET मार्क  लिस्ट ४. मार्

MB NEWS-प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात सत्कार

इमेज
  प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व खेळाडू मराठवाड्याचे भूमिपुत्र,महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीमचे स्टार गोलंदाज, ना.धनंजय मुंडे  यांचे जिवलग मित्र प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे वैद्यनाथ मंदिर येथे प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी आले असताना त्यांचा  जगमित्र कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अनिल वालेकर व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.      *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न* ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी  यांनी प्रसाद कानडे यांचा सत्कार केला. यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी फोन वरून प्रसाद कानडे आणि सहकाऱ्यांना  क्रिकेट क्षेत्रातील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन,मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या पदाधिकारी यांनी संवाद साधत ग्रामीण भागात देखील क्रिकेटसाठी

MB NEWS-आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न

इमेज
  आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न   अहमदनगर : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला, तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पाथर्डी येथील पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. •  *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या* सोशल मीडियावर पोस्ट....           मुकुंद गर्जे यांनी आज सोशल मीडियात एक पोस्ट केली. पंकजा यांच्यासाठी आपण जीव द्यायला तयार आहोत, अशा आशयाच

MB NEWS-⭕ राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

इमेज
⭕ राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर --------------------------  ◼️ 18 जुलैला होणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, 21 जुलै रोजी भारताला मिळणार नवे राष्ट्रपती -------------------------- अनेक दिवसांपासून ज्याची उत्सुकता लागली होती, त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून, 21 जुलै रोही देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद निवडणुकीची घोषणा केली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.  •  *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*  *'...तर मतदान रद्द होणार'* मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई पेन देण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी 1,2,3 अशा पर्यायांची निवड करावी लागेल. पहिली पसंती न दिल्यास, मतदान रद्द केले जाईल.'  •  *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह* 'या

MB NEWS- खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या

इमेज
   खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या बीड :शहरातील एका खासगी शिकवणी वर्ग चालकाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आज 9 जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्तरीय तपासणीसाठी सकाळी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला. राजाराम शिवाजी धस (40, रा. नाथसृष्टी, अंकुशनगर, बीड) असे मयताचे नाव आहे. राजाराम धस हे गेल्या वीस वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत होते. मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे राजाराम धस वडील पोलिसांत असल्यामुळे बीड शहरात वास्तव्याला आले. काही वर्षे शहरातील जिज्ञासा करिअर अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर गेल्या आठ वर्षापासून शहरातील अंकुशनगर भागात ते स्वतःच ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होते. 8 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राजाराम धस यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केलं आणि त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले, मात्र तीन वाजता त्यांचा लहान भाऊ उठला असता एका बंद असलेल्या खोलीचा दरवाजा त्याला उघडा दिसला आणि त्याने आत जाऊन पाहिले असता राजाराम धस यांनी गळफास घेतलेल्याच त्यांच्या निद

MB NEWS-कै.ल.दे.महिला महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

इमेज
  कै.ल.दे.महिला महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश परळी,दि.०८...      येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कायम राखली आहे. •  *बड्या भांडवलदारांच्या हातात सत्तेची सूत्र गेल्यानेच शेतकऱ्यांची भयावह अवस्था- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ* विज्ञान शाखेचा निकाल 98.23% तर कला शाखेचा निकाल 89.33 %अशा धवल स्वरूपाचा आहे.विज्ञान शाखेतून - वाघमारे नेहा शिवनारायण (87.00%) ,ठाकूर पूजा प्रताप  (84.83% ) , सय्यद ताहूरा बी मुसा (82.67%) तर कला शाखेतून - मुंडे तेजस्विनी नागनाथ ( 90.00%) ,मुंडे कोमल बळीराम (80.33% ) ,नागरगोजे अस्मिता सुदाम ( 79.68% )या विद्यार्थिनी महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या आहेत.महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मिळविलेल्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे संचालक  अनिलराव देशमुख,संस्थाध्यक्ष  संजय देशमुख , सचिव मा.रवींद्र देशमुख ,कोषाध्यक्ष मा. प्रसाद देशमुख, प्राच

MB NEWS-बड्या भांडवलदारांच्या हातात सत्तेची सूत्र गेल्यानेच शेतकऱ्यांची भयावह अवस्था- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ

इमेज
  बड्या भांडवलदारांच्या हातात सत्तेची सूत्र गेल्यानेच शेतकऱ्यांची भयावह अवस्था- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     देशात शेतकरी दबला आणि पिचला गेला आहे.  अधिक भयावह अवस्थेतून सध्या देशातील शेतकऱ्यांना जावे लागत आहे. सरकार कोणाचेही असो, संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही. सत्तेची धोरणं  बड्या भांडवलदारांच्या हातात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. असे प्रतिपादनआंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ यांनी परळी येथील पिक विमा परिषदेत बोलताना केले. •  गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*       परळी वैजनाथ येथे किसान सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पिक विमा परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी साईनाथ यांच्या हस्ते झाले यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परखड शब्दात भाष्य करताना त्यांनी विविध विषयावर आपली मते मांडली. त्यांनी शेतकरी, पीक विमा, देशातील परिस्थिती आदी मुद्यांवर परखड शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले, भारत कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकऱ्यांना न्यायासाठी

MB NEWS-गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह

इमेज
  गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह बीड : राज्यात खळबळ उडवून देणार्‍या बीड येथील गर्भपात प्रकरणात पाच जणांवर गुन्हा नोंद झाला होता. यातील सिमा सुरेश डोंगरे (रा. शिक्षक कॉलनी, बीड) या सिस्टरने बींदुसरा धरणात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  दोन दिवसांपुर्वी अवैध गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेला पुर्वीच्या तीन मुली होत्या. चौथ्यांदा गर्भवती असताना गर्भपात करण्यात आला. अति रक्तस्त्राव झाल्याने गंभीर अवस्थेते एका खाजगी दवाखान्यात व नंतर जिल्हा रूग्णालयात सदरील महिलेला दाखल करण्यात आले. यावेळी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान शवविच्छेदन अहवलात अवैध गर्भपात करताना मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान मयत महिलेचा पती व नातेवाईकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी गर्भनिदान करणार्‍या डॉक्टर महिलेचे नाव सांगीतले. तसेच गावी गोठ्यात गर्भपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा गर्भपाद एका सीस्टरच्या मदतीने करण्यात आल्याचेही उघडकीस आले होत. दरम्यान या प्रकरणी पाच जणांविर