पोस्ट्स

MB NEWS- परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन

इमेज
  परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी..       केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे.आज परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.          महागाईचा आगडोंब उसळला असुन सामान्य माणूस या आगीत होरपळून गेला आहे.परळीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निवेदन देऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी शहराध्यक्षा सोफिया बाबु नंबरदार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.यावेळी सुनीता नंगराळकर, मीनाकुमारी वैद्य ,रिता साखरे, राधाबाई, रजिया शेख,ताहिरा कलिम पठाण,उषा वाघमारे,,झुकेखा शेख, ,नूरझा शेख,साजन शेख, लक्ष्मीबाई, अखिला शेख,खैरुन शेख, इर्शाद शेख,बिलकसी शेख,अर्चना पाजे, यासमी शेख,कलावती बाई,शेख खैरु,हकिला शेख,इरसत शेख,नुरझा शेख,दुर्गा गायकवाड, यमुना बुक्तर,प्रतिभा रमेश, छाया ठाकूर, आशा ठाकुर  आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

MB NEWS-महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?* - *पंकजाताई मुंडे यांचा सवाल* *मध्यप्रदेश करू शकते तर आपण का नाही?*

इमेज
 * महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?* - *पंकजाताई मुंडे यांचा सवाल* *मध्यप्रदेश करू शकते तर आपण का नाही?*  मुंबई  ।दिनांक १८। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का? असा खडा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारमध्ये इच्छा आणि प्रयत्नांचा अभाव जाणवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.   मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणा संदर्भातील इम्पेरिकल डेटा सादर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तेथे ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिली. यासंदर्भात महाराष्ट्रातील स्थितीबाबत पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केलं आहे, त्यांनी म्हटलं आहे की,  "महाराष्ट्र सरकार ला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का? मध्य प्रदेश करू शकते तर आपण का नाही? इच्छा तिथे मार्ग ! पण इच्छा आणि प्रयत्नांचा अभाव ओबीसींना महाराष्ट्र राज्यात जाणवत आहे " *मंत्रीपदापेक्षा ओबीसींचा विचार करा* ------------- पंकजाताई मुंडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना म्हणाल्या की,मध्य प्रदेशने इम्पेरिकल डे

MB NEWS-हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्याव्यात यासाठी केंद्राकडे शिफारस करणार- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

इमेज
  हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्याव्यात यासाठी केंद्राकडे शिफारस करणार- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बार्टीने समाजाच्या अभ्यासाच्या अहवालातील त्रुटी पूर्ण करून 15 दिवसात परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे मुंडेंचे निर्देश *हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश* मुंबई (दि. 18) - राज्यात हिंदू खाटीक समाजाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत, हिंदू खाटीक, कलाल खाटीक, धनगर खाटीक अशी नावे विभाग निहाय वेगळी आहेत तसेच काही भागात अनुसूचित जातीशिवाय ओबीसी व अन्य पोट प्रवर्गातून आरक्षण दिलेले आहे. हिंदू खाटीक प्रवर्गातील सर्व नावे एकाच प्रवर्गातील असल्याचे ग्राह्य धरून त्यांना अनुसूचित जाती प्रमाणे सर्व सवलती लागू कराव्यात, यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र सरकारला परिपूर्ण प्रस्ताव शिफारशीसह पाठविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिली.  महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेच्या विनंतीवरून मंत्रालयात यासंदर्भात ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज

MB NEWS-परळी शहरात बुध्द जयंतीनिमित्त उत्साहात धम्म रॅली

इमेज
  परळी शहरात बुध्द जयंती निमित्त उत्साहात धम्म रॅली परळी(प्रतिनिधी)÷ 2566व्या बुध्द जयंतीनिमित्त परळीत दि15मे2022रोजी बुध्द वंदना संघाच्या वतीने शहरातुन भव्य धम्म रॅली  सांय 6:00वा मोठ्या उत्साने काढण्यात आली.         बुध्द वंदना संघाच्या वतीने वैशाख पौर्णिमा अर्थात बुध्द जयंती 15मे रोजी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.सकाळी 9:00 वाजता डाॅ बाबासाहेब आंबेडकर सभागृह,भिमनगर,परळी    धम्मध्वजाचे ध्वजारोहन मा एच टी वाघमारे यांच्या हस्ते झाले ,त्यानंतर सामुदायिक "बुध्दवंदना"होऊन अंबादास रोडे व उत्तम समुद्रे यांच्याकडुन "खिरदान" करण्यात आले.सांय. 6:00वाजता भिमनगर येथुन सजवलेल्या रथातुन तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य अशा प्रतिमेची मिरवणुक अर्थात धम्म रॅली सुरुवात झाली.या रॅलीत "जग में बुध्द का नाम है! यही भारत की शान है!,"जगाला युध्द नको! बुध्द हवा"',बुध्दम शरणम गच्छामी"अशा घोषणा देत ही रॅली गणेशपार,मिलिंद काॅलेज,टाॅवर चौक,मोंढा मार्केट मार्गे डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,रेल्वे स्टेशन,परळी येथे विसर्जन करण्यात आले.सम्राट अशोक विचार मंचच्या व

MB NEWS-प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे लोकोत्तर कार्य प्रेरक ठरेल - ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री

इमेज
 🔸 प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे लोकोत्तर कार्य प्रेरक ठरेल -  ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री  🔸 _राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन_ परळी वैजनाथ दि. 03 ------           प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे संपूर्ण जीवन हे अनेकांना  उन्नतीच्या प्रवाहात आणण्यासाठी गेले. अध्यात्मिक दृष्टीने त्यांच्या जीवनाचा अर्थ उदात्त व निस्पृह जीवनाइतकाच महत्त्वाचा आहे.या लोकोत्तर कार्याने सदैव प्रेरणा मिळत राहील असे  प्रतिपादन  ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांनी केले. प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी यानिमित्ताने स्मृतींना  अभिवादन केले.         परळी वैजनाथ येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा कै.प्राचार्या रेखा जनार्धनराव परळीकरज्ञ यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे परळीत दि.१७ मे रोजी आयोजन करण्यात आले होते.अक्षदा मंगल कार्यालय,शिवाजी

MB NEWS-देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी परळीचा भुषण नावंदे इंग्लडला रवाना

इमेज
  देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी परळीचा भुषण नावंदे इंग्लडला रवाना परळी वैजनाथ/प्रतिनिधी इंग्लड येथे देशांतर्गत अंतर क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे परचुंडी येथील  किक्रेटपटू भुषण भिमाशंकर नावंदे यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत भूषण हा टेडीगटॉन क्रिकेट क्लबकडून खेळणार असून तसा करार करण्यात आला आहे. औरंगाबाद येथून सोमवारी इंग्लड येथे रवाना होण्यापुर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (ता.१६) भुषणचा या निवडीबद्दल सत्कार केला.  आवश्य पहा: 🏵️ *DIGITAL PAGE*🏵️ *_दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण_* २०१९ मध्येही इंग्लड येथे झालेल्या अंतर क्लब किक्रेट स्पर्धेतही भुषण नावंदे यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्याच्याच जोरावर त्याला पुन्हा संधी मिळाली आहे. त्यावेळी भुषण ने दोन शतक झळकवले होते. टेडिंग्टन क्रिकेट क्लब डोरा जॉर्डन रोड, टेडिंग्टन, मिडलसेक्स येथे हे सामने होणार आहे. (Bushy park off Dora Jordan Road Tedddington) भुषणची सुरुवात औरंगाबाद येथील जिल्हा किक्रेट संघटनेच्या मैदानावर झाली. व्हिजन क्रिकेट अकॅडमी येथे सरा

MB NEWS-कराड येथे लेखापरीक्षकांचे २१-२२ मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन

इमेज
  कराड येथे लेखापरीक्षकांचे २१-२२ मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... ऑडिटर कौन्सिल अॅण्ड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कराड (जि. सातारा) येथे येत्या २१ व २२ मे रोजी राज्यस्तरीय लेखापरीक्षक अधिवेशन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.           याप्रसंगी राज्याचे सहकार तथा पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  या अधिवेशनास मराठवाड्यातून अडीचशे पेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष श्री. संजय वाणी यांनी दिली. तर जास्तीत संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, खजिनदार संदीप नगरकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी केल्याचेही असोसिएशनकडून कळवण्यात आले आहे.       कराड अर्बन बँकेच्या सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त तथा निबंधक अनिल कवडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सहनिबंधक लेखापरिक्षण तान्हाजी क

MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलला धुळ चारत पद्मावती शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी

इमेज
  पुस सेवा सहकारी सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ;  सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलला धुळ चारत पद्मावती शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी अंबाजोगाई  । दिनांक १६।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पद्मावती शेतकरी विकास पॅनलने तालुक्यातील पुस सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादीच्या पॅनलला धुळ चारत पॅनलने सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली आहे.  पंकजाताई मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.    पुस सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती परंतू आज आलेल्या निकालानंतर या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पद्मावती शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवारांत सर्वश्री  पांडूरंग आकाते, मधुकर आडसुळे, आदिनाथ गौरशेटे, शिवाजी घोलप,पठाण आझाद ईस्मालखाँ, दगडू पवार, रामराजे पवार, हरिश्चंद्र हाके, मैनाबाई उदार,मीराबाई  देशमुख, पलिंका हाके, सचिन गौरशेटे, रघुनाथ गायक