MB NEWS-प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे लोकोत्तर कार्य प्रेरक ठरेल - ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री

 🔸 प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे लोकोत्तर कार्य प्रेरक ठरेल -  ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री



 🔸 _राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन_


परळी वैजनाथ दि. 03 ------ 

         प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे संपूर्ण जीवन हे अनेकांना  उन्नतीच्या प्रवाहात आणण्यासाठी गेले. अध्यात्मिक दृष्टीने त्यांच्या जीवनाचा अर्थ उदात्त व निस्पृह जीवनाइतकाच महत्त्वाचा आहे.या लोकोत्तर कार्याने सदैव प्रेरणा मिळत राहील असे  प्रतिपादन  ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांनी केले. प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी यानिमित्ताने स्मृतींना  अभिवादन केले.



        परळी वैजनाथ येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा कै.प्राचार्या रेखा जनार्धनराव परळीकरज्ञ यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे परळीत दि.१७ मे रोजी आयोजन करण्यात आले होते.अक्षदा मंगल कार्यालय,शिवाजी चौक, परळी वैजनाथ येथे त्यानिमित्त  ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे-शास्त्री यांचे किर्तन झाले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सभा झाली.प्रारंभी  मा. आमदार अॅड. विजयराव गव्हाणे व परिवारातील सदस्यांनी प्रतिमा पुजन केले. याप्रसंगी जेष्ठ नेत्या प्रा.सुशिलाताई मोराळे, क्रांतीताई चापके, प्रा.डाॅ. राजकुमार यल्लावाड,प्रा.डाॅ. विनोद जगतकर आदींनी मनोगत व्यक्त केले.संजय सुरवसे यांनी जिजाऊ वंदना गायन केले. सुत्रसंचलन प्रा.रविंद्र जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.प्रविण फुटके यांनी केले.कार्यक्रमास आप्तेष्ट, नातेवाईक, स्नेही, प्राध्यापक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवश्य पहा:🏵️ *DIGITAL PAGE*🏵️ *_दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण_*

      

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

         

🌑 *समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज*


*स्वतःच्या घरात चार्जिंग ला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन*


🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*


🛑 *परळीकरांनी वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील भगवान नृसिंह मंदिरात केला जन्मोत्सव;दर्शनाला गर्दी.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !