इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी परळीचा भुषण नावंदे इंग्लडला रवाना

 देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी परळीचा भुषण नावंदे इंग्लडला रवाना



परळी वैजनाथ/प्रतिनिधी

इंग्लड येथे देशांतर्गत अंतर क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे परचुंडी येथील  किक्रेटपटू भुषण भिमाशंकर नावंदे यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत भूषण हा टेडीगटॉन क्रिकेट क्लबकडून खेळणार असून तसा करार करण्यात आला आहे. औरंगाबाद येथून सोमवारी इंग्लड येथे रवाना होण्यापुर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (ता.१६) भुषणचा या निवडीबद्दल सत्कार केला. 

आवश्य पहा:🏵️ *DIGITAL PAGE*🏵️ *_दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण_*

२०१९ मध्येही इंग्लड येथे झालेल्या अंतर क्लब किक्रेट स्पर्धेतही भुषण नावंदे यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्याच्याच जोरावर त्याला पुन्हा संधी मिळाली आहे. त्यावेळी भुषण ने दोन शतक झळकवले होते. टेडिंग्टन क्रिकेट क्लब डोरा जॉर्डन रोड, टेडिंग्टन, मिडलसेक्स येथे हे सामने होणार आहे. (Bushy park off Dora Jordan Road Tedddington) भुषणची सुरुवात औरंगाबाद येथील जिल्हा किक्रेट संघटनेच्या मैदानावर झाली. व्हिजन क्रिकेट अकॅडमी येथे सराव करायचा. आता पुणे येथील पीवायसी हिंदू जिमखाना येथे सराव करत आहे. तेथे त्याला निरंजन गोडबोले व मंदार चिपळुणकर हे प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळत आहे. यासह देशाची माजी फलंदाज कोच संजय बांगर व भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव व किर्तीराज वाडेकर व फिटनेस प्रशिक्षक अनुज शेळके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांनी केलेल्या सत्कार कार्यक्रमास भुषणचे वडील भिमाशंकर नावंदे, माजी नगरसेवक महेश माळवतकर, भाजपचे युवा नेते हर्षवर्धन कराड उपस्थित होते.

 आवश्य पहा:🏵️ *DIGITAL PAGE*🏵️ *_दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण_*

      

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

         

🌑 *समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज*


*स्वतःच्या घरात चार्जिंग ला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन*


🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*


🛑 *परळीकरांनी वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील भगवान नृसिंह मंदिरात केला जन्मोत्सव;दर्शनाला गर्दी.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!