इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळी शहरात बुध्द जयंतीनिमित्त उत्साहात धम्म रॅली

 परळी शहरात बुध्द जयंती निमित्त उत्साहात धम्म रॅली



परळी(प्रतिनिधी)÷ 2566व्या बुध्द जयंतीनिमित्त परळीत दि15मे2022रोजी बुध्द वंदना संघाच्या वतीने शहरातुन भव्य धम्म रॅली  सांय 6:00वा मोठ्या उत्साने काढण्यात आली.

        बुध्द वंदना संघाच्या वतीने वैशाख पौर्णिमा अर्थात बुध्द जयंती 15मे रोजी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.सकाळी 9:00 वाजता डाॅ बाबासाहेब आंबेडकर सभागृह,भिमनगर,परळी    धम्मध्वजाचे ध्वजारोहन मा एच टी वाघमारे यांच्या हस्ते झाले ,त्यानंतर सामुदायिक "बुध्दवंदना"होऊन अंबादास रोडे व उत्तम समुद्रे यांच्याकडुन "खिरदान" करण्यात आले.सांय. 6:00वाजता भिमनगर येथुन सजवलेल्या रथातुन तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य अशा प्रतिमेची मिरवणुक अर्थात धम्म रॅली सुरुवात झाली.या रॅलीत "जग में बुध्द का नाम है! यही भारत की शान है!,"जगाला युध्द नको! बुध्द हवा"',बुध्दम शरणम गच्छामी"अशा घोषणा देत ही रॅली गणेशपार,मिलिंद काॅलेज,टाॅवर चौक,मोंढा मार्केट मार्गे डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,रेल्वे स्टेशन,परळी येथे विसर्जन करण्यात आले.सम्राट अशोक विचार मंचच्या वतीने रॅलीचे भव्य स्वागत केले व रॅलीतील सर्वांना खिरदान करण्यात आले.

या रॅलीमध्ये परळी शहरातील विविध नगर व वस्त्यातून असंख्य बौध्दजन शुभ्र वस्त्र परीधान करुन शिस्तीत सहभागी झाले होते.

    सदरील रॅली यशस्वी करण्यासाठी प्रा विलास रोडे,सिध्दार्थ जगतकर,वैजनाथ(तात्या)जगतकर,भालचंद्र ताटे,भारत ताटे,वसंत बनसोडे,संदीप ताटे,अशोक तरकसे राधाकिशन शिंदे,अॅड संजय रोडे,अनिता रोडे,वंदना जगतकर,सपना रोडे,गवळणबाई गोखले,रोहीनी कांबळे,सोजरबाई ताटे डाॅ समिक्षा रोडे,सुजाता रौडे इ सह अनेक जणानी परिश्रम घेतले

आवश्य पहा:🏵️ *DIGITAL PAGE*🏵️ *_दिवंगत प्राचार्या डॉ.आर.जे. परळीकर प्रथम पुण्यस्मरण_*

      

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

         

🌑 *समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज*


*स्वतःच्या घरात चार्जिंग ला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन*


🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*


🛑 *परळीकरांनी वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील भगवान नृसिंह मंदिरात केला जन्मोत्सव;दर्शनाला गर्दी.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!