पोस्ट्स

MB NEWS:मराठा आरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारनं उचलायलाच हवी, केंद्रावर ढकलणं योग्य नाही'

इमेज
  'मराठा आरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारनं उचलायलाच हवी, केंद्रावर ढकलणं योग्य नाही' मुंबई :  मराठा आरक्षण स्थगितीबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय धक्कादायक आहे. कोर्टाचा निर्णय मलाही पटलेला नाही. मराठा आरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारनं उचलायलाच हवी, केंद्रावर जबाबदारी ढकलणं योग्य नाही, अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. आरक्षण परत कसं मिळवता येईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, पोलिस भरती या मुद्द्यांवर भाष्य केले.  मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्रावर जबाबदारी ढकलू नये, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, की राज्य सरकार आपल्यावर जबाबदारी घेत नाही. मी बेजबाबदारपणे विधाने करणार नाही. अध्यादेशाबाबत विधीज्ञांशी चर्चा केली जाऊ शकते. सरकारने आरक्षणाची जबाबदारी उचलायलाच हवी. केंद्राला पक्षकार करून काही उपयोग होणार नाही. केंद्राला पक्षकार करणं, हे याचिकाकर्त्यांच्या हातात आहे.   आरक्षणासंदर्भात आत्मचिंतन करून स्थगिती हटवण्यासाठी राज्

MB NEWS:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह* *अंतर्गत परळी भाजपच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ, आयुषकाढा वाटप*

इमेज
 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह*  *अंतर्गत परळी भाजपच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ, आयुषकाढा वाटप* परळी वैजनाथ, दि.17... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान परळी भाजपच्या वतीने  लोकनेत्या  पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज दि. 17 रोजी ग्रामीण रुग्णालय, परळी वै येथे फळे व आयुष काढ्याचे वाटप परळी भाजपच्या वतीने करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात आला. लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण परळी शहर व तालुक्यामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीरे, गरजुंना मदत, विविध सामाजिक कार्यक्रम या सप्ताहांतर्गत साजरे केले जात आहेत. 18 रोजी गरीब बंधू भगिनींना आवश्यकतेनुसार चष्मा वाटप, 19 तारखेला अक्षता मंगल कार्यालयात सकाळी 10 वा. पासून युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबीर, 20 रोजी प्रत्येक बुथमध्ये वृक्षारोपण

MB NEWS:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने व्यावसायिकांना फेसशिल्ड चे वाटप" •_सेवा व आत्मनिर्भर भारत सप्ताह अंतर्गत उपक्रम_•

इमेज
 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने व्यावसायिकांना फेसशिल्ड चे वाटप" •_सेवा व आत्मनिर्भर भारत सप्ताह अंतर्गत उपक्रम_• • सोनपेठ, प्रतिनिधी....       सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने केश कर्तनालय, फुटपाथवर बसणारे छोटे व्यावसायिक यांना फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सेवा व आत्मनिर्भर भारत सप्ताह अंतर्गत उपक्रम राबवण्यात आला.               सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील केस कर्तनालय व्यावसायिक व फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना फेसशिल्ड (फायबर मास्क)चे वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते रमाकांतराव जहागीरदार, भाजप व्यापारी आघाडीचे मराठवाडा प्रमुख बालाप्रसाद मुंदडा, किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस रंगनाथराव सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर गव्हाडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश हांडे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ निळ

MB NEWS:जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण*

इमेज
 *जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण* बीड, दि. १७:--जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,  निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर ,  उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील,  उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यासह विविध विभागांचे  तहसीलदार , अधिकारी-कर्मचारी आदी  निमंत्रित उपस्थित होते. 0000000

MB NEWS: *सत्तेत असो किंवा नसो, मी मराठा आरक्षणाच्या कायम बाजूनेच - धनंजय मुंडे* *मराठा क्रांती मोर्चा धरणे आंदोलनात भेट देऊन स्वीकारले निवेदन*

इमेज
 *सत्तेत असो किंवा नसो, मी मराठा आरक्षणाच्या कायम बाजूनेच - धनंजय मुंडे* *मराठा क्रांती मोर्चा धरणे आंदोलनात भेट देऊन स्वीकारले निवेदन* बीड (दि. १७) ---- : सत्तेत नसताना व असताना देखील मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आरक्षणाच्या बाजूने राहिलो आहे;  राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले जातील असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन ना. मुंडे यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून निवेदन स्वीकारले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी स्वतः सत्तेत नसताना आणि असताना देखील विधिमंडळ सभागृहात व अगदी रस्त्यावर उतरून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे पाठीशी असून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तसेच अन्य न्य

MB NEWS: *बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात संपन्न* *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे ध्वजारोहण ;* *स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना श्रद्धांजली*

इमेज
 *बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात संपन्न* *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे ध्वजारोहण ;* *स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना श्रद्धांजली* *कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेली ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’  ही मोहिम लोकचळवळ व्हावी--- पालकमंत्री धनंजय मुंडे* बीड, (जिमाका) दि.17:-- कोरोनाविरूद्ध आक्रमकपणे लढण्याची गरज असून यासाठी राज्य सरकारने  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी अशा अनेक चळवळी लोकसहभागाने आपण यशस्वी केल्या आहेत. मोहिम तीन टप्प्यात २४ ऑक्टोबर पर्यंत राबवली जाईल. लोक प्रतिनिधी, सरपंच, नगरसेवक व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेऊन ही लोकचळवळ करण्याची वेळ आली आहे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे ही लढाई आता एकांगी राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ पोलीस मुख्यालय मैदान बीड येथे संपन्न झाला. यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन याप्रसंग

MB NEWS:*बीड जिल्ह्यात ऑक्सीजन सुविधा असणारे 907 वर तर व्हेंटिलेटरची सुविधा असणारे ही 185 बेड उपलब्ध* *बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका, काळजी घ्या - धनंजय मुंडे*

इमेज
 *बीड जिल्ह्यात ऑक्सीजन सुविधा असणारे 907 वर तर  व्हेंटिलेटरची सुविधा असणारे ही 185 बेड उपलब्ध* *बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका, काळजी घ्या - धनंजय मुंडे* बीड (दि. १७) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेचा नुकताच आढावा घेतला असून, पुणे - मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याची ओरड असताना बीड जिल्ह्यातील व्यवस्थापन व नियोजनामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचे 907 तर व्हेंटिलेटरचे १८५ बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्टिंग, स्वॅब व अन्य माध्यमातून तपासण्या वाढविण्यात आल्या असून, आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. उपलब्ध बेडच्या संदर्भात नागरिकांनी संभ्रम बाळगू नये, तसेच आजाराची लक्षणे दिसताच स्वतःहुन कोविड तपासणी करून घ्यावी असे आवाहन बैठकीनंतर ना. मुंडे यांनी जिल्हा वासीयांना केले. बुधवार (दि. १६) रोजी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपलब्ध बेडची संख्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची वर्गवारी सहित माहिती घेतली.  नागरिकांमधील संभ्रम दूर करण्याबाबत निर्देश दिले, तसेच रुग्णालय निहाय उपलब्ध

MB NEWS:कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे मराठवाडा मुक्ती दिनाचे ध्वजारोहण

इमेज
 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे मराठवाडा मुक्ती दिनाचे ध्वजारोहण * सोनपेठ दि.17 (प्रतिनिधी) - तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था  संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा  येथे मराठवाडा मुक्ती दिनाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.          कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्कचा वापर केला होता.

MB NEWS:भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या हस्ते पत्रकार प्रा.प्रविण फुटके यांचा सत्कार

इमेज
 भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या हस्ते पत्रकार प्रा.प्रविण फुटके यांचा सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील दै. सकाळचे पत्रकार प्रा.प्रविण फुटके सर यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या हस्ते शाल , पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.       भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या संपर्क कार्यालयात  दै.सकाळचे प्रतिनिधी तथा कै.ल.दे.महिला महाविद्यालयातील प्रा.प्रविण फुटके सर यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.                यावेळी राजेश गित्ते यांच्यासह पत्रकार सचिन भांडे, रामकिशन गिते, श्रीकृष्ण आघाव, राहुल मिसाळ, पत्रकार धिरज जंगले, माणिक कोकाटे, महादेव गित्ते, संतोष घुंबरे आदी उपस्थित होते.

MB NEWS:स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न

इमेज
 स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न  परळी वैजनाथ दि.17 (प्रतिनिधी) -येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले             शक्तीकुंज वसाहतीतील महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळराव काकडे, न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील लोमटे, स्वामी विवेकानंद  महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री अजय सोळंके सर त्याचप्रमाणे दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते.  तसेच सर्व उपस्थितांनी मास्क चा वापर केला होता.

MB NEWS:आज 158 करोना पेशंटला सुट्टी मिळणार

इमेज
 बीड जिल्हा कोरोना अपडेटस्....... आज158 करोना पेशंटला सुट्टी मिळणार

MB NEWS:मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करा* *परळीत संभाजी ब्रिगेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन*

इमेज
 *मराठा समाजाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करा* *परळीत संभाजी ब्रिगेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन* परळी,(प्रतिनिधी):- मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी आज दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 वा. परळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, तसेच अन्य कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा आरक्षण दरम्यान अंतिम निर्णयासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटना पिकाकडे पाठवत असताना सद्यस्थितीत SEBC अंतर्गत असलेले मराठा आरक्षण स्थगित केली आहे. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून यामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे.  तरी मा. राज्य शासनाने आपल्या  कार्यकक्षेत SEBC अंतर्गत आरक्षण पूर्वत करून मराठा समाजाला न्याय द्यावा, त्याचबरोबर याबाबत सलग्न पुढील प्रमाणे मागण्या करत आहोत. १)राज्य मागासवर्ग आयोगाच्या (मा .न्यायमूर

MB NEWS:*राष्ट्रवादी चित्रपट सेलच्या मराठवाडा विभागस्तरीय कार्यकारिणीची ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत घोषणा*

इमेज
 *राष्ट्रवादी चित्रपट सेलच्या मराठवाडा विभागस्तरीय कार्यकारिणीची ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत घोषणा* परळी (दि. १६) ---- : राष्ट्रवादी चित्रपट ,साहित्य,कला व संस्कृतिक सेलच्या मराठवाडा विभागाच्या विविध पदाधिकारी यांची महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्राच्या तळागाळातील कलावंतांच्या मूलभूत प्रश्नांना सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी हा सेल सक्रिय झाला असून ,मराठवाड्यात या सेल चे डॉ.सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली जोमात काम सुरू केले असून गावपातळीवर पक्षाचे विचार ध्येय धोरणे पोहोचविण्यासाठी , पक्षवाढीसाठी कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहेत. या वेळी  मा. ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते उस्मानाबाद, परभणी ,बीड या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या या वेळी देण्यात आल्या.  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वृद्ध, अपंग, कलावंत लोककलावंत यांना काही मदत करता येऊ शकते का यावर धनंजय मुंडे साहेबांनी आलेल्या कलावंतांच्या समवेत अभ्यासपूर्वक  चर्चा केली. आगामी

MB NEWS:गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठीकालबद्ध मोहीम राबवा कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

इमेज
  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी कालबद्ध मोहीम राबवा कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विमा कंपन्यांना निर्देश मुंबई, दि. 16 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी आणि शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विमा कंपन्यांना दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत शेतकरी अपघात विमा योजनेचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्तालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणनिहाय आढावा घ्यावा. त्याची फेरतपासणी करावी, कागदपत्रांची पूर्तता करुन ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाला दिलासा द्यावा, असेही श्री. भुसे यांनी सांगितले. यावेळी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या वर्षातील प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. या योजनेत ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठीदेखील विभागाने कार्यवाही करावी. तातडीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्या

MB NEWS:मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा !

इमेज
मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा ! मुंबई दि. १६ – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “मराठवाडा मुक्तीच्या प्रदीर्घ लढ्यात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.  मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढ्यातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो तसेच सर्वांना मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

MB NEWS:नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण सर्व संबंधितांचे मत जाणून घेण्याची राज्यपालांची सूचना

इमेज
  नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण संबंधितांचे मत जाणून घेण्याची राज्यपालांची सूचना मुंबई, दि. १६ – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर विस्तृत सादरीकरण करण्यात आले. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यामध्ये विचार केला आहे. धोरणाच्या माध्यमातून नितीमूल्ये व संस्कार, मातृभाषेतून शिक्षण, भारतीय भाषांना चालना, आंतरशाखीय शिक्षण यांना चालना देण्यात आली आहे. धोरणाला व्यावहारिक रूप देऊन त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने शिक्षणतज्ञ, शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी तसेच इतर सर्व संबंधितांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घ्यावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यात शून्य ते १० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जवळ जवळ ५००० शाळा आहेत याची नोंद घेऊन विभागाने राज्याच्या विविध भागात सुरु असलेल्या एकल विद्यालयांची तसेच अंगणवाड्यांची माहिती घ्यावी अशीही सूचना राज्यप

MB NEWS:कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन समारंभ सूचनांचे काटेकोरपणे पालन करून साजरा होणार*

इमेज
 *कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन समारंभ सूचनांचे काटेकोरपणे पालन करून साजरा होणार* बीड, दि,16 :-- (जि.मा.का.) - कोरोना विषाणू संसर्गाची पार्श्र्वभूमी लक्षात घेता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा संपूर्ण कार्यक्रम हा सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून तसेच सर्वासाठी मास्क बंधनकाराक असून केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी वेळीवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करावा.  अशा सूचना विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना  परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मुख्य शासकीय समारंभ, पोलीस मुख्यालय मैदान, बीड येथे ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी निमंत्रित  मान्यवर उपस्थित राहतील . निमंत्रणाशिवाय इतर कोणीही उपस्थित राहू नये असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ००००

MB NEWS:पुणे कोरोना अपडेटस्....

इमेज
  पुणे कोरोना अपडेटस्.... *जिल्हा आरोग्य अधिकारी अहवाल, पुणे दि.16 सप्टेंबर 2020* पुणे जिल्हा नवीन रुग्ण - 4,656 एकूण रुग्ण - 2,35,852 आज पुणे शहर - 2,120 पिंपरी चिंचवड -  1, 104 ग्रामीण, नगरपरिषद व कन्टोनमेंट - 1,432 आजचे मृत्यू  - 74 (पुणे शहर - 43 पिंपरी - चिंचवड - 12 पुणे ग्रामीण- 14 नगरपरिषद- 5 कंन्टोन्मेंट- 0) एकूण मृत्यू  - 5,366 आजचे डिस्चार्ज - 3,505 एकूण डिस्चार्ज- 1,88,154 ---------------------------

MB NEWS:मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती, उद्या-परवाच घेणार निर्णय*

इमेज
 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 -----------------------------------  *⭕ मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती, उद्या-परवाच घेणार निर्णय* -----------------------------------  मुंबई, 16 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपली असून लवकरच कायदेशीर बाबी तपासून घटनापीठकडे जाणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 'एक मार्ग ठरवण्याच्या जवळ आलो. विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले आम्ही सरकार सोबत आहोत. मराठा आरक्षणाबाबत गेल्या सरकार काळात देखील सर्व सोबत होतो. त्यांच्या सूचना एकत्र करू. परवा याबाबत निर्णय घेऊ,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 'कुठल्या पर्याय बाबत आम्ही आता बोलणार नाहीत. आधी सर्व कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आंदोलन कधी केलं जातं? सरकार ऐकत नाही तेव्हा. मात्र आम्ही आंदोलकांसोबत आहोत. आंदोलनाचा विचार कर

MB NEWS:महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन*

इमेज
 *महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन* परळी, (प्रतिनिधी):- 72 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे सर्व विद्यार्थ्याकरिता ऑनलाइन विविध स्पर्धेचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे. ऑनलाईन स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक कसबे के.आर. यांनी केले आहे. 72 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तसेच कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता 5 ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात इयत्ता पाचवीसाठी चित्रकला स्पर्धा (रोकडे सर 907590111)इयत्ता सहावी साठी सुंदर हस्ताक्षर (मराठी किंवा इंग्रजी हस्ताक्षर) शेख सर मो.9420016348, इयत्ता 7 साठी माझे शिक्षक मोबाईल यावर आधारित निबंध स्पर्धा, पटले सर मो.9405373389, इयत्ता आठवी साठी कोरोना काळातील माझी दिनचर्या या विषयावर निबंध गिरी सर मो.9960740202,

MB NEWS:ग्रामसेवकाची अखेर बदली पण अतिक्रमण प्रश्नी अमरण उपोषण सुरुच ; उपोषणाचा तिसरा दिवस

इमेज
 ग्रामसेवकाची  अखेर  बदली पण अतिक्रमण प्रश्नी अमरण उपोषण सुरुच ; उपोषणाचा तिसरा दिवस   सिरसाळा   : सिरसाळा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक शेख अब्दुला यांची तात्काळ बदली प्रशासनाने केली आहे. पंरतु गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण अद्याप हटवले नाही व त्याबाबत संबंधित प्रशासनाने अद्याप काहीही कार्यवाही केली नसल्याने सिरसाळा ग्रामस्थांचे सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाया समोर अमरण उपोषण सुरुच आहे. अमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.    रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी गेल्या एक वर्षा पासुन होती/ आहे. ह्या अतिक्रमणा बाबत ग्रामसेवकची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ धर्मा मेंडके, मिलिंद चोपडे, केशव बन्सोडे व अन्य ग्रामस्थ यांनी करुन सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाया समोर अमरण उपोषण दिनांक १४ सप्टेंबर सोमवार पासुन सुरु केले . दोन मागण्या पैकी एक असलेली मागणी म्हणजे ग्रामसेवकाची बदली तर हि बदली होऊन त्यांच्या जागी सिरसाळा ग्रामपंचायतला  नवीन ग्रामसेवक श्री. नागरगोजे नियुक्त केले आहेत. तशी माहिती देखील परळी पंचायत समिती चे कर्मचारी यांनी उपोषण स्थळी येऊन

MB NEWS:*कै.ल.दे.महिला महाविद्यालया मध्ये प्रा.प्रविण फुटके यांचा सत्कार*

इमेज
 *कै.ल.दे.महिला महाविद्यालया मध्ये प्रा.प्रविण फुटके यांचा सत्कार* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील प्रा.प्रविण फुटके सर यांची.महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल कै.ल.दे.महिला महाविद्यालयात प्राध्यापक मंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आला.       दै.सकाळचे प्रतिनिधी तथा कै.ल.दे.महिला महाविद्यालयातील प्रा.प्रविण फुटके सर यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कै.ल.दे.महिला महाविद्यालय संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख , प्रा.अशोक पवार, प्रा. विशाल पौळ, मारोती देमगुंडे यांच्यासह कै.ल.दै.महिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.

MB NEWS:माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे - पालकंमत्री धनंजय मुंडे*

इमेज
 *माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे - पालकंमत्री धनंजय मुंडे* *जिल्ह्यातील कोविड उपाययोजना, पीककर्ज सह सर्व विभागांचा घेतला समग्र आढावा* बीड, दि,16 :- (जि.मा.का.)  :- राज्य शासन "माझे कुंटुंब माझी जबाबदारी" ही योजना राबवित असून जिल्हयात यशस्वीपणे राबवताना प्रत्येक कुंटुंबाचं सर्वेक्षण करुन त्या कुंटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे पथकामार्फत तपासणी करण्यात येईल. या कार्यक्रमामूळे जिल्हयात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख होईल व त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना या आजारापासून टाळता येण्यास मदत होईल. ही योजना जिल्हयात यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी केले.   जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 आढावा बैठक संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्

MB NEWS:Breaking News......

इमेज
 Breaking News *मुंबई:मराठा आरक्षणावर थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठक;* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार.

MB NEWS:मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करा आरक्षण अधिकृत होईपर्यंत शैक्षणिक,नौकरी व रोजगार विशेष सवलती द्या ! परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन सादर

इमेज
 मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करा आरक्षण अधिकृत होईपर्यंत शैक्षणिक,नौकरी व रोजगार विशेष सवलती द्या ! परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन सादर परळी वैजनाथ प्रतिनिधी     मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करा आरक्षण अधिकृत होईपर्यंत शैक्षणिक,नौकरी व रोजगार विशेष सवलती द्या  आदी मागण्यांचे परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.     परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन उपविभागीय अधिकारी, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.