MB NEWS:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने व्यावसायिकांना फेसशिल्ड चे वाटप" •_सेवा व आत्मनिर्भर भारत सप्ताह अंतर्गत उपक्रम_•

 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने व्यावसायिकांना फेसशिल्ड चे वाटप"

•_सेवा व आत्मनिर्भर भारत सप्ताह अंतर्गत उपक्रम_•


सोनपेठ, प्रतिनिधी....

      सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने केश कर्तनालय, फुटपाथवर बसणारे छोटे व्यावसायिक यांना फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सेवा व आत्मनिर्भर भारत सप्ताह अंतर्गत उपक्रम राबवण्यात आला.

      


       सोनपेठ तालुका भाजपाचे वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील केस कर्तनालय व्यावसायिक व फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना फेसशिल्ड (फायबर मास्क)चे वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते रमाकांतराव जहागीरदार, भाजप व्यापारी आघाडीचे मराठवाडा प्रमुख बालाप्रसाद मुंदडा, किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस रंगनाथराव सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर गव्हाडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश हांडे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ निळे, तालुका सरचिटणीस संतोष दलाल , सदाशिवअप्पा कोल्हेकर आदि सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



       दरम्यान सेवा सप्ताह अंतर्गत राबवण्यात आलेल्या या सेवा उपक्रमामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केस कर्तनालय व्यावसायिक व फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने फेसशिल्ड (फायबर मास्क) उपयुक्त ठरणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !