इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:*बीड जिल्ह्यात ऑक्सीजन सुविधा असणारे 907 वर तर व्हेंटिलेटरची सुविधा असणारे ही 185 बेड उपलब्ध* *बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका, काळजी घ्या - धनंजय मुंडे*

 *बीड जिल्ह्यात ऑक्सीजन सुविधा असणारे 907 वर तर  व्हेंटिलेटरची सुविधा असणारे ही 185 बेड उपलब्ध*


*बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका, काळजी घ्या - धनंजय मुंडे*




बीड (दि. १७) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेचा नुकताच आढावा घेतला असून, पुणे - मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याची ओरड असताना बीड जिल्ह्यातील व्यवस्थापन व नियोजनामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचे 907 तर व्हेंटिलेटरचे १८५ बेड उपलब्ध आहेत.


जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्टिंग, स्वॅब व अन्य माध्यमातून तपासण्या वाढविण्यात आल्या असून, आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. उपलब्ध बेडच्या संदर्भात नागरिकांनी संभ्रम बाळगू नये, तसेच आजाराची लक्षणे दिसताच स्वतःहुन कोविड तपासणी करून घ्यावी असे आवाहन बैठकीनंतर ना. मुंडे यांनी जिल्हा वासीयांना केले.


बुधवार (दि. १६) रोजी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपलब्ध बेडची संख्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची वर्गवारी सहित माहिती घेतली.  नागरिकांमधील संभ्रम दूर करण्याबाबत निर्देश दिले, तसेच रुग्णालय निहाय उपलब्ध बेड संख्या, रुग्ण संख्या तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज 'डॅशबोर्ड' स्वरूपात प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला केल्या आहेत.


बीड जिल्हा रुग्णालय व अन्य कोविड सेंटर मिळून बीड येथे ऑक्सिजनचे ८० व व्हेंटिलेटरचे ५०, अंबेजोगाई स्वाराती येथे ऑक्सिजनचे १९६ व व्हेंटिलेटरचे ५२, अंबाजोगाई महिला रुग्णालय येथे ऑक्सिजन ५१ व व्हेंटिलेटर ६०, जेरिऍट्रिक कोविड रुग्णालय अंबाजोगाई येथे ऑक्सिजन ५०० व व्हेंटिलेटर १४ आणि गेवराई रूग्णालयात ऑक्सिजन ३० तर व्हेंटिलेटर १० असे एकूण ऑक्सिजन बेड 907 तर व्हेंटिलेटर बेड १८६ उपलब्ध आहेत.


जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तसेच अँटिजेन टेस्टिंग व स्वॅब आदी माध्यमातून आढळणारे रुग्णांचे प्रमाण यांचा समतोल राखत आवश्यकता भासल्यास आणखी खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!