इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह* *अंतर्गत परळी भाजपच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ, आयुषकाढा वाटप*

 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह* 

*अंतर्गत परळी भाजपच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ, आयुषकाढा वाटप*



परळी वैजनाथ, दि.17... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान परळी भाजपच्या वतीने  लोकनेत्या 


पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज दि. 17 रोजी ग्रामीण रुग्णालय, परळी वै येथे फळे व आयुष काढ्याचे वाटप परळी भाजपच्या वतीने करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात आला.

लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण परळी शहर व तालुक्यामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीरे, गरजुंना मदत, विविध सामाजिक कार्यक्रम या सप्ताहांतर्गत साजरे केले जात आहेत.

18 रोजी गरीब बंधू भगिनींना आवश्यकतेनुसार चष्मा वाटप, 19 तारखेला अक्षता मंगल कार्यालयात सकाळी 10 वा. पासून युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबीर, 20 रोजी प्रत्येक बुथमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. शिवाजी चौक, 10.30 वा. राणी लक्ष्मीबाई टॉवर आणि 11 वा. मा. पंकजाताई मुंडे यांचे कार्यालय येथे पंडित दिनदयाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, बुथ प्रमुखांच्या निवासस्थानावर पक्षाचा ध्वज, वेबिनारच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.



यावेळी राज्य उद्योग आघाडीचे सदस्य तथा कृषी आघाडीचे प्रमुख जुगलकिशोर लोहिया यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, भीमराव मुंडे, सुरेश माने, महादेव ईटके, किशोर केंद्रे,अरुण पाठक, चंद्रकांत देवकते, संतोष सोळंके, विकास हालगे, योगेश पांडकर, सुशिल हरंगुळे, राम तोष्णीवाल, दिपक नागरगोजे, बाळु फड, कृष्णा मुंडे, सुरेश सातभाई, नितीन मुंडे, ईश्वर होळंबे, नरेश पिंपळे, अविनाश जोशी, श्रीपाद शिंदे, वैजनाथ रेकने, गोविंद मोहेकर, दिलीप नेहरकर, यांच्यासह भाजप, भाजपा युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या