पोस्ट्स

MB NEWS-सकाळी सत्कार, संध्याकाळी अटक;लाचखोर फौजदार एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  सकाळी सत्कार,संध्याकाळी अटक;लाचखोर फौजदार एसीबीच्या जाळ्यात पाटोदा , प्रतिनिधी.....  तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल परत करण्यासाठी तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनाला सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची लाख स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या पोलिस उपनिरीक्षकाची सहाय्यक निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्या बद्दल शुक्रवारी सकाळी सत्कार करण्यात आला होता. अफरोज तैमीरखा पठाण (वय 38) हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रादाराच्या भावास अटकपुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी, जप्त गाडी व पिस्टल सोडविण्यासाठी  चांगला अहवाल देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती चाळीस हजार रुपये लाच स्विकारण्याचे पंचासमक्

MB NEWS-गावागावात वीज तोडणी मुळे शेतकरी त्रस्त

इमेज
  गावागावात वीज तोडणी मुळे शेतकरी त्रस्त ! चार महिन्यातच पुन्हा वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित सार्वजनिक पाणीपुरवठा बंद व मुक्या प्राण्यांचीही पाण्यावाचून तडफड परळी वैजनाथ प्रतिनिधी दि.१२ परळी तालुक्यातील गावोगावी  विज बिल वसुलीच्या नावाखाली मागील तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दिवाळी सणा दरम्यान दिवाळी पिकांचा जोर कायम असतानाच परळी वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली साठी शक्ती करत वीज कनेक्शन तोडले होते पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महावितरणला सहकार्य करत वीज बिल भरणा केला होता त्यानंतर तिन चार महिन्यातच पुन्हा वीज वितरण कंपनीने मनमानी करत तालुक्यातील गावा गावातील शेतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. परळी येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांसोबत सुलतानी वागणूक देत असून सक्तीची वसुली नावाखाली संपूर्ण वीज पुरवठा खंडित करून सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्तता किंवा गोरे जनावरे यांना पाणी मिळावे यासाठी अर्धा तासही वीस सोडत नाहीत या कारभाराच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वैतागला आहे व जनावरांना

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.१२ मार्च २०२२

इमेज
  आजचे राशिभविष्य दि.१२ मार्च २०२२ मेष ः लाभदायक दिवस जाईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. वृषभ ः जपून बोला. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक अडचणी येतील. सावधानता आवश्यक आहे. मिथुन ः आरोग्य उत्तम राहील. मनासारख्या गोष्टी घडतील. प्रसन्नता लाभेल. खरेदीचा आनंद घ्याल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कर्क ः संयमाने घ्यावे लागेल. अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. शब्द देऊ नका. गैरसमजातून वादविवाद होतील. सिंह ः आरोग्याच्या द़ृष्टीने उत्तम दिवस. प्रेरणादायी कार्य कराल. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्यसिद्धी होईल. कन्या ः आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, आठवणींना उजाळा मिळेल. तूळ ः जुने आजार तोंड वर काढतील. कामे रखडतील. नियोजन आवश्यक आहे. नियमांचे पालन करा. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे. वृश्चिक ः वादविवादापासून दूर राहा. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. अस्वस्थता राहील. कृतकर्माचा पश

MB NEWS-परळी वैजनाथ -चोरीच्या घटना सुरूच: रोख रक्कम व दागिने पळवले

इमेज
  परळी वैजनाथ -चोरीच्या घटना सुरूच: रोख रक्कम व दागिने पळवले घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोन्याचा ऐवज व नगदी रोकड चोरी केल्याची घटना शहरातील जयहिंद नगर भागात घडली असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी संगीता लक्ष्मण गायकवाड ( वय 50,व्यवसाय मजुरी ) ह्या त्यांच्या नातेवाईक यांच्या घरी सोमेश्वर नगर परळी येथे मुक्कामी थांबल्या असताना त्यांचे राहते घरी जयहिंद नगर येथे दि.०९ ते दि १० रोजी रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे कुलुप तोडुन, आत प्रवेश करून घरातील सोन्याच्या बांगडया, बोरमाळ,ठुशी असे एकुण ६८,६०० रू सोन्याचे दागिने व ५,००० रू. नगदी असे एकुण ७३,६०० रू.चोरी केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुरन  35/2022  कलम 457,380 भादंविनुसार अज्ञान चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••••• •••••                 🔸 हे देखील वाचा/पहा

MB NEWS-आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी!

इमेज
  आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी! डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होणार ‘फेको’ उपचार पध्दतीने मुंबई :    राज्य सरकार आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. २०२२ चा राज्याचा अर्थसंकल्प ते मांडत आहेत. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे ते म्हणाले. नाशिक, नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. तसेच पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलीय. नेत्र विभागासाठी नियोजन मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक ‘फेको’ उपचार पध्दती सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. एकूण ६० रुग्णालयांमध्ये ही उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे ते म्हणाल

MB NEWS- अर्थसंकल्प 2022 : धनंजय मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा; परळीसह बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न लागले मार्गी

इमेज
  अर्थसंकल्प 2022 : धनंजय मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा; परळी येथील प्रशासकीय इमारत बांधकामास 20 कोटी रुपये निधी *अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बांधकामास 11 कोटी; बीड जिल्हाधिकारी निवासस्थानाचा प्रश्नही धनंजय मुंडेंनी लावला मार्गी* *अंबाजोगाई येथील स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र उभारणीसाठी 14 कोटी 21 लाख* *जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी अडीच कोटी* मुंबई (दि. 11) ----- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय इमारतींचा व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. परळी येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या कामासाठी 20 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  त्याचबरोबर अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बांधकामाचा मार्ग देखील मोकळा झाला असून, यासाठी 11 कोटी 31 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई येथे आरटीओ कार्यालय बांधकामासाठी कोविड नंतर एक वर्षाच्या आत निधी देऊ, हा धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. अंबाजोगाई येथे 100 खाटां