MB NEWS- अर्थसंकल्प 2022 : धनंजय मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा; परळीसह बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न लागले मार्गी

 अर्थसंकल्प 2022 : धनंजय मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा; परळी येथील प्रशासकीय इमारत बांधकामास 20 कोटी रुपये निधी





*अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बांधकामास 11 कोटी; बीड जिल्हाधिकारी निवासस्थानाचा प्रश्नही धनंजय मुंडेंनी लावला मार्गी*


*अंबाजोगाई येथील स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र उभारणीसाठी 14 कोटी 21 लाख*


*जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी अडीच कोटी*


मुंबई (दि. 11) ----- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय इमारतींचा व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. परळी येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या कामासाठी 20 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 


त्याचबरोबर अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बांधकामाचा मार्ग देखील मोकळा झाला असून, यासाठी 11 कोटी 31 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई येथे आरटीओ कार्यालय बांधकामासाठी कोविड नंतर एक वर्षाच्या आत निधी देऊ, हा धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. अंबाजोगाई येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र उभारणीची मागणी पूर्ण करत यासाठी 14 कोटी 21 लाख रुपये निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.


तर बीड येथील जिल्हाधिकारी निवासस्थानाचा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी मार्गी लावला आहे. बीड येथे जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान बांधकाम करण्यासाठी 2 कोटी 56 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारत बांधकामाचा आराखडा देखील मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असून, त्यासही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. 


सन 2022 चा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात सादर केला, विकासाची पंचसूत्री हाती घेत राज्याच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय इमारती व विविध महत्वाच्या रस्त्यांच्या कामास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी ना. अजितदादा पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🔸आजचे राशिभविष्य दि.१०मार्च २०२२

🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.

🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*

*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार