MB NEWS-सकाळी सत्कार, संध्याकाळी अटक;लाचखोर फौजदार एसीबीच्या जाळ्यात

 सकाळी सत्कार,संध्याकाळी अटक;लाचखोर फौजदार एसीबीच्या जाळ्यात








पाटोदा , प्रतिनिधी.....


 तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल परत करण्यासाठी तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनाला सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची लाख स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या पोलिस उपनिरीक्षकाची सहाय्यक निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्या बद्दल शुक्रवारी सकाळी सत्कार करण्यात आला होता.



अफरोज तैमीरखा पठाण (वय 38) हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रादाराच्या भावास अटकपुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी, जप्त गाडी व पिस्टल सोडविण्यासाठी  चांगला अहवाल देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती चाळीस हजार रुपये लाच स्विकारण्याचे पंचासमक्ष व साक्षीदारांच्या समक्ष मान्य केले. या प्रकरणी लाच मागितल्या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल धस, पोह.सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भारत गारदे, हानुमान गोरे, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे, अविनाश गवळी यांनी केली.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.

🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*

*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••




























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !