पोस्ट्स

MB NEWS -ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !*

इमेज
  ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !*   परळी वै.(प्रतिनिधी)-        ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष, मराठवाड्यातील विविध भागातील समाजबांधवांची उपस्थिती, विधीवत संस्करण व हजारो समाजबांधवांच्या साक्षीने परळीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले.            ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४२ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज ६ मे रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. ब्रह्मवृंद मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती  लाभली. गेल्या ४१ वर्षा पासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो. शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी ११.२६ वा. वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे ब्रह्मवृंदाच्या म

MB NEWS -पंकज कुमावत पथकाची कारवाई; सिरसाळा परिसरात पावणे सहा लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

इमेज
  पंकज कुमावत पथकाची  कारवाई; सिरसाळा परिसरात पावणे सहा लाखांचा  गुटखा व मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           सहाय्याक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी तालुक्यातील खामगाव शिवारात छापा टाकून लाखो रुपयांचे गुटखा व  तंबाखुजन्य साहित्य जप्त करीत सिरसाळा पोलीस ठाण्यात 3 व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.           पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खामगाव शिवारात अरुण मधुकर बडे,मधुकर बडे व सुभाष विठ्ठल बडे हे त्यांचे रहाते घरी स्वतःचे फायद्याकरिता विनापरवाना बेकायदेशिर रित्या महाराष्ट्र राज्यात आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही राजनिवास गुटखा, प्रिमियम जाफरानी जर्दा चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना असल्याची माहितीनुसार माजलगाव उप विभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्या पथकास मिळाली. पथकाने शुक्रवार दि 6 रोजी सकाळी 11 वाजता आरोपीच्या खामगाव शिवारात छापा टाकून पांढ-या रंगाचे नायलॉनचे 12 मोठे शिवलेले पोते ज्या प्रत्येकी 1 एका भोतामध्ये 8 लहान पोते असे एकुन 12 पोत्यामध्ये 96 लहान पोते प्रत्येक पोत

MB NEWS-राज ठाकरे हाजीर हो ! परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र पकड वॉरंट जारी

इमेज
 राज ठाकरे हाजीर हो ! परळी न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र पकड वॉरंट जारी  परळी वैजनाथ ; प्रतिनिधी...           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.त्यानंतरही याबाबत राज ठाकरे यांनी कोणताही कायदेशीर प्रतिसाद दिला नाही व न्यायालयात हजर झाले नाही म्हणून आता त्यांच्या विरुद्धज्ञअजामीनपात्र पकड वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला आहे.  दिनांक २२-१०- २००८ रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक करण्यात आले. परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. दरम्यान सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केली होती. बसचे समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यास राज ठाकरे यांनी चिथावणी दिली.याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 208/2008 अन्वये गुन्हा कलम 143, 427, 336, 109 भारतीय दंडसंहितेनु

MB NEWS - BREAKING NEWS:-परळीत संभाजीनगर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई

इमेज
  परळीत संभाजीनगर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         परळी शहरात संभाजीनगर पोलिसांनी गुटख्यावर मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला असल्याची  प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.   राज्यात गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या  गुटखा विक्री होत असल्याच्या ठिकाणी जिल्हाभर गेल्या अनेक दिवसांपासून पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. आज रोजी रात्री परळीतील  अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारत संभाजीनगर पोलिसांनी गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर मिळणार आहे.तुर्त पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. सविस्तर बातमी.......       याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि. 05/05/2022 रोजी गुप्त बातमीदार याचेकडुन माहीती मिळाली कि, जमजम कॉलनी मध्ये एका इसमाचे घरी गुटखा ठेवलेला आहे. यावरुन पो.उप.नि. मेंढके, स. फौ आईटवार, स.फौ भताने, पोह पवार, पोह शिंदे, पोना सानप याना छापा टाकण्यासाठी पाठव

MB NEWS -पुस्तके हाच ज्ञानाचा खरा पाया - डॉ. साच्चिदानंद शेवडे

इमेज
  पुस्तके हाच ज्ञानाचा खरा पाया - डॉ. साच्चिदानंद शेवडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.५ - सध्याच्या काळात सोशल मीडियाला महत्व आहे.याकडे सर्वांचीच जास्त ओढ असते परंतु पुस्तके हाच खरा ज्ञानाचा पाया आहे.म्हणून युवकांनी पुस्तकं वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन लेखक,व्याख्याते,प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.परळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या कार्क्रमात ते बोलत होते. समाज माध्यमातून येणारे संदेश आपण अतिउत्साहाने भान न ठेवता सर्वत्र प्रसारित करत असतो.परंतु त्या संदेशाच्या मुळाशी गेल्यावर ते असत्य किंवा अर्धसत्य असल्याचे लक्षात येते व आपण इथेच फसतो.केवळ वाचन कमी झाल्याने ही गफलत होते याकरिता मुळ ज्ञान पुस्तकांच्या सतत वाचनाशिवाय मिळू शकत नाही.म्हणून युवकांनी पुस्तके वाचून तो एक छंद म्हणून जोपासला पाहिजे असे डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले.यावेळी युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. श्री वैद्यनाथ भक्तिमंडलाच्या कार्याचे केले कौतुक दरम्यान परळी शहरातील जागृत धर्म प्रिय युवकांकडून विविध मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत अनेक मंदिरांची स्वच्छता ही या

MB NEWS- *धार्मिक स्थळांवरील भोंगे: परळीतही वैद्यनाथ मंदिरसह परवानाधारक २८ धार्मिक स्थळांना पोलीस प्रशासना कडून लेखी मार्गदर्शक सुचना*

इमेज
 धार्मिक स्थळांवरील भोंगे: परळीतही वैद्यनाथ मंदिरसह परवानाधारक २८ धार्मिक स्थळांना  पोलीस प्रशासना कडून लेखी मार्गदर्शक सुचना परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्यात सुरु असलेल्या घमासानानंतर प्रशासकीय पातळीवर याबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे याविषयीची अंमलबजावणी जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भुमिकेनंतर  पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या असून या विषयात परवानाधारक मंदिर -मशिदी व अन्य धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून लेखी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.परळीतील वैद्यनाथ मंदिरसह परवानाधारक २८ धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे.             राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतरत नाही तोपर्यंत मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाणार, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिणामी या भोंगा बंदी आंदोलनाचा  मंदिर, मशिद, चर्च, गुरुव्दारा तसेच सर्व धर्मीयांच्या