MB NEWS -पंकज कुमावत पथकाची कारवाई; सिरसाळा परिसरात पावणे सहा लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त
पंकज कुमावत पथकाची कारवाई; सिरसाळा परिसरात पावणे सहा लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
सहाय्याक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी तालुक्यातील खामगाव शिवारात छापा टाकून लाखो रुपयांचे गुटखा व तंबाखुजन्य साहित्य जप्त करीत सिरसाळा पोलीस ठाण्यात 3 व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खामगाव शिवारात अरुण मधुकर बडे,मधुकर बडे व सुभाष विठ्ठल बडे हे त्यांचे रहाते घरी स्वतःचे फायद्याकरिता विनापरवाना बेकायदेशिर रित्या महाराष्ट्र राज्यात आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही राजनिवास गुटखा, प्रिमियम जाफरानी जर्दा चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना असल्याची माहितीनुसार माजलगाव उप विभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्या पथकास मिळाली. पथकाने शुक्रवार दि 6 रोजी सकाळी 11 वाजता आरोपीच्या खामगाव शिवारात छापा टाकून पांढ-या रंगाचे नायलॉनचे 12 मोठे शिवलेले पोते ज्या प्रत्येकी 1 एका भोतामध्ये 8 लहान पोते असे एकुन 12 पोत्यामध्ये 96 लहान पोते प्रत्येक पोत्या मध्ये प्रिमियम राजनिवास सुगंधित पान मसाला कंपनीचे 25 पुडे असे 2400 पुडे (प्रति पुडा 192 रुपये प्रमाणे) एकुण किंमती 4 लाख 60 हजार 800 रुपयांचा ऐवज व पांढ-या रंगाचे नायलॉनच्या 12 गोण्या प्रत्येत गोणीमध्ये 8 लहान नायलॉनच्या पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये 25 प्रिमीयम एकुण एल 01 जाफरानी जर्दा चे 2400 पुडे प्रत्येक पुडा 48 रुपये प्रमाणे एकुण किंमती 1 लाख 15 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल असा एकुण 5 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुरनं 69/2022 कलम 328,272,273,भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप एकशिंगे हे करीत आहेत.
-----------------------------------------------------------------
हे देखील वाचा/पहा🔸
🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*
🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_
क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*
क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*
Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*
क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*
Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*
क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*
-----------------------------------------------------
जाहीरात/Advertis
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा