इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS - BREAKING NEWS:-परळीत संभाजीनगर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई

 परळीत संभाजीनगर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई 




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....


        परळी शहरात संभाजीनगर पोलिसांनी गुटख्यावर मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला असल्याची  प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.



  राज्यात गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या  गुटखा विक्री होत असल्याच्या ठिकाणी जिल्हाभर गेल्या अनेक दिवसांपासून पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. आज रोजी रात्री परळीतील  अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारत संभाजीनगर पोलिसांनी गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर मिळणार आहे.तुर्त पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.

सविस्तर बातमी.......

     याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि. 05/05/2022 रोजी गुप्त बातमीदार याचेकडुन माहीती मिळाली कि, जमजम कॉलनी मध्ये एका इसमाचे घरी गुटखा ठेवलेला आहे. यावरुन पो.उप.नि. मेंढके, स. फौ आईटवार, स.फौ भताने, पोह पवार, पोह शिंदे, पोना सानप याना छापा टाकण्यासाठी पाठवले असता ५.४५ वा.चे सुमारास फेरोज शेख रा. जमजम कॉलनी परळी वै याचे घरी हाकीम हैदर कुरेशी हा आपले स्वत:चे कब्जात 1,35,200/- रु चा राजनिवास गुटखा, व सुगंधी तंबाखु, आर.एम.डी. पान मसाला तसेच जाफरानी जर्दा, इ. चा चोरटी विक्री करणेसाठी बाळगलेला मिळुन आला. हा गुटखा कोणाकडुन आनला असे विचारले असता पप्पु कदम रा.केज याचेकडुन आनला आहे असे सांगीतल्याने आरोपी क्र 01) हाकिम हैदर कुरेशी वय 47 वर्षे रा.जुना रेल्वे स्टेशन 02) पप्पु कदम रा.केज 03) फेरोज शेख रा.जमजम कॉलनी परळी यांचे विरुध्द गुरन 90/2022 कलम 328,272,273 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा तपास पो.उप नि मेंढके करीत आहेत.

                    Video 


-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis



🔸 MB NEWS/माझी बातमी🔸

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
    


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!