MB NEWS -ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !*

 ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !*

 



परळी वै.(प्रतिनिधी)-

       ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष, मराठवाड्यातील विविध भागातील समाजबांधवांची उपस्थिती, विधीवत संस्करण व हजारो समाजबांधवांच्या साक्षीने परळीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. 



          ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४२ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज ६ मे रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. ब्रह्मवृंद मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती  लाभली. गेल्या ४१ वर्षा पासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो. शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी ११.२६ वा. वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चार व विधीपुर्वक संपन्न झाला. या सोहळ्याचे पौरोहित्य मनोहर देव जोशी व ब्रह्मवृंदांनी केले.या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या २१ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले.



      दोन दिवस हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ब्राह्मण सभेच्या उपक्रमात परिश्रम करणार्‍या कार्यकर्ते यांचे यावेळी सत्कार करण्यात आले.तसेच दिनदयाळ बँकेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अॅड.राजेश्वर  देशमुख, संचालक डॉ.विवेक दंडे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्या च्या  यशस्वीतेसाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी. दा.सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन, ब्राह्मण महिला आघाडी, ब्राह्मण युवक संघटना,पुरोहित संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis



🔸 MB NEWS/माझी बातमी🔸

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !