MB NEWS- *धार्मिक स्थळांवरील भोंगे: परळीतही वैद्यनाथ मंदिरसह परवानाधारक २८ धार्मिक स्थळांना पोलीस प्रशासना कडून लेखी मार्गदर्शक सुचना*

 धार्मिक स्थळांवरील भोंगे: परळीतही वैद्यनाथ मंदिरसह परवानाधारक २८ धार्मिक स्थळांना  पोलीस प्रशासना कडून लेखी मार्गदर्शक सुचना



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्यात सुरु असलेल्या घमासानानंतर प्रशासकीय पातळीवर याबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे याविषयीची अंमलबजावणी जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भुमिकेनंतर  पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या असून या विषयात परवानाधारक मंदिर -मशिदी व अन्य धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून लेखी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.परळीतील वैद्यनाथ मंदिरसह परवानाधारक २८ धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे.

            राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतरत नाही तोपर्यंत मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाणार, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिणामी या भोंगा बंदी आंदोलनाचा  मंदिर, मशिद, चर्च, गुरुव्दारा तसेच सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्याबाबत नियमावली लागू करण्याबाबत प्रशासन पातळीवर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.सर्वांना रितसर लाऊडस्पीकर परवानगीसाठी अर्ज करण्यास सांगितले जात आहे. ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 

          याबाबत परळीतही धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून लेखी मार्गदर्शक सुचना परवाना पत्रात देण्यात आलेल्या आहेत. शहर पोलीस ठाणे व संभाजी नगर पोलीस ठाणे अंतर्गत आत्तापर्यंत २८ धार्मिक स्थळांचे परवाने जारी करण्यात आलेले आहेत. वैद्यनाथ मंदीराचे ध्वनीक्षेपक अगोदरपासूनच अधिकृत परवानाप्राप्त व ध्वनी मर्यादांचे तंतोतंत पालन करणारे आहे.श्री वैद्यनाथ मंदीर येथील पुजा अभिषेक, आरती करीता ध्वनीक्षेपक परवाना प्राप्त आहे.प्रत्येक दिवशी  सकाळी 06.00 ते 07.00 वा. दरम्यान आणि सायकाळी 06.00 ते 07.00 वा. दरम्यान तसेच रात्री 09.30 ते 10.00 वा. दरम्यान आरतीकरीता ध्वनीक्षेपकाला अधिकृत परवाना आहे. 

           शहरातील अन्य धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत पोलीस प्रशासनाकडून परवाना देताना याबाबची नियमावलीही दिली आहे.परवानाधारक सर्व धार्मिक स्थळांना नियमावलीचे पालन करुनच ध्वनिक्षेपक वापरावे लागणार आहेत.

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis




🔸 MB NEWS/माझी बातमी🔸

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार