पोस्ट्स

MB NEWS-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान येणार गोपीनाथ गडावर

इमेज
  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान येणार गोपीनाथ गडावर *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी जनसागर उसळणार ; कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन*  *पंकजाताई मुंडेंकडून गडावरील व्यवस्थेची पाहणी* परळी वैजनाथ ।दिनांक २। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या ३ जूनला गोपीनाथ गडावर येणार आहेत. हा स्मृती दिन  "संघर्षदिन सन्मान" म्हणुन साजरा केला जाणार असुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय येणार आहे. मुंडे प्रेमींच्या व्यवस्थेसाठी भव्य दिव्य मंडपाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली.              उद्या  ३ जुन रोजी गोपीनाथ गडावर सकाळी 10 ते 12.30 या वेळेत  रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद  तर दुपारी 3.30 वाजता "सं

MB NEWS-दगडवाडीत चोरी: सोन्याचे दागिने पळवले

इमेज
  दगडवाडीत चोरी: सोन्याचे दागिने पळवले  परळी वैजनाथ, प्रतिनिधी... घराचे मेन गेट तोडून घरात प्रवेश करीत घरातील सोन्याचा ऐवज चोरी झाल्याची घटना तालुक्यातील दगडवाडी येथे घडली. असून ग्रामीण भागात देखील चोऱ्या होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले आहेत. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार परळी तालुक्यातील दगडवाडी येथील रहिवाशी सोमेश्वर मधुकर तांदळे (वय ३९ वर्षे) हे खाजगी नोकरीच्या कारणाने सध्या नांदेड येथे श्याम नगर भागात राहत असून त्यांच्या घरातील लोक हे घराच्या मेन गेटला कुलुप लावुन नांदेड येथे गेले आसता दि 29 ते 30 च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे मेन गेटचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून घरातील 40 हजार रुपयांची सोण्याचे दागीने चोरून घेवुन गेले ज्यामध्ये 1 तोळा वजनाची सोण्याची मोठया मण्याची माळ व 1 तोळा वजनाची सोण्याची सेवन पिस असा ऐवज चोरी केला. या प्रकरणी सोमेश्वर मधुकर तांदळे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.न.  १४१ / २०२२  कलम ४५४, ४५७,३८० भा.द.वी.नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि खोडेवाड हे करीत आहेत. हे देखील वाचा/पहा🔸 खालील

MB NEWS-रोलर रिले स्केटींग राष्ट्रीय स्पर्धेत परळी शहरातील मुलांनी मिळवली ९ पदकं

इमेज
  रोलर रिले स्केटींग राष्ट्रीय स्पर्धेत परळी शहरातील मुलांनी मिळवली ९ पदकं  परळी वैजनाथ, प्रतिनीधी          औरंगाबाद येथे झालेल्या ३५ व्या रोलर रिले स्केटींग स्पर्धेत परळी शहरातील मुलांनी तब्बल ९ मेडल मिळवून परळीचे नाव उंचावले आहे.औरंगाबाद येथे दि. २७ ते २९ मे २०२२ दरम्यान झालेल्या नॅशलन (राष्ट्रीय) स्पर्धेत राज्या प्रमाणे  या राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा कायम ठेवला आहे.           २०० मी. रेस या प्रकारात ६ ते ८ वयोगटात:राजदीप प्रविण कोमटवार प्रथम (गोल्ड मेडल),पियुष प्रदीप चव्हाण ४ ते ६ वयोगटात (गोल्ड मेडल),नमन अभिजीत आवस्थी १० ते १२ वयोगटात (गोल्ड मेडल),पंकज वाल्मीक मुंडे १२ ते १४ वयोगटात (गोल्ड मेडल), प्रितेश रमेश व्हावळे १० ते १२ वयोगटात (गोल्ड मेडल), ३०० मीटर रिले रेस प्रकारात: राजदीप प्रविन कोमटवार (गोल्ड), पियुष प्रदीप चव्हाण (सिलव्हर), नमन अभिजीत आवस्थी (सिलव्हर),प्रितेश रमेश व्हावळे (सिलव्हर) या पाच खेळाडुंची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.           या निवडीबद्दल प्रशीक्षक व कोच, सचिव : विनोद दादेवाड सर, संघटना अध्यक्ष : बाबा मुंडे, कोषाध्यक्ष: सचिन मुंडे, श्री. डी. एन देवकत

MB NEWS-किसान सभेच्या वतीने ८ जुनला पिक विमा परिषद

इमेज
  किसान सभेच्या वतीने ८ जुनला  पिक विमा परिषद परळी वै.ता.१ प्रतिनिधी      परळी येथे ८ जुन रोजी होणाऱ्या पिक विमा परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी शिक्षक व कामगार नेते पी एस घाडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.          केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती पिकांच्या नुकसानीचा आधार असलेल्या पिक विमा धोरणास घरघर लागली आहे. पिक विमा योजना विमा कंपनीच्या फायदया ऐवजी शेतकरी हिताची असावी यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा शेतकऱ्यांना सोबत घेउन शासन व प्रशासन स्तरावर संघर्ष करीत आहे. पिक विम्यासह शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष तीव्र करण्यासाठी किसान सभेच्या वतीने परळी येथील स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात बुधवार दि. ८ जुन रोजी पिक विमा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पिक विमा परिषदेचे उदघाटक म्हणुन शेती प्रश्नाचे अभ्यासक व जेष्ठ पत्रकार मा पी साईनाथ असणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राज्य सचिव कॉ अजीत नवले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिक विमा लढयाचे अग्रनी नेते कॉ अजय बुरांडे असणार आहेत. परिषद यशस्वी करण्यासाठी स्वागत समीती

MB NEWS-*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतिदिन ; ३ जूनला अभिवादनासाठी विविध मान्यवर नेत्यांसह राज्यभरातून येणार मुंडे प्रेमी*

इमेज
 * लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतिदिन ; ३ जूनला  अभिवादनासाठी विविध मान्यवर नेत्यांसह राज्यभरातून येणार मुंडे प्रेमी* *वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती  होणार सन्मानित* _पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू_ परळी वैजनाथ  । दिनांक ०१।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या ३ जून रोजी  लोकनेत्याच्या अभिवादनासाठी  आमदार, खासदारांसह विविध मान्यवर नेते तसेच राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर याठिकाणी उसळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे.     लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मध्यंतरी दोन वर्षे कोरोना महामारीमुळे गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम होऊ शकले नव्हते.       ३ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वा. ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आ

MB NEWS-प्रासंगिक लेख: राजकारण्यांच्या वक्तव्याचे अर्थ न समजण्याएवढी जनता नक्कीच दुधखुळी नाही!

इमेज
  राजकारण्यांच्या वक्तव्याचे अर्थ न समजण्याएवढी जनता नक्कीच दुधखुळी नाही! छत्रपती शाहूमहाराज यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून झालेल्या वादावर बोलताना देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर खापर फोडले आहे. मी एक सांगू इच्छितो की देवेंद्रजी म्हणजे काही भाजपा नाही. भाजपा मध्ये दुसर्‍या पक्षाप्रमाणे एखाद्या नेत्याची हुकूमशाही चालत नाही किंवा एकाच माणसाच्या दावनीला बांधलेला पक्ष नाही. भाजपा एक टीमवर्क आहे. तेथे सर्वसंमतीने निर्णय घेतले जातात.  भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना 2016 साली कोणतीही अट न टाकता खासदार बनविले होते. त्यावेळेस पवार साहेबांनी *"आता पेशवे छत्रपतींना पदे देऊ लागले"* असे वक्तव्य केले. यावरून त्यांच्या *कोत्या बुध्दीची अनुभूती* येते आणि ते *जातीयवादाला अजिबात थारा देत नाहीत* यावर शिक्कामोर्तब होते. सर्वप्रथम 2009 साली पवार साहेबांनी राष्ट्रवादीकडून छत्रपती संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले. ते पराभूत झाले की त्यांना पराभूत केले हे मात्र गुलदस्त्यात आहे. आत्ताच्या 2022 च्या राज्यसभेवर खासदार नियुक्तीसाठी पवार साहेबां

MB NEWS-राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ; श्री वैद्यनाथ मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी केले अभिवादन

इमेज
  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ; श्री वैद्यनाथ मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी केले अभिवादन   परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-       स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आठरा पगड जातीतील लोकांना एकत्र आणले.त्यांचे कृतिशील कार्य सदैव प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी केले.      राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त श्री. वैद्यनाथ मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांनी  अभिवादन केले. वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळास्थळी पुष्पार्पण करुन वंदन केले.

MB NEWS-राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त श्री. वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील अहिल्यादेवींच्या मुर्तीचे विश्वस्तांकडून पुजन

इमेज
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त श्री. वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील अहिल्यादेवींच्या मुर्तीचे विश्वस्तांकडून पुजन परळी (प्रतिनिधी):- राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त श्री. वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील अहिल्यादेवींच्या मुर्तीचे विश्वस्तांकडून पुजन करण्यात आले. 🏵️ *परळीत अभिनव पद्धतीने जयंती: राजमाता अहिल्यादेवींच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक व साडीचोळीने श्रृंगार...!*     पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ मंदिर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थांन कमिटीचे सेक्रेटरी राजेश देशमुख, प्रदिपराव देशमुख ,प्रा.बाबासाहेब देशमुख , रघुवीर देशमुख , राजेभाऊ पुजारी, परळीचे माजी तलाठी बडे आदी उपस्थित होते. हे देखील वाचा/पहा🔸 खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇 •  एकाकडून गोळीबार;एक जखमी* •  खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*    •  🏵️ *परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी...... !* 👉 *_यासाठी सामुहिक प्रयत