MB NEWS-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान येणार गोपीनाथ गडावर

 मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान येणार गोपीनाथ गडावर



*लोकनेत्याच्या अभिवादनासाठी जनसागर उसळणार ; कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन* 


*पंकजाताई मुंडेंकडून गडावरील व्यवस्थेची पाहणी*


परळी वैजनाथ ।दिनांक २।

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या ३ जूनला गोपीनाथ गडावर येणार आहेत. हा स्मृती दिन  "संघर्षदिन सन्मान" म्हणुन साजरा केला जाणार असुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय येणार आहे. मुंडे प्रेमींच्या व्यवस्थेसाठी भव्य दिव्य मंडपाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली. 

          

 उद्या  ३ जुन रोजी गोपीनाथ गडावर सकाळी 10 ते 12.30 या वेळेत  रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद  तर दुपारी 3.30 वाजता "संघर्ष सन्मान दिन" कार्यक्रम होणार आहे. यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर व इतर मान्यवरांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. 


*वाॅटरप्रुफ मंडप ; दर्शनाची चोख व्यवस्था*

------------------

कोरोना महामारीमुळे गोपीनाथ गडावर मागील दोन वर्षै जाहीर कार्यक्रम होऊ शकला नव्हता.  यावर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.  गडाच्या परिसरात भव्य दिव्य वाॅटरप्रुफ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.  120×270 या आकाराचा मंडप उभारण्यात येत आहे तर 30×70 आकाराचे व्यासपीठ उभारण्यात येत आहे. महाप्रसादासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात येत आहे. मुंडे प्रेमी मोठ्या संख्येने येणार असुन प्रत्येकाला महाप्रसाद मिळावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नेहमी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे सुलभ दर्शन व्हावे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आलेल्या सर्वांना महाप्रसाद मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.


*तगडा पोलीस बंदोबस्त*

-----------

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच गडावर येत असल्याने आणि नेहमीची गर्दी लक्षात घेऊन गडासह परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी यांनी बुधवारीच कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली. 


*पंकजाताई मुंडेंकडून पाहणी*

------------

कार्यक्रमाची गोपीनाथ गडावर युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन भेट देऊन तयारीची तसेच महाप्रसादाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. पाहणीपूर्वी त्यांनी मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

••••

संबंधित बातम्या 

*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?