MB NEWS-प्रासंगिक लेख: राजकारण्यांच्या वक्तव्याचे अर्थ न समजण्याएवढी जनता नक्कीच दुधखुळी नाही!

 राजकारण्यांच्या वक्तव्याचे अर्थ न समजण्याएवढी जनता नक्कीच दुधखुळी नाही!



छत्रपती शाहूमहाराज यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून झालेल्या वादावर बोलताना देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर खापर फोडले आहे. मी एक सांगू इच्छितो की देवेंद्रजी म्हणजे काही भाजपा नाही. भाजपा मध्ये दुसर्‍या पक्षाप्रमाणे एखाद्या नेत्याची हुकूमशाही चालत नाही किंवा एकाच माणसाच्या दावनीला बांधलेला पक्ष नाही. भाजपा एक टीमवर्क आहे. तेथे सर्वसंमतीने निर्णय घेतले जातात. 


भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना 2016 साली कोणतीही अट न टाकता खासदार बनविले होते. त्यावेळेस पवार साहेबांनी *"आता पेशवे छत्रपतींना पदे देऊ लागले"* असे वक्तव्य केले. यावरून त्यांच्या *कोत्या बुध्दीची अनुभूती* येते आणि ते *जातीयवादाला अजिबात थारा देत नाहीत* यावर शिक्कामोर्तब होते.


सर्वप्रथम 2009 साली पवार साहेबांनी राष्ट्रवादीकडून छत्रपती संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले. ते पराभूत झाले की त्यांना पराभूत केले हे मात्र गुलदस्त्यात आहे.


आत्ताच्या 2022 च्या राज्यसभेवर खासदार नियुक्तीसाठी पवार साहेबांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथम छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देवून कामाला लावले. दुसर्‍याच दिवशी लगेच शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर करून टाकला. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब म्हणजेच शिवसेनेनेही शिवबंधनाची अट टाकून छत्रपतींच्या अडचणीत भरच टाकली. नंतर छत्रपतींचा निर्णय येण्याअगोदरच दुसरा उमेदवार जाहीर पण केला. छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना फोन केला पण त्यांनी उचललासुध्दा नाही. जर छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी द्यायचीच नव्हती तर असा त्यांचा अपमान तरी करायला नको होता. 


एक लक्षात घ्या, भाजपाने छत्रपती घराण्याचा मान ठेवून कसलीच अट न टाकता 2016 साली खासदार केले. तसेच छत्रपतींनी *"मागणी करायची नसते, तर आदेश द्यायचा असतो"* हे त्यांचे वक्तव्य होते. यावरून देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपाची छत्रपती घराण्याबद्दलची आस्था सिद्ध होते. 

पवार साहेब आणि उध्दव ठाकरे साहेबांनी अटी आणि शर्ती टाकून घराण्याचा अपमान केला आणि त्यांचा निर्णय येण्याअगोदरच दुसरा उमेदवार जाहीर केला.  त्याचबरोबर खा. संजय राऊत साहेबांनी तर छत्रपतींना "वंशज असण्याचा पुरावा" मागितला होता. यावरून यांना आणि त्यांच्या पक्षाला छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल किती आस्था आहे हे लक्षात येते.


 असे असतानासुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी धोका दिलाय असे कसे बोलता हे समजण्याच्या बाहेर आहे. छत्रपती संभाजीराजेंचा आणि छत्रपती घराण्याचा अपमान कोणीकोणी मिळून केला हे कोणीही सांगण्याची गरज नाही. जनता सर्वांनाच ओळखून आहे. छत्रपती शाहू महाराजांनी भाजपाचे नाव न घेता फक्त देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांना कोणत्या प्रकारचे राजकारण करायचे आहे? तसेच या वक्तव्यामागे बोलवता धनी कोण आहे हे न कळण्याएवढी जनता भोळी राहिली नाही हे लक्षात असू द्यावे...

                जय हिंद...जय महाराष्ट्र..

✍️डाॅ दिपक पाठक,परळी वैजनाथ

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

.

🏵️ *परळीत अभिनव पद्धतीने जयंती: राजमाता अहिल्यादेवींच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक व साडीचोळीने श्रृंगार...!*

 एकाकडून गोळीबार;एक जखमी*

• खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*  

• 🏵️ *परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी...... !* 👉 *_यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचे_*

• 🏵️ *परळीत पारंपरिक पद्धतीने शनैश्वर जन्मोत्सव; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह भाविकांनी घेतले दर्शन.*

•  *तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया समोर आशा आक्रमक;मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.

• 🛑 विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या "या" दिग्गजांना मिळेल संधी?

• *ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही -धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🛑 परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !